जे न देखे रवी...
चक्रव्युह....
Primary tabs
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा
जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा
सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया
वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया
अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला
घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला
जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले
कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले
भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा
राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता.....
२-९-२०२२
अकाऊंटमधून पैसे ऑनलाईन गायब झाल्यानंतर कविता सुचली का? :-)