जे न देखे रवी...
गणेशवंदना
Primary tabs
गणेशवंदना
-------------
सृष्टीचा तू एक नियंता
लंबोदरा तू एकदंता
मोरया मोरया
बुद्धिदाता वरदायका
संकटमोचका विनायका
प्रसन्न प्रेमळ भगवंता
मोरया मोरया
आनंदे नर्तन करिशी
भक्ता हृदयी धरिशी
कृपा असावी अनंता
मोरया मोरया
------------------
यावेळी गलेमामध्ये सहभाग घेऊ शकलो नाही , पण गणेशाचरणी माझेही एक पुष्प .
आवडले.
कर्नलजी अन इतर वाचक - आभार
आवडली
हे हेरंब लंबोदरा
रत्नजडी फरा
वरदहस्त धरा
नमू पायी।।
हे असूरकंदना
करु गीतवंदना
अर्पू पुष्पचंदना
नमू पायी।।
हे गणनायका
बुद्धिदायका
अष्टविनायका
नमू पायी।।
नमो एकदंता
तूच भगवंता
आदी अनंता
नमू पायी।।
हे कला च्या ईश्वरा
गणेश गुणेश्वरा
शरण बाजीगरा
तुझ्या पायी।।
दोन्ही कविता छान आहेत.
छान रचना ! आवडली !