पाककृती

मोदक-१

Primary tabs

यंदा गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून बनवायचा घाट घातला.सुरुवातीला दहा प्रकार करायाचे ठरवले,पण वेळेनुसार काहीच प्रकार बनवता आले.हे मोदक मी सकाळच्या घाईत वीस मिनिटांतच बनवले आहेत.
त्या वेळी जे साहित्य असेल ,जे कमी जास्त प्रमाण वापरून केले आहेत.तेव्हा त्यांची रेसेपी देणे जरा अन्यायकारकच होईल.ज्यांना हे मोदक बनवायचे आहेत त्यांनी नक्कीच युट्युबवर त्या त्या रेसिपीचा शोध घ्यावा.

१.गव्ह्याच्या पीठाचे ,गुळखोबरे,सुकामेवा सारण असलेले तळणीचे मोदक
m

२.सफरचंद स्वादाचे मोदक
zz

३.गुलकंद-पान मोदक-विड्याचे पान वापरून बनवलेले गुलकंद सारणाचे मोदक
x

४.ओरिओ बिस्कीट मोदक
यात मुलीने आवडीने भाग घेतला.
s

५.रोझ-मंगो मोदक
हे सर्वांत बेस्ट झाले होते.
d

६.अपराजिता मोदक –गोकर्ण फुलांचा अर्क वापरून नैसर्गिक निळ्या रंगांचे मोदक.उकडीच्या मोदक प्रांतात अजूनही चाचपडत आहे  पुढच्या वेळी शिकवणीच लावणार आहे.
ह

७.रवा-मैद्याचे पिठीसाखर –खोबर्याचे सारण असलेले मोदक –तोंडात टाकताच विरघळणारे.नवऱ्याला हेच जास्त आवडले.
d

८.खजूर –सुकामेवा मोदक ,तोतल शुगर फ्री
d

-भक्ती

खरं सांगायचं तर ...

तांदूळ आणि गोड, (साखर, गूळ, खवा, इत्यादि...) जीभेला सहन होत नाही..

तांदूळ हा तिखटा बरोबर खुलतो ...

उदा, तांदूळ आणि काळा वाटाणा

तांदूळ आणि मांसाहारी पदार्थ.

तुम्ही केलेले मोदक वेगळे दिसत आहेत ...

बायकोला लिंक पाठवतो ...

म्हणजे क्रमशः आहे तर!
:)
गुलकंद-पान, सफरचंद, ओरिओ, रोज-मँगो हे इंटरेस्टिंग दिसताहेत.
मस्त.
आणि या सगळ्यांच्या पाककृती?
कसं बनवलंत त्याची धावती वर्णने पण टाका की!

Bhakti

धावती वर्णने पण टाका

नक्की,
आळस हा माणसाचा शत्रू आहे :)

गोकर्णाला विष्णूप्रिया सुद्धा म्हणतात तेव्हा ते नाव सुद्धा देऊ शकता.

बाकी मोदक मस्तच.

Bhakti

विष्णूप्रिया|
मस्तच.

टर्मीनेटर

'ओरिओ बिस्कीट मोदक', 'रोझ-मँगो मोदक', 'रवा-मैद्याचे पिठीसाखर –खोबऱ्याचे सारण असलेले मोदक' आणि 'खजूर –सुकामेवा मोदक' हे प्रकार ट्राय करायला आवडतील 👍
बाकी आंबेमोहर तांदुळाचे पिठ आणि गूळ - खोबऱ्याचे सारण घालून बनवलेले पारंपरिक मोदक माझे ऑल टाईम फेवरीट !

Bhakti

एकवेळ क्रशला‌ पाहणार नाय पण उकडीचे मोदक सोडणार नाय ;) हेहे
टीपी.

यश राज

मस्त वेगवेगळे मोदक.. बाप्पा पण खुश झाले असतील .

Bhakti

अगदी!
बाप्पा सदैव माझ्यावर खुश असतो

प्रचेतस

विविध प्रकारचे मोदक एकदम भारी. अपराजिता मोदक विशेष आवडले.

मदनबाण

लयं भारी ! मी प्रत्येक प्रकारातील मोदक उचलुन खाल्ला आहे असे समजुन घेणे ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raat Kali Ek Khwab Mein... :- Buddha Mil Gaya (1971)

श्वेता२४

उकडीचा मोदक सर्वात जास्त आवडत असला तरी तळणाचा मोदकही चविष्ट वाटतो मला.

Bhakti

हो मोदक प्रकारच भारी आहे,त्यात इश आनंद श्रद्धा सर्वकाही आहे.
-गणेशभक्त :)

Bhakti

सर्वांना धन्यवाद!
:)))

आपल्याला ब्वा सगळेच मोदक आवडले ,आणी सगळ्यात जास्त आवडला तो , तोतल शुगर फ्री ( ह .घ्या).