जे न देखे रवी...

बरसणाऱ्या सरी|

Primary tabs

नभावरची साय
ऊतू ऊतू जाई,
गंधवेडी अवनी
बहरली रानो वनी||१||

फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती ||२||

भिरभिरणाऱ्या अंगणात
फडफडती भिंगोरी पंखात
बरसणाऱ्या सरी धारा
काळजाचा गार निवारा||३||

-भक्ती

फेसाळला नदीकाठ
ऋतू फुलांची गर्दी दाट
हिरव्या पदरावरती
दव मोती भरती.

वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत.
लिहिते राहावे.

-दिलीप बिरुटे

Bhakti

प्राची |बिरूटे सर | धन्यवाद|

Bhakti

Q
१६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता.
अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी!