जे न देखे रवी...

लद्दाख

Primary tabs

भूशास्त्राच्या अंकलिपीची
पाने इथली उलटी
रंगभारले पहाड, अवघड
रस्त्याची वेलांटी

रण वाळूचे पायतळी अन्
हिमकण माथ्यावरती
किती विरोधाभास पचवुनी
फुलते इथली सृष्टी

रंग नभाचे प्राशुनी वाहे
निवळशंख हे पाणी
रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
मिश्रण केले कोणी

(नुकत्याच केलेल्या लद्दाख वारीदरम्यान रेखाटलेले शब्दचित्र)

बाजीगर

खूप भाsssssssरी कविता !

मी गेलो होतो दोन महीन्यापूर्वी महिन्यात.
(आपल्यापासून स्फूर्ती घेऊन, ह्या ओळी खरडल्या...)

पँगाँग-लेक उंच सरोवर,
जणू आकाश वितळले!
पाणी कसे नीळेशार,
जागेपणी स्वप्न निथळले !!

श्रीगणेशा

रौद्र नि प्रशांत उभय रसांचे
मिश्रण केले कोणी

छान शब्दचित्र!

मनिष

लडाख/लद्दाख हा एक वेगळाच अनुभव आहे...