Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शतकापूर्वीचे मराठा युद्धस्मारक .

क
कर्नलतपस्वी
Tue, 10/18/2022 - 08:51
संदर्भ आणी आभार :- The Armies of India, Author- Major MacMunn and Major Lovett- Published in the year 1911. अंतरजालावर उपलब्ध असलेली माहीती. संबधीत विषयावर केलेले वाचन. लेख लिहिण्यामागे व्यवसायीक उद्देश नसून केवळ ज्ञानवर्धन,मनोरंजन आणी इतीहासात डोकावणे आहे. कृपया लेखाचे संपुर्ण अथवा काही भाग पुर्नप्रकाशीत करू नये. डिसक्लेमर:- काॅपिराईट्स कायद्याचे पालन करण्याची पुर्ण काळजी घेतली आहे. यदा कदाचित अनावधानाने उल्लंघन झाले असल्यास क्षमस्व. प्रस्तावना एरवी उपाख्य नावाने एकमेकांना ओळखणारे मिपाकर एकत्र पुणे कट्ट्यावर जमले तेव्हां तुम्ही कोण, कुठले इत्यादी व्यक्तिगत विषयावर बोलत असताना (सर्वथा अपरिचित तरीही परीचीत म्हणूनअसे संभाषण होणे सहाजिकच),पुण्यातील वेगवेगळ्या स्थळां बद्दल जसे पेठा, वाडे ऐतिहासिक स्थळे व त्यांचे आजचे स्वरूप यावर उहापोह झाला.संभाषणात अबा (अमरेन्द्र बाहूबली) यांनी विचारले छावणीत कसले युद्धस्मारक आहे ? स्मारका बद्दल माहित होते,वाटले यावर एक सुंदर लेख लिहीता येईल ज्यामुळे पुण्यामधील मिपाकरांना स्मारकाला भेट देण्याची इच्छा होईल व इतर सदस्यांना माहीती मिळेल.मराठी वीरांनी गाजवलेल्या शौर्याचा इतीहास आहे.कृपया या बद्दल राजकीय मते प्रदर्शित करू नये. पहिल्या विश्वयुद्धा नंतर पुण्यात पहिल्यांदाच उभारण्यात आलेले मराठा युद्धस्मारक,केवळ पंधरावीस मिनीटाची भटकंती + प्रवासाचा वेळ मीळून फारफार तर तास दिड तास पण कितीतरी नवीन माहीती देऊन जाते. म्हणूनच कवी मोरोपंत यांचे शब्द यथार्थ वाटतात. 'केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।' प्रथम विश्वयुद्ध हा मराठा सैनीकांचा पहिला वहिला अतंरराष्ट्रीय युद्धानुभव होता.विषय फारच मोठा आहे पण तो फक्त पुण्यातील युद्ध स्मारका पुरताच मर्यादित आहे. विश्वयुद्धात भाग घेतलेल्या मराठा पलटणींची नावे,युद्ध क्षेत्र, त्यांनी मिळवलेले सन्मान याची अतिशय संक्षिप्त,संकलीत माहीती देण्याचा प्रयत्न करत आहे.हे युद्ध स्मारक पुण्यातील या प्रकारचे प्रथम स्मारक आहे. विश्वयुद्धात भाग घेतलेल्या मराठा पलटणी • ३१वी ड्यूक ऑफ कॅनोट लॅन्सर्स . ३री रॉयल सॅपर्स व माईनर्स १०१वी ग्रेनडियर्स १०३ वी मराठा ला इ १०५वी मराठा ला इ १०९ वी इन्फन्ट्री ला.इ. ११०वी मराठा ला.इ. ११७वी रायल मराठा १२१वी पायोनिअर्स १२८ वी पायोनिअर्स १०७ वी पायोनिअर्स १०८वी इन्फन्टी ला.इ. ११४ वी मराठा ११६ वी मराठा ११७ वी मराठा सर्व चित्रे वरील संग्रही असलेल्या पुस्तकातून.थोडीच चित्रे डकवत आहे. युद्धस्मारकाची छायाचित्रे मात्र तीथे जाऊन घेतली आहेत. mipa******mipa mipa*****mipa इ.स.१९१४ ते १८ या कालावधीत झालेल्या प्रथम विश्व युद्धात अंदाजे दहा लाख ब्रीटीश शासित भारतीय सैनीकांनी विवीध विदेशी भुमीवर (थिएटर ऑफ ऑपरेशन) पराक्रम गाजवला. या कालावधीत त्यापैकी चौर्याहत्तर हजार सैनीकांनी आपले बलिदान दिले.या साठी त्यांना व्यक्तिगत शौर्य पदके व पलटनला युद्ध सन्मान दिले गेले (सैनीकांची संख्या अंतरजालावर वेगवेगळी दिलेली आहे.) मराठा पलटणींचे युद्ध क्षेत्र. • बसरा (Basra) • टेसीफाॅन( Ctesiphon) • कुट-अल-अमरा (Kut-al-Amara) • बगदाद (Baghdad) • शरकत (Sharqat) • मेसोपोटेमिया( Mesopotamia) पर्शीया (Persia ) • मेगीड्डो( Megiddo) • नाब्लूज (Nablus) • शारोन(Sharon) • पॅलेस्टाईन(Palestine) and उत्तर पश्चिम सीमेवर (North West Frontier) • मेसोपोटेमिया मधे सहा व सोळा नंबरच्या पुना डिव्हिजन्सनी भाग घेतला.जनरल टाऊनशेन्डच्या (General Townshend’s) नेतृत्वाखाली १०३,११० मराठा लाईट इन्फट्री व ११७ मराठा या पलटणींनी टिग्रीस नदीच्या जवळ खुप घमासान लढाई केली (Tigris River in battles of Qurna, Es-Sinn, Ctesiphon) आणी १०५ मराठा लाईट इन्फन्ट्री व ११४ मराठा पलटणींने जनरल अलेनबाय (General Allenby)यांच्या नेतृत्वा खाली पॅलेस्टाईन मधे 'ब्रिलियंट कॅम्पेन' मधे मोठा पराक्रम केला. ११६ मराठा पलटन पुर्ण चार वर्ष मेसोपोटेमिया युद्ध क्षेत्रात आणी दक्षिणी कुर्दिस्तान मधे यशस्वी पणे कठीणतम परीस्थीती हाताळली. • विवीध युद्ध सन्मान व शौर्य पदके. • पहिल्या महायुद्धात या युनिट्सना त्यांच्या सेवांसाठी विविध पुरस्कार मिळाले. • १) १०३,११० मराठा ला.ई. व ११७ मराठा पलटणींना 'युद्ध सन्मान (Battle Honour) टेसीफाॅन ( Ctesiphon) ने अलंकृत केले. • २) ११७ मराठा पलटनला मेसोपोटेमिया क्षेत्रातील पराक्रमा बद्दल 'राॅयल', हे टायटलने सन्मानित केले. • ३) १०३ वी मराठा ला इ ला, • 6 IOMs, • 2 Croix-de-Guerre • ४) १०५ वी मराठा ला इ ला, • 3 DSOs, 4 MCs,3 IOMs, • 5 IDSMs • ५) ११०वी मराठा ला.इ., • 1 DSO, 3 MCs, 1 OBI, • 6 IOMs, 7 IDSMS, • 1 रोमानियाचा क्राउन • ६) कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE) दिले जाणारे 116 वे मराठा युनिट एकमेव होते.याव्यतिरिक्त युनिटला आणखीनही व्यक्तिगत सन्मान प्राप्त झाले. • 2 DSOs, 2 MCs, • 1 OBI, 5 IOMS, • 14 IDSMS ही न संपणारी मोठी यादी म्हणून इथेच थांबावे लागेल. मेडल्सचे सम्पूर्ण नाव खालील प्रमाणे आहे. DSO-Distinguished Service Order. OBI-Order of British India. IDSM-Indian Distinguished Service Medal. MC-Military Cross. IOM-Indian Order of Merit. युद्ध स्मारक mipa*****mipa हे युद्ध स्मारक शुरवीर मराठा सैनिकांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या सहकाऱ्यानी बांधले आहे. स्मारकासाठी युद्धात भाग घेतलेल्या मराठा पलटणी तत्कालीन स्थानिक संस्थानिकांनी उभारलेल्या निधीतून बांधण्यात आले. १९ नोव्हेंबर १९२१ ला प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भूमीपूजन केले.यांचे नाव व इतर विवरण स्मारकाच्या खाली कोरले आहे. प्रथम हे स्मारक शनिवार वाड्या समोर उभारण्यात आले होते.या स्मारकाची रूपरेखा (Designe)ऑकाॅट,भुटा आणी कारपेन्टर (Architects) मुबंई यांनी तयार केले. बांधकामा करता कृष्णाजी रामकृष्ण आणी कंपनी यांना ठेका दिला होता.या दोन्ही कंपनीची नावे स्मारकाच्या खाली कोरलेली आहेत. हे स्मारक सुद॔र ताशीव बेसाल्टच्या दगडात बांधले आहे.ब्रिटिश भारतीय सैन्य पुण्यात छावणीत रहात आसल्यामुळे सैनीकांना प्रेरणा मिळावी म्हणून १९३१ मधे स्मारक मुळ जागेवरून छावणीतीलआताचा डाॅ. बानू कोयाजी रस्ता (तेव्हांचा अर्सनेल रस्ता,नंतर मोलेदिना रस्ता) व अंबेडकर रस्ता जीथे मीळतो तीथे वाहतुकीच्या त्रिकोणी बेटावर आहे. तिन्ही बाजुने उंच अशोकाची झाडे व सर्व बाजुने दगडी भिंतीचे कुंपण आहे. याचे गेट अंबेडकर रस्त्यावर आहे. mipa*****mipa तीन कोपऱ्यांवर जुन्या तीन मुघल कालीन ठेवलेल्या तोफा मुघल बादशाह औरंगजेब अलमगीरच्या तोफखान्या मधील आहेत.एका तोफेचे नाव "फतेह कुशा",म्हणजे विजय मिळवून देणारी असे आहे.तोफेवर औरंगजेबाचे नाव व पदव्या मुद्रित आहेत. ही तोफ मुहम्मद अली अरब याने इसवी सन १६६७/८ या वर्षात ओतली असे तोफेवर लिहिले आहे.तोफेत अकबरी वजनाप्रमाणे किती वजनाचा लोखंडी गोळा व दारु वापरावी हे पण लिहीले आहे. बाकी दोन तोफांवर एक जोडी सिंहाची बसलेली दिसते.या तोफा मराठ्यांनी मुघलांच्या तोफखान्यास शिकस्त देऊन जिंकून घेतल्या व पुढे इंग्रजानी मराठ्यांना हरवून आपल्या तोफखान्यात सामील केल्या. mipa**mipa mipa**mipa सौज्यन- संकलन निखिल परांजपे,कार्य: सकल मराठा समाज पुणे कॅन्टोन्मेन्ट स्मारकाचे स्वरूप कसे आहे हे चित्रावरून सहज लक्षात येईल त्यामुळे त्याचे वर्णन इथे करत नाही. • असेच दुसरे एक युद्धस्मारक ससून रुग्णालय व बंडगार्डन पोलीस चौकी जवळच ऑकाॅट,भुटा आणी कारपेन्टर (Architects) मुबंई यांनीच बनवले आहे. हे स्मारक साधारण पन्नास फुट उंच व आग्रा स्टोन मधे बांधले आहे.(आता याचा मुळ रंग व सौंदर्य कमी झाले आहे.) या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर लाॅर्ड जाॅर्ज लाॅयड यांनी २३-११-१९२२ या तारखेला केले होते.अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. mipa***mipa विषेश म्हणजे दोन्ही युद्धस्मारके आपली शंभरी पुर्ण करत आहेत.

प्रतिक्रिया द्या
560 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा