तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.

यामध्ये वेल्लोर, कांचिपूरम आणि महाबलीपूरम (मामल्लापूरम )या स्थळांना सप्टेंबरच्या (२०२२)शेवटच्या आठवड्यात भेट दिली होती. तिरुपतीची सहल याबरोबरच केली. तमिळनाडू भागात पावसाळा ऑक्टोबर ते डिसेंबर असतो. तर तिरुपतीला मॉन्सूनसह या महिन्यांतही पाऊस पडतो. चार पाच ठिकाणं घेण्याचा उद्देश असा की एखादं ठिकाण पावसामुळे रद्द झालं तरी इतर पाहून ऐंशी टक्के पर्यटन व्हावं. सर्व ठिकाणी देवळंच आहेत आणि शिल्पांची गर्दी. वेल्लोरचा किल्ला हे एक धार्मिक नसलेलं ठिकाण, परंतू या किल्ल्यातही एक सुंदर देऊळ आहे. ही धार्मिक ठिकाणं ऐतिहासिक कशी हा प्रश्न पडतो पण तिथे असलेले शिलालेख आणि काही शिल्पं इतिहासाची नोंद करतात.
तमिळनाडू राज्यात पाच प्रकारची पर्यटन स्थळे आहेत.
१) धार्मिक - देवळे. भरपूर आहेत आणि सर्व देवळे पुजेत आहेत. काहींना वारसास्थळे म्हणता येईल.
२) हिल स्टेशन्स . उटकमंडलम, कोडाईकनाल, येराकूड, वेलापराई वगैरे.
३)वने आणि निसर्ग. - मुदुमलाई, वेदांतंगल वगैरे.
४)भौगोलिक - कन्याकुमारी दक्षिण टोक, रामेश्वरम् सेतू वगैरे.बंदरं
५) ऐतिहासिक - किल्ले,बंदरं वगैरे. वेल्लोर, चेन्नई,पुमपुहार बंदर.
जावे कसे / सहल आराखडा
चेन्नई ते महाबलीपूरम ६०किमी.
चेन्नई ते कांचिपूरम ७५किमी.
चेन्नई ते वेल्लोर १४०किमी.
कांचिपूरम ते महाबलीपूरम ७०किमी.
कांचिपूरम ते वेल्लोर ७०किमी.
कांचिपूरम ते तिरुपती (आंध्रप्रदेश ) १२० किमी
राहावे कुठे?
सर्व बजेटची हॉटेल्स आणि लॉजही आहेतच. कांचिमध्ये राहिल्याने देवळे बघणे आणि वेल्लोर,महाबलीपूरम पाहून येणे सोपे झाले. या भागांत रस्ते चांगले मोठे होते आणि ट्राफिक नव्हते.
ही अंतरे पाहिल्यावर असा विचार येईल की फ्लाइटने चेन्नई गाठावे, तिथे राहावे आणि रोज एका ठिकाणी जाऊन परत चेन्नई हॉटेलवर यावे. पण यात महाबलीपूरम ठीक आहे. कांचिपूरम शक्य नाही कारण तिथली देवळे अकरा ते साडेचार बंद ठेवतात. त्यामुळे कांचिपूरमला तीन दिवस राहाणे सोयीचे पडते. इथे जवळपास एक हजार देवळे आहेत. त्यातली पाच अगदी मुख्य. कांचि रेल्वे स्टेशन ते बस स्टेशन एवढ्या परिसरातच आहेत. तमिळ भाषेत 'कोईल' म्हणजे राजवाडा. पण आता देऊळ या अर्थी रूढ झालेला शब्द.
पहिला दिवस -
१.कामाक्षी अम्मन कोईल. - भाविकांचे आवडते. कांचिचे मुख्य देऊळ.
२.एकांबरेश्वरार -अति भव्य गोपूर, ३५०० (?)वर्षे जुने आंब्याचे झाड आहे. मोठ्या खांबांचा प्रदक्षिणा मार्ग.
#.कांचीकामकोटी पीठम.- आद्य शंकराचार्यांनी स्थापलेला मठ. ही इमारत आताच बांधलेली वाटते. जुन्या मठाभोवती बाधकाम वाढवत नेले असावे.
३. उलगराज पेरूमल कोईल ( वामनावताराचे देऊळ) . ही चारही कोईल जवळ जवळ आहेत.
दुसरा दिवस
कांचिपूरम ते चेंगलपट (चेंगलपट्टू), चेंगलपट ते महाबलीपूरम. सत्तर किमी.या प्रवासात वाटेत तिरुक्कुळकुंद्रन'ची टेकडी आणि गाव येते. (इथेच प्रसिद्ध पक्षीतीर्थ आहे. तिथे थांबलो नाही.)
सकाळी महाबलीपूरम जाऊन पाहून चार वाजता परत येताना कांचिपूरममध्ये असलेले
Mahabalipuram
((मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Mahabalipuram https://youtu.be/9CsZkXgcPZE ))
४) 'वरदराज पेरूमल कोईल' चार ते सहा पाहाणे. - पुजेत असलेले महा विष्णू मंदिर. इथे पुष्करणीत असलेल्या सभामंडपात शिल्पे आहेत. अखंड कोरीव चार दगडी साखळ्या आहेत. मंदिराच्या आत फोटोग्राफी करता येत नाही. मार्गात अंधार आणि गिचमिड आहे परंतू खूप भित्तीचित्रे आहेत. तसेच एक सोन्याचे पाणी दिलेली दीड फुटी पाल आहे त्याचे दोन रुपये तिकिट घेतात. विष्णू आणि पाल यांचा पौराणिक संबंध काय हे माहीत नाही. परंतू बऱ्याच विष्णू देवळांच्या भिंतींवर पाली कोरलेल्या सापडतात. हंपीतल्या उत्कीर्ण विष्णू मंदिरावरही पाल आहे. भाषेच्या अडचणीमुळे पुजाऱ्यांना विचारता आले नाही.
कांचितील देवळे.
(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Temples https://youtu.be/q0EzIZr-nY4 ))
तिसरा दिवस
सकाळी वेल्लोर आणि परत चारला आल्यावर कैलासनाथार कोईल. हे आणि वैकुंठ पेरूमल कोईल ही सर्वात जुनी देवळे आहेत.
कैलासनाथार कोईल. - आठव्या शतकातील द्रविड शैलीतील छोटेसे मंदिर. जे भव्यतेत नाही ते इथे शिल्पकलेत साधले आहे. वालुकाश्म दगडातली शिल्पे झिजू लागली आहेत. ठसठशीत मोठी ५८ शिल्पे. मूर्तींवर भाव आहेत. एकूण तीन भाषांत शिलालेख आहेत.जुनी तमिळ,जुनी उडिया आणि संस्कृत. ऐतिहासिक वारसाच. दिवसभर पाहता येते. वेल्लोर रस्त्यावर 'काशिभिष्वर कोईल' (काशी विश्वेश्वर कोईल) आहे तिथून दोन किमी आत कैलासनाथार कोईल आहे.
वेल्लोर आणि जलकंठेश्वर
(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Vellore fort and Jalkantheshwar koil. https://youtu.be/HcvFglGMlHY ))
Photo slideshow, Kailasnathar koil.
(( मोबाईलवर पाहण्यासाठी लिंक
Kailasnathar koil. https://youtu.be/8aAFUti_eco ))
वैकुंठ पेरूमल कोईल - हेसुद्धा आठव्या शतकातील आहे पण वेळेअभावी पाहायचे राहिले.
चौथ्या दिवशी
कांचिपूरम ते तिरुपती. तिथे दोन दिवस राहून घरी परत.याचा दुसरा वेगळा लेख लिहिला आहे.
सप्तपुरींतील एक कांचिपूरम म्हणजे खूप जुने शहर. धार्मिक आहेच पण रेशमी वस्त्रे उद्योगही जुनाच आहे. तो पाहिला नाही परंतू कांचिपूरम पद्धतीच्या(कृत्रिम रेशमाच्या) साड्या हजार - दोन हजारांत मिळतात त्या सहा घेतल्या. खऱ्या रेशमाची साडी पंचवीस हजारांपुढे सुरू होते. कांचिमध्ये भाषेची अडचण येते.तमिळच बोलतात. साडी दुकानदार मात्र हिंदीत बोलतात. थोडी तात्पुरती तमिळ शिकलो ती बोललो.
(Learn Tamil through English, by Agurchand Babu channel.)
खादाडी -
एका ओळीत सांगायचं तर रसम, सांबारम, भातम. इटली, वडै, डोसै.
इतर टिप्पणी -
तमिळनाडूत गेलो नव्हतो. (म्हणजे तसं उटी आणि कन्याकुमारी झालं होतं) पण ,मदुरै,रामेश्वरम् करण्याचा विचार होता. ते खूप दूर आहे. अगोदर जवळचे पाहू आणि ठरवू म्हणून ही सहल काढली. त्यावरून देवळांची कल्पना आली. मदुरै,रामेश्वरम् जाण्याची गरज नाही हे ठरले. चेन्नई तर शहरच आहे ते बादच केले. देवळे आणि शिल्पे आवडत नसतील त्यांनी ही सहल करू नये.
फोटो - लेखामध्ये अडिचशे फोटो देणे शक्य नाही म्हणून फोटो स्लाईड शो करून यूट्यूबवर देण्याचा नवीन प्रयत्न केला आहे. शिल्पांची थोडी कल्पना येईल हा हेतू. शिल्पांचे फोटो असल्याने पोर्ट्रेट आस्पेक्ट ३:४ मध्ये काढले आहेत. मोबाईलवर बरे दिसतात. प्रयोग आहेत. सुधारणा करू. सवडीने पाहा आणि अभिप्राय द्या. फोटोंना क्रमांक दिले आहेत त्या संदर्भाने विचारणे सोपे जाईल. जीमेल स्टोरेज १५जीबी फ्री असले तरी अडिचशे फोटोंनी बाराशे एमबी अडवले असते आणि लेखात दहा पंधरा फोटो देऊन चालणार नाही म्हणून स्लाईडशो. विडिओ काढले आहेत पण ते जोडण्याचे सॉफ्टवेअर मोबाईलला नसते. असो. ______________________ भटकंती सदरात लेख लिहिता येत नसल्याने इथे देत आहे.

२) कांचितील देवळे.
३) वेल्लोर आणि जलकंठेश्वर
४) Photo slideshow, Kailasnathar koil.