गेली १७-१८ वर्षे सेंद्रिय शेती अभ्यासगटाला माझे जाणे होते. दोन महिन्यांतून एकदा होणार्या या बैठकांमध्ये अनेक मित्ररत्ने भेटली. यातला प्रत्येक सेंद्रिय शेतकरी हा जणू एक पुस्तकच आहे आणि त्यांना वाचण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. गावोगावी, छोटी-मोठी सेंद्रिय शेती करत, निसर्गाच्या सानिध्यात राहणारी ही माणसे. गटाचे मुख्य प्रवर्तक शितोळेसाहेब, हे एक अफलातून रसायन. त्यांच्याविषयीही लिहिण्यासारखे खूप आहे. त्यांनी इतकी निखळ मोलाची माणसे एकमेकांशी जोडली आहेत, की आपण त्यांचे मित्र आहोत, याचा आपला आपल्यालाच हेवा वाटावा. अशाच एका बैठकीत दोन दिवस शांतपणे प्रत्येक प्रयोग, चर्चा, मांडणी ऐकत मागच्या रांगेत बसलेल्या एका व्यक्तिमत्त्वाने लक्ष वेधून घेतले. वाढलेले करडे केस, लांब दाढी आणि पायजमा शर्ट घाललेल्या त्या माणसाने जणू घोंगडीचेच शिवले असावे असे अत्यंत भरड कापडाचे जाकीट घातले होते. काहीच बोलला नसल्याने हा माणूस कोण, कसा, याची उत्सुकता मनात दाटून आली होती. येताना गाडीत शितोळेसाहेबांनी सांगितले, की मागच्या पाचगणीच्या बैठकीहून येताना त्या माणसाने त्यांना हळूच विचारले, की मी गाडीतून पुण्याला येऊ का? तो माणूस पुण्याला आला आणि मंडईतून ७५ ताटे, वाट्या, पेल्यांचा संच घेऊन गावी गेला. एवढी ताटे-वाट्या कशासाठी? तर गावातल्या शाळेतील मुलांना जेवण्यासाठी. त्याने ही आपल्या गावच्या शाळेला भेट दिली. वर वर पाहताना फाटका वाटणारा हा उमदा माणूस म्हणजे शिरीष पवार!
पुढच्या एका बैठकीत आंम्ही शिवारफेरीचे नियोजन केले होते. त्या वेळी सगळ्यांच्या शेतावर फिरत असताना, मुक्कामाच्या ठिकाणीही शिरीषजी काही बोलले नाहीत, पण मला उत्सुकता गप्प बसू देत नव्हती. त्यांना त्यांच्याविषयी काही विचारले की तेवढ्यापुरते उत्तर देऊन स्वारी गप्प गप्पच असायची. नंतर त्यांनी हातात एक कागद ठेवला. स्वत:बद्दलची ७-८ ओळी माहिती लिहिली होती त्यात. ती वाचून उडालोच! - १९९३पासून सेंद्रिय शेती करत आहे. - नांगरट करत नाही. - शेतीत बैलांचा वापर करत नाही. - गाई-म्हशी इ. जनावरे पाळत नाही. - गेली आठ वर्षे एकच चप्पल वापरात. - एकच बाहेर घालण्याचा पोशाख - पायजमा शर्ट - स्वत:चे वाहन - सायकल - घड्याळ वापरत नाही. असे काही मुद्दे. मग माझ्या लक्षात आले की चपलांच्या ढिगात हाताने शिवल्यासारखी दिसणारी, ट्रकच्या जुन्या टायरपासून बनवलेली जी चप्पल आहे, ती शिरीष यांचीच. विना-नांगरट शेती आत्ताही खूप कमी लोक करतात, तेव्हा तर हे दुर्मीळच. पण तण, गवत ही जमिनीची सख्खी लेकरे असून आपण लावलेले पीक हे तिच्यासाठी सावत्र, हे शिरीषजींना पक्के उमजलेले होते. त्यांची हत्या होऊ नये, म्हणून नांगरट न करताच पेरणी. मला वाटायचे बैल, गायी म्हशी हे तर शेतकर्याचा गोतावळा, त्यावर किती प्रेम असते शेतकर्याचे. पण शिरीषजींच्या मते शेतकरी श्रम काढून घेण्यासाठी, दूध, शेण यासाठीच गुरे पाळतो. दूध गाईच्या वासराचे. ते आपण चोरायचे? एवढीच दुधाची आस असेल, तर ज्याने त्याने आपआपल्या मादीचे दूध प्यावे, इतके कठोर मत. पुढे मग बहुतेक शेतकर्यांचा दुधाचा धंदा कसा आतबट्ट्याचा होतो आणि शेतकर्याने गाय पाळलीय की गाईने शेतकरी, हे समजत नाही, हे पाहिल्यावर गटातल्या अनेकांना ते वेगळ्या मार्गाने का होईना, पटत चालले आहे. १९९०च्या सुमारास इंजीनिअरिंगचा डिप्लोमा झाल्यानंतर शिरीष यांनी महाराष्ट्र वीज मंडळात काही वर्षे नोकरी केली. नंतर वडिलांचे निधन झाले व घरच्या काही अडचणींमुळे ते कराडजवळच्या त्यांच्या गावी परतले आणि शेती करू लागले. त्यांच्याशी बोलताना जाणवले की त्यांना चांगली इंजीनिअरची निमसरकारी नोकरी सोडून शेतीत पडल्याची खंत अजिबात नाही. नाहीतर आजकालचे छोटे शेतकरी म्हणजे इतर काही जमले नाही, म्हणून बहुतेक नाइलाजाने शेती करणारेच फार. शेतकर्यांच्या मुलांनाही नोकरीचीच आस, भले त्यासाठी बापाचा एखादा जमिनीचा तुकडा विकावा लागला तरी चालेल. दरम्यान आमच्या दोन महिन्यांतून एकदा होणाऱ्या सेंद्रिय शेती अभ्यासगटाच्या बैठका सुरूच होत्या. शिरीषजी प्रत्येक बैठकीला येत असत, पण बोलणे अत्यंत कमी. एकदा असेच कधी पोहोचलाय म्हणून विचारले, तर म्हणाले परवाच आलो. झाले असे की कराडहून सासवडला सायकलीवरून यायला दोन दिवस लागतील, मध्ये एक मुक्काम होईल असे अशा बेताने त्यांनी प्रवास सुरू केला, पण ते त्याच दिवशी संध्याकाळी बैठकीच्या जागी पोहोचले. मध्यम उंची, ६० किलोच्या आतच वजन, ५०च्या आसपास वय असलेल्या या माणसाचा फिटनेस बघून मी चाटच पडलो. नाहीतर २१ गिअर्सची सायकल पाचपन्नास किलोमीटर चालवून सोशल मीडियावर धबाधबा फोटो टाकणारे भरपूर मित्र आहेतच. जेवढे या माणसाविषयी समजेल, तेवढी उत्सुकताच वाढत चालली. पण असा माणूस समजून घ्यायचा, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातच. म्हणून त्यांच्या शेतावर एक दिवस न सांगताच हजर झालो. न सांगताच, कारण त्यांच्याकडे अजूनही मोबाइल सोडाच, लॅंडलाइनही फोन नाही. शोधत शोधत जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा शांतपणे लुंगी आणि बनियन घालून शांतपणे एक मराठी पुस्तक वाचत बसलेल्या शिरीष पवारांचे दर्शन झाले. जरी माझ्याजवळ डबा होता, तरी आग्रहाने त्यांनी भात भाजी खाऊन घातली. घरालगतची त्यांची छोटीशी शेती पाहिली. आंब्याची शंभर दीडशे झाडे चांगली लगडली होती. शेत रस्त्यालगतच होते. फळशेती म्हटले की राखण आलीच. पण यांच्या शेतीतली रस्त्याकडेची झाडे फारशी अपेक्षा न ठेवता, राखण, कुंपण न घालता त्यांनी सोडून दिली आहेत. राहतील ते आंबे आपले, असा खाक्या. काही झाडे लिंबाची. यातही सेंद्रिय शेती जगण्याचा अट्टाहास असा की फळे तोडायची नाहीत. लिंबाच्या झाडाखालून फक्त काठीने पडलेले लिंबू काढून घ्यायचे आणि कराडजवळ कडेपूरच्या स्थानिक बाजारात विकायचे. असे का? विचारले, तर म्हणाले, "फळ पिकलं की नाही, ते केव्हा तोडायचं, हे शेतकऱ्यापेक्षा झाडाला अधिक कळतं. आपलं काम फक्त फळं गोळा करणं! मी हिशोब, भाव वगैरे काही पहात नाही. ते सर्व बायकोच बघते" असे म्हणून ते पुढच्या मुद्द्याकडे वळले. आजकाल शेतीमालाचे बाजारभाव, हमीभाव, दलाल, जास्तीत जास्त माल बाहेर पाठवणे इ. कोलाहलात बाजाराकडे संपूर्णपणे पाठ फिरवून आपल्याच मस्तीत शेती करणारा माणूस लख्खपणे दिसला. मग आम्ही जवळच्याच त्यांच्या दुसऱ्या जमिनीच्या तुकड्यांचे निघालो. तेव्हा शिरीषजींची ती प्रसिद्ध चप्पल ते आता घालतील असे वाटत होते. पण ते अनवाणीच चालू लागले. म्हणाले की "मधल्या काळात ती चप्पल फाटल्याने काही दिवस अनवाणीच चाललो आणि नंतर चपलांची गरजच वाटेनाशी झाली. आता सगळीकडे अनवाणीच हिंडत असतो." पाय पोळणार, शेतात खडे, काटे बोचणार, हे असे कसे? विचारताच एक स्मितहास्य करून ते पुढे आणि आम्ही मागे चालू लागलो. तेच कपड्यांच्या एकुलत्या एका जोडाबाबत. शेतात तर पूर्ण कपडे लागतच नाहीत, त्यामुळे एकच बाहेर घालायचा जोड पुरतो, असे म्हणणे. त्यांच्या दिनक्रमाविषयीही जाणून घ्यायचे होते. ते सकाळी आठ साडेआठला काम सुरू करतात आणि जसे शेतात काम असेल तसे दिवसभर काम सुरू असते. मध्ये जेवायची सुट्टी. त्या वेळी आठवले की शिरीषजी घड्याळ वापरत नाहीत. त्यांनी सांगितले की पूर्वी साडेबारा-एकच्या सुमारास मी घड्याळ पाहून जेवायला सुट्टी करायचो. पण नंतर लक्षात आले, की भूक लागल्यावर जेवण्याच्या ऐवजी किती वाजले, त्यानुसार जेवायला बसू लागलो आहे. त्यामुळे जेवणे, झोपणे, उठणे यासाठी घड्याळात बघायचे सोडून दिले अन् घड्याळाची गरजच संपली. शेतकर्याचा दिवस म्हणजे काबाडकष्ट. त्यातून शिरीषजींसारखा माणूस असेल, जो कोणत्याही यंत्राची मदत शक्यतो न घेता काम करणार, तर खूपच कष्ट असले पाहिजेत. यावर त्यांचे म्हणणे मजेदार होते. सगळे शेतकरी रोज आपल्या शेताकडे बघतात आणि मनाशी विचार करतात, आज मला काय काम केले पाहिजे? मी शेताकडे बघतो आणि विचार करतो, आज मी काय नाही केले तर चालेल? काडातून क्रांती (One Straw Revolution) या पुस्तकात फुकिओका हेच तर सांगतात. वाटले, आम्ही महाराष्ट्राच्या फुकिओकांसमोरच उभे आहोत. शिरीषजी नियमित अभ्यासगटाच्या बैठकांना येतात, तेव्हा भेटी होतात. दिवसभराच्या काटेकोरपणे नियोजित सत्रांनंतर रात्री आमच्या मोकऴ्याढाकऴ्या गप्पांना रंग भरतो. असेच एकदा त्यांना विचारले की "तुम्ही आस्तिक की नास्तिक?" सेंद्रिय शेतीची आराधना मोठ्या निष्ठेने करत व्रतस्थ जीवन जगणार्या शिरीषजींनी उत्तर दिले, "नास्तिक!" मला नेहमीच वाटायचे की आस्तिक माणसाला काही पाप घडले, तर देवाला शरण जाऊन आपली चूक देवासमोर कबूल करून अपराधभावाचे ओझे डोक्यावरून उतरवण्याची सोय असते, पण नास्तिकाचे तसे नाही. त्याची काही चूक घडली, तर जबाबदारी त्याचीच. त्यामुळे नास्तिक माणूस अधिक नैतिक असण्याची शक्यता असते. त्यामुळे शिरीषजींच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले नाही. शिरीषजींचे सगळेच विचार बर्याच जणांना पटणार नाहीत, ते पटले, तरी एवढी आचरणक्षमता असणारा माणूस दुर्मिळात दुर्मीळ. म्हणून मातीत राहून फायद्यातोट्याचा फार विचार न करता अतिशय नैतिक आचरण करणारा, स्वत:विषयी अजिबात न बोलणारा आणि आजूबाजूच्या माणसांचे, प्राण्यांचे, निसर्गाचे कमीत कमी शोषण करून आपले साधे जीवन अगदी ताणरहित आनंदाने जगणारा हा शहाणा शेतकरी, पण वेडा माणूस माझा मित्र आहे. केवढे भाग्य!Breadcrumb
Error message
Warning: Undefined array key 1 in Drupal\Core\Plugin\Context\LazyContextRepository->getRuntimeContexts() (line 62 of core/lib/Drupal/Core/Plugin/Context/LazyContextRepository.php).
Drupal\Core\Plugin\Context\LazyContextRepository->getRuntimeContexts() (Line: 91) Drupal\block\BlockAccessControlHandler->checkAccess() (Line: 109) Drupal\Core\Entity\EntityAccessControlHandler->access() (Line: 329) Drupal\Core\Entity\EntityBase->access() (Line: 63) Drupal\block\BlockRepository->getVisibleBlocksPerRegion() (Line: 138) Drupal\block\Plugin\DisplayVariant\BlockPageVariant->build() (Line: 270) Drupal\Core\Render\MainContent\HtmlRenderer->prepare() (Line: 128) Drupal\Core\Render\MainContent\HtmlRenderer->renderResponse() (Line: 90) Drupal\Core\EventSubscriber\MainContentViewSubscriber->onViewRenderArray() call_user_func() (Line: 111) Drupal\Component\EventDispatcher\ContainerAwareEventDispatcher->dispatch() (Line: 186) Symfony\Component\HttpKernel\HttpKernel->handleRaw() (Line: 76) Symfony\Component\HttpKernel\HttpKernel->handle() (Line: 53) Drupal\Core\StackMiddleware\Session->handle() (Line: 48) Drupal\Core\StackMiddleware\KernelPreHandle->handle() (Line: 28) Drupal\Core\StackMiddleware\ContentLength->handle() (Line: 32) Drupal\big_pipe\StackMiddleware\ContentLength->handle() (Line: 201) Drupal\page_cache\StackMiddleware\PageCache->fetch() (Line: 138) Drupal\page_cache\StackMiddleware\PageCache->lookup() (Line: 87) Drupal\page_cache\StackMiddleware\PageCache->handle() (Line: 48) Drupal\Core\StackMiddleware\ReverseProxyMiddleware->handle() (Line: 51) Drupal\Core\StackMiddleware\NegotiationMiddleware->handle() (Line: 36) Drupal\Core\StackMiddleware\AjaxPageState->handle() (Line: 51) Drupal\Core\StackMiddleware\StackedHttpKernel->handle() (Line: 741) Drupal\Core\DrupalKernel->handle() (Line: 19)
Warning: array_flip(): Can only flip string and integer values, entry skipped in Drupal\Core\Plugin\Context\LazyContextRepository->getRuntimeContexts() (line 73 of core/lib/Drupal/Core/Plugin/Context/LazyContextRepository.php).

प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
वाह! असामान्य कर्तृत्व_/\_
धन्यवाद भक्तीजी
लेख आवडला.
उत्तम व्यक्तिपरिचय!
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व...
खरेच
अत्यंत विलक्षण
धन्यवाद
शिरीष पवार यांचे कौतुक वाटते.
लेखाचे शीर्षक सार्थ ठरवणारे 'शहाणा शेतकरी'
लेख आवडला ...
आभार
तेथे कर माझे जुळती
शिरीष पवार यांचा एक व्हिडिओ सापडला
छान
वा!
ठार वेडा माणूस!!
आधी केले मग सांगितले.......
वेगळा विचार
वा ! उत्तम