जे न देखे रवी...

साजणी आता इथे...

Primary tabs

साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.

बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फुललेली ही फुले केसात तू माळून जा.

माळता केसात सुमने गगन हे गंधाळले
गंध केसातील सारा या इथे उधळून जा.

एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये
एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.

चित्रगुप्त

चारी कडवी आवडली. तुमच्या कवितांमधे काहीतरी एक वेगळेपण जाणवते. लिहीत रहा.

श्वेता२४

माळता केसात सुमने गगन हे गंधाळले
गंध केसातील सारा या इथे उधळून जा.

आवडली

Deepak Pawar

चित्रगुप्त सर,श्वेता मॅडम मनःपूर्वक धन्यवाद.