जे न देखे रवी...
सय
Primary tabs
दसरा आणि दिवाळी
दोन सणांच्या मागोमाग
बहुदा केव्हातरी ती गेली
नक्की कधी ते माहीत नाही
पण लक्ष्मीपूजनाला दुपारी
हटकून तिची सय येते....
सूर्य अस्ताला जाईपावेतो
सबंध घरभर दाटून राहते
स्वतःपेक्षा अनेकपट वजन
वाहून नेणाऱ्या मुंगीसारखं
स्वतःला खेचून बाहेर आणताना
पापण्यांमध्ये आपसूक ओल येते
नकळतपणे पाझरणारे डोळे
संध्याकाळी रोषणाईच्या तेजाने
"दिपले" म्हणून इतरांपासून
लपवण मग तसं सोपंच जातं...
असताना कधीचं जाणवू ही न देता
माझ्या मार्गातील काटे वेचणारी ती
तिच्यामाघारी तिच्या आठवणीही
अबोल काळजी वाहताहेत माझी
#चक्कर_बंडा
तु गेल्यावर फिके चांदणे,
घर परसूनी सुने सुके,
मुले मांजरा परि मुकी
अन दर दोघांचा मध्ये धुके,
तु गेल्यावर..
तू गेल्यावर या वाटे ने
चिमणी देखील नच फिरके
कसे अचानक झाले नकळे
अवघे जग परके परके,
तु गेल्यावर.
बाकीबाब
कवीता आवडली.
कविता नि:शब्द करून गेली...