जे न देखे रवी...
उडून गंध चालल्या...
Primary tabs
उडून गंध चालल्या फुलास वाटते
तसे कसे सुने - सुने उदास वाटते.
कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा
झडून पान चालल्या तरुस वाटते.
पवन तुला करीत स्पर्श जातसे अता
दरवळला चहूकडे सुवास वाटते.
कशास जन्म हा जगून काढला इथे
उगाच का असे - तसे मनास वाटते.
निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी
तिथेच संपला असे प्रवास वाटते.
दीपक पवार.
चांगला प्रयत्न. कल्पना चांगल्या.
पहिल्या ओळीत खडा लागल्यासारखं होतंय. जरा बदल झाला तर पहावा.
तसंच मीटरही थोडं अजून कडक सांभाळायला हवं, गझल लिहिणार असाल तर. नाहीतर जरा इकडे तिकडे चालतं. पुलेशु.
राघव सर मनःपूर्वक धन्यवाद.
कविता. आवडली.
श्वेता२४ मनःपूर्वक धन्यवाद.
खूप छान रचना.