Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या आवडत्या तुनळी वाहिन्या कोणत्या?

र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 12/29/2022 - 12:29
💬 14 प्रतिसाद
आमची प्रेरणा-- ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे? नमस्कार मिपाकर ईतिहास काळात घरोघरी मंडळी लवकर रात्रीची जेवणे वगैरे आटोपुन पत्ते,कॅरम्,पट वगैरे खेळत बसायची म्हणे. गेला बाजार जेवताना किवा चहा पिताना एकमेकांशी गप्पा वगैरे मारायची. शेजार्‍या पाजार्‍यांकडे वर्तमानपत्र वाचायला किवा शिळोप्याच्या गप्पा मारायला, रमी किवा बुद्धीबळ खेळायला जायची. काहीच नसेल तर घरीच गॉसिपिंग करत बसायची. पुढे रेडिओ आणि मग टि.व्ही. आले, आणि रिकामा वेळ घालवायला माणसाला एकमेकांची गरज उरली नाही. आणि आता तर काय? स्मार्ट फोन आल्यापासुन रेडिओ,टि.व्ही. सगळे हातातच आले आहे. (त्यात मिपाही आलेच :) रेडिओ मस्त होते, जाता येता ऐकता यायचे. टि.व्ही. हे प्रकरण मला फारसे कधीच आवडले नाही. त्यातल्या त्यात एपिक्,डिस्कव्हरी,नॅट जिओ, हिस्टरी अश्या वाहिन्या कधी मधी बघतो, पण ते ठराविक कार्यक्रमासाठीच. एका जागी बसुन ३ तास चित्रपट किवा तासभर मालिका बघणे मात्र कधीच जमले नाही. अ‍ॅमेझॉन्/नेट्फ्लिक्स/हॉट स्टार वगैरे फार थोडा काळ वापरले,पण त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागत आणि ते सतत वाढत गेल्याने हळुहळु बंद केले. मात्र वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यापासुन दोन मीटिंगच्या मध्ये किवा ईतर वेळी करमणुक म्हणुन चकटफु तुनळीवरचे कार्यक्रम बघता बघता अनेक चॅनल सबस्क्राईब करत गेलो आणि काही चॅनलवरचे आशय खरोखरच आवडु लागले. असे काही चॅनल्स खाली देत आहे. मिपाकरांनी त्यात भर घालावी ही सर्वांना विनंती न्युज वि ऑन वैचारिक थिंक बँक बोलभिडु भटकंती रानवाटा मुक्ता नार्वेकर झुंजारमाची पाककृती वाह रे वाह मधुरा किचन तबला तेज सिंग शेअर्स लेट्स क्रिएट वेल्थ याशिवाय काही कामाचे टेक्निकल चॅनल्स, दुरदर्शनचे जुने कार्यक्रम (भारत एक खोज, गजरा, जुन्या मुलाखती,सुरभि वगैरे), गाण्याचे चॅनल्स, बागकामाबद्दल्चे चॅनल्स, स्टोरी टेलिंगचे चॅनल्स, वैद्यकिय ज्ञान देणारे चॅनल्स एक ना दोन. तर असेच चांगले आणि आपापले आवडते चॅनल्स मिपाकरांनी इथे या धाग्यावर शेअर करावेत अशी विनंती करुन ईथेच थांबतो.

प्रतिक्रिया द्या
4600 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
वामन देशमुख गुरुवार, 12/29/2022 - 12:57 नवीन
तेलुस्को (मराठी: जाणून घ्या) ही वाहिनी सॉफ्टवेअर टेकनॉलॉजीज् प्राथमिक स्तरावर शिकण्यासाठी उपयुक्त आहे. तिथला, अजाइल् ची तोंडओळख करून देणारा हा विडिओ, उत्सुकांना कदाचित आवडेल. --- अवांतरः विडिओ या माध्यमात मला फारसा रस नाही म्हणून मी या धाग्यात फार काही भर घालू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 12/29/2022 - 17:53 नवीन
या श्रेणीत याहु बाबा https://www.youtube.com/@YahooBaba व ड्ब्ल्युएस क्युब https://www.youtube.com/@wscubetech ला कोणीच तोड नाही. हे जुने खिलाडी आहेत, मला आठवत हा त्यांच्या मानाने हा खुप नविन युट्युबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
क
कंजूस गुरुवार, 12/29/2022 - 15:28 नवीन
पाककला, भटकंती , बागकामांचे चालेल सारखे बदलावे लागतात. महिन्यातून एखादा विडिओ टाकणारे बरे. रिपेरिंगसाठी zero lab
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 12/29/2022 - 17:47 नवीन
असा धागा काठल्याबद्दल धन्यवाद. माझी कितीतरी जास्त युट्युब चॅनल्स आवडती आहेत. त्यातली काही खुप आवडती व युनिक चॅनल्स शेअर करतो सहाजिक आहे कोणालाही आवडतील अशी आहेत. न्युज : विओन कॉमेडी ; सोनी मराठी 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' आणि 'हींदी काउंटडाउन' फार ईंटरेस्टींग वाटते. पाककृती : 'गोलगप्पा गर्ल' ' माय रुरल लाईफ' (https://www.youtube.com/@Myrurallife) मराठी पाकृसाठी सोप्पे व हटके (https://www.youtube.com/@Maharashtrian_Recipes_Latika) भटकंती : क्रेझी अबाउट फीशींग अँड कुकींग, ईंग्लिश पिक्चरचे हींदी मध्ये एक्सप्लेनेशन : व्हायपर एक्सप्लेन्ड.https://www.youtube.com/@ViperExplained हाहाहाह्हाह्हा ह्याचे जुने चकी टॉय स्टोरीचे व्हीडीओ धमाल आहेत. हे चॅनल कुठल्या यादीत येईल माहीती नाही पण त्या एकट्या, छोट्याश्या बाईचे शेति करणे, पिक काढणे व ते नंतर मार्केट मध्ये जाउन विकणे, अगदी पुर्ण माल विकला जाईपर्यंत व्हीडीओ बनवने नंतर घरी येउन सर्व पाळिव प्राण्यांना आलेल्या पैशातुन खायला घालणे. आणि हे सर्व एकटेच राहुन करणे. त्या व्यक्तीचे दीसणे व एकुण पर्सनालीटी फार मजेशीर आहे.https://www.youtube.com/@AnhBushcraf मी हल्लीच हे चॅनल बघणे सुरु केले आहे पण मला हे फार आवडते. अशी खुप चॅनल्स आहेत वेळ असेल तेव्हा लिहेन. ईतरांनी ही अशी माहीती नसलेली चॅनल्स कळवावी, मलाही काही नविन कळतील, मस्त धागा आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 12/29/2022 - 19:14 नवीन
मी सबस्क्राइब नाहीi करत. पण एखादा चॅनल रोचक वाटल्यास जनहितार्थ इथे शेअर करण्यात येईल :)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 12/30/2022 - 02:30 नवीन
'स्मृतिगंध' वाहिनीवर संगीतविषयक अत्युत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी 'साज-तरंग' या शीर्षकाखाली विविध वाद्यांवर प्रभुत्व असलेल्या वादकांच्या मुलाखती असून त्यात त्या त्या वाद्याविषयी साग्रसंगीत माहिती, त्या वादकाचे अनुभव कथन आणि वादन वगैरे खूपच सुंदर रितीने संगीतकार मिथिलेश पाटणकर सादर करत असतात. सध्या यावर असे ४२ विडियो उपलब्ध असल्याचे दिसते. Playlist: Saaz Tarang (42 videos 27,223 views Last updated on Aug 2, 2022) https://www.youtube.com/playlist?list=PLP86fkuqWUc1SRAPo2c5jMSJcBber0xaS Image removed. Chanel : SmrutiGandha @SmrutiGandhaMarathi. (67.8K subscribers) https://www.youtube.com/@SmrutiGandhaMarathi Image removed. -------------------------- याखेरीज आणखी पुष्कळ वाहिन्या मी सब्स्क्राईबलेल्या आहेत त्याबद्दल लिहीनच. हा खूपच उपयुक्त धागा काढल्याबद्दल राजेन्द्र मेहेंदळे यांचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 12/31/2022 - 13:14 नवीन
स्मृतिगंध आणि साजतरंग माझीही लाडकी आहेत. विशेषतः चर्मवाद्यवाले एपिसोड्स. म्हणजे तबला,ढोलक्,लोकतालवाद्य वगैरे आणि मिथिलेशचे सादरीकरणही मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
क
कर्नलतपस्वी Sat, 12/31/2022 - 14:04 नवीन
आजच शांताबाई शेळके याच्यावर श्रीधर फडके व डाॅक्टर समीरा गजरे जोशी यांचा कार्यक्रम ऐकला. सुंदर कार्यक्रम आहे. नेमका एक असा तुनळी कार्यक्रम नाही पण दिसतील ते टिकलत असतो. मनिश उमराणी यांचा कवी ग्रेस याच्या "ती गेली तेंव्हा" रसग्रहण तुनळीवर आहे खुप आवडले.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 12/31/2022 - 20:16 नवीन
प्रतिभा व प्रतिमा हा पण कार्यक्रम रविवारी असायचा व दर्जेदार असायचा असे तेव्हा ऐकलेले. पण अभ्यास, परीक्षा कॉलेजच्या या चक्रामुळे बघणे जमले नाही म्हणून नेहमीच खंत वाटायची आता काही जुने कार्यक्रम दिसले की बघतच असते, त्यांबद्दल आणखी माहीती कळल्यामुळे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 12/31/2022 - 20:16 नवीन
प्रतिभा व प्रतिमा हा पण कार्यक्रम रविवारी असायचा व दर्जेदार असायचा असे तेव्हा ऐकलेले. पण अभ्यास, परीक्षा कॉलेजच्या या चक्रामुळे बघणे जमले नाही म्हणून नेहमीच खंत वाटायची आता काही जुने कार्यक्रम दिसले की बघतच असते, त्यांबद्दल आणखी माहीती कळल्यामुळे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
N
nutanm Sat, 12/31/2022 - 20:25 नवीन
वरच्याच प्रतिक्रियेत समीरा गजरे जोशी हे नांव चुकीचे आहे असे वाटते ते समीरा गुर्जर जोशी असे आहे.त्या अंदाजे १९७९-८० पासून ते आतापर्यंत २०२२ पर्यंत अजूनही सह्याद्री वाहिनीवर मुलाखती घेत असतात.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Mon, 01/02/2023 - 11:36 नवीन
"द प्रिंट" हे आवडते आणि एकमात्र चॅनेल मला सजेस्ट करावेसे वाटते ... https://www.youtube.com/@ThePrintIndia
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 01/13/2023 - 11:56 नवीन
ध्रुव राठी : https://www.youtube.com/@dhruvrathee विग्यान टिव्ही https://www.youtube.com/@VigyanTvIndia झेम टीव्ही https://www.youtube.com/@ZemTV.Official
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sat, 01/14/2023 - 00:08 नवीन
प्रितिसाद देण्यास दाखवला जाणारा निरुत्साह बिल्कुल पचला नाही!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा