काही अपेक्षा.... मिपाकरांकडून
💬 प्रतिसाद
(63)
च
चंबू गबाळे
Mon, 12/15/2008 - 10:42
नवीन
तुम्ही इथे वावरता हे मिपाकरांचं दूर्भाग्यच म्हणायला हवं
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
- Log in or register to post comments
न
नीधप
Mon, 12/15/2008 - 18:01
नवीन
खरं बोललेलं पेलत नाही हेच खरं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 12/16/2008 - 08:48
नवीन
अज्जुका ह्यांच्या विचारांशी १००% सहमत.
इतर संकेत स्थळावर लिहिल्यावर, प्रसिद्धीच्या हावे पोटी मिपावर लिहिले, असे म्हणणे किंवा इतर संकेतस्थळावरील 'खरकटे' मिपावर सांडण्याचा उल्लेख मिपावर लिखाण करणार्यांवर अन्यायकारक आणि अपमानकारक आहे. ह्या विषयावर आधीही मी माझे मत मांडले आहे. मिपाच्या मालकांची ह्या गोष्टीला हरकत नसताना कोणाही सदस्याने आक्षेप घेणे हे मालकांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्यासारखे होईल. तात्यांनी त्यांचे विचार स्पष्ट केले आहेतच. त्यामुळे हा विषय संपला आहे असे मला वाटते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
- Log in or register to post comments
आ
आपला अभिजित
Mon, 12/15/2008 - 05:22
नवीन
मनोरंजन होतंय!
अजून येऊ द्या!!
- Log in or register to post comments
ध
धम्मकलाडू
Mon, 12/15/2008 - 07:15
नवीन
अजून यायला हवे. खूप्पच मनोरंजन होते आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
- Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE
Mon, 12/15/2008 - 10:29
नवीन
अज्जुकांचे बरोबर आहे..... लेख किती वेबसाईटवर प्रकशित करायचा हे लेखकाने ठरवावे, इतरानी नाही... आणि मुळात दुसर्या साईटवरपण इथले लेख प्रकाशित होतात, हे धोन्डोपन्ताना कसे समजले ? म्हणजे तेही दुसर्या साईटवर जात असणार ! वाचणारा दुसरीकडे जाऊ शकतो, मग लिहिणार्याने गेले तर बिघडले कुठे ?
- Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन
Mon, 12/15/2008 - 13:08
नवीन
एक विचार : क्रुपया व्यक्तिशः घेवु नये.
मुळात धोंडोपंत आपटे यान्चे हे मत एकान्गी आहे.
पुण्यात जश्या 'आमची कुठेही शाखा नाही'(आजही व्यापारात आपण किती मागे राहिलो आहोत याचे प्रदर्शन करित आहोत याचे ही भान नाहि) च्या पाट्या निर्लज्ज पणे लावण्याला आदर्श समजला जातो तसाच हा विचार आहे. आपले मत इतर कोठेही नोन्दवु नये अथवा ते केवळ इथेच नोन्दवावे असे म्हणने योग्य नाहीच.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Mon, 12/15/2008 - 13:20
नवीन
पुण्यात जश्या 'आमची कुठेही शाखा नाही'(आजही व्यापारात आपण किती मागे राहिलो आहोत याचे प्रदर्शन करित आहोत याचे ही भान नाहि) च्या पाट्या निर्लज्ज पणे लावण्याला आदर्श समजला जातो तसाच हा विचार आहे.
पुण्यातील व्यावसायीकांबद्दलचे आपले मत समजू शकतो. पण अनेकदा अतिशय प्रसिद्ध अश्या खाद्यपदार्थ बनवणार्या दुकानदाराचे कुठे शाखा नसते. पण त्याच्या कडून ते पदार्थ कुणी विकत घेऊन परस्पर जास्त किंमतीत (किंवा शिळे) विकू नये (तसे ग्राहकाला असमाजावे) या हेतूने अनेकदा त्या पाट्या लावलेल्या असाव्यात. अर्थात हा माझा अंदाज. ते व्यावसायीक निर्लज्ज असावेत असे वाटत नाही.
माझा हा प्रतिसाद मूळ लेखाला अवांतर आहे. यापुढे काही लिहायचे असल्यास ख.व.चा वापर करुया.
-- लिखाळ.
- Log in or register to post comments
क
कवटी
Mon, 12/15/2008 - 13:12
नवीन
वर जे लिहिले आहे ते पोटतिडकीने लिहिले आहे हे सांगायला नकोच. त्याचा स्तोत या संकेतस्थळाबद्दल आमच्या मनात असलेले प्रेम हा आहे , हे सुज्ञास समजेल अशी अपेक्षा आहे. काही त्रस्त संमंधांची कोल्हेकुई गृहीत धरली आहे.
कुणीतरी हे बोलायला हवं होतं. ते कार्य आम्ही केलं. वाईटाचे धनी होण्यात आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही.
नमोगतावर आम्हीही जात नाही पण तेच आमच्या परसात येतं कोंबडीसारखं.
तसे जर असते तर भेटणार्या प्रत्येकाला मिपाबद्दल सांगून इथे आणले नसते. ही भूमिका फार टोकाची आहे असे वाटते. मिपा वृद्धींगत व्हावे हाच उद्देश आहे म्हणून ही हळी दिलेली आहे.
असे स्वतःच स्वतःचे पवाडे कुठ बर गाता आले आसते? :/
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 12/15/2008 - 14:12
नवीन
कुणी कुठे लिहायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे.परंतु आपले लेखन करताना मी प्रथम अमुकतमुक ठिकाणी लिहले होते व आज इथे लिहित आहे ,असे करणे मनाला खुपच क्लेषदायक आहे.सर्वप्रथम मला मनोगत हे वाचायला मिळाले पन तिथे कोणाच्या तरी लेखनात मिपा बद्दल वाचले व इथे आलो.प्रथम भेटीत ,प्रथम नजरेत जे प्रेम होते तो प्रकार आपला मिपाबाबत झाला. आजकाल मी बाकी सर्व मराठी संस्थळे विसरुन गेलो हयाचे कारण म्हणजे मिपावरचे वातावरण.इथे कॉलेज कट्ट्यावरची खरी मज्जा अनुभवायास मिळते. तात्या,धोडोंपंत,अवलिया ,विप्र,कलंत्री,व पिडां काका सारखे अनुभवी लोक ,ज्याच्यावर कोणीही किती टिका केली तरी तेवढेच रागावुन परत एकरुप होणारी माणसे .बाकी खेळकर कट्टेकरी हे वातावरण इतरत्र अनुभवास येत नाही. मी दररोज काय वाचत बसतो बघुन माझे कितीतरी दोस्त इथे सभासद झाले आहेत.आपले लेखन इथे करताना ते अगोदर कुठे प्रसिध्द झाले ते सांगण्याचे टाळावे.तसेच जुन्या मिपाकरानी अधिकारने काही सांगितले तर त्याचे वाईट वाटुन घेवु नये.
(संपुर्ण मिपाकरी)वेताळ
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 12/15/2008 - 14:44
नवीन
तात्या,धोडोंपंत,अवलिया ,विप्र,कलंत्री,व पिडां काका सारखे अनुभवी लोक ,ज्याच्यावर कोणीही किती टिका केली तरी तेवढेच रागावुन परत एकरुप होणारी माणसे
धन्यवाद रे वेताळा.
अरे टिका करा जरुर करा... रागवा आमच्यावर...अरे तुमचा तो हक्कच आहे.
दोन तोंडात मारल्या तुम्ही तरी चालेल....
पण एक काम करा.... मनातला सल मनात ठेवु नका... बोलुन दाखवा.
अन बोलल्यानंतर, मारल्यानंतर परत सगळे विसरुन एक व्हा.
फक्त अबोला धरु नका. बास!
अरे दोन शब्द प्रेमाचे असो की भांडणाचे... शब्द जरुरी आहेत.
शब्दांवरच दुनिया आहे.. पण जर शब्दच संपले तर माणुस संपला. अवलिया संपला.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
म
मीनल
Mon, 12/15/2008 - 14:26
नवीन
एका ठिकाणी प्रकाशित झालेला लेख,कविता मिपावर प्रकाशित करूच नये असा काही नियम नाही.
तसे लेखन मिपावर केल्यास तसे सूचित करावे हा नियम मात्र आहे.
जर असे काही नियमात बसणारे असेल तर लेखकाला मोकळीक आहे की त्याने आधी कुठे लिहावे.ती मोकळीक असायलाच हवी.
पूर्वप्रसिद्धीचे संदर्भ दिले जातात त्यात मिपाची विलक्षण अवहेलना होते हे ही पटत नाही.
दुसर म्हणजे एका मिपाभक्त संपादकाने त्यांच्या अपेक्षा समोर मांडल्या.त्या पूण व्हाव्यात हाच हेतू आहे हे उघड आहे.
पण त्या पूर्ण काराव्यात की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
मला तरी वाटते की जोपर्यंत नियमात आहे तोपर्यंत काही आक्षेप नसावा.
ज्याला ते विचार पटतात ते करतील ,करतात सुध्दा.
आणि जे त्या अपेक्षा पूर्ण करत नसतील त्यांच्यावर वैयक्तिक हल्ल्याच्या हेतूने प्रतिक्रिया देऊ नयेत.कारण नियमात स्वातंत्र्य असायलाच हवे.
`मी करतो .तुम्ही ही तेच करा` अशी अपेक्षा करून ती पूरी व्हावी हा आग्रह किंवा अपेक्षा रास्त वाटत नाही.
आणि केवळ ` प्रथम मिपावर लेखन करून मग ते दुसरी कडे प्रकाशित केल्याने ` मिपावरची भक्ती प्रकट होत नाही.
मीनल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 12/15/2008 - 14:59
नवीन
आम्हाला असे वाटते की लोकांनी आता ही चर्चा थांबवावी. कारण सदर धागा हा मिपावरील लेखनाच्या धोरणांशी निगडीत आहे आणि त्याबाबत मालक या नात्याने आम्ही आमचे मत येथे या पूर्वीच मांडले आहे.
तरीही पुन्हा एकदा तेच मत मांडू इच्छितो की मिपाला फक्त मिपावर केल्या गेलेल्या लेखनाशी मतलब आहे. लेखकाने ते लेखन अन्यत्र कुठे प्रकाशित केले आहे अथवा नाही, वा करणार आहे अथवा नाही याच्याशी मिपाला काडीचेही देणेघेणे नाही..
त्याचप्रमाणे मिपावर लेखन प्रकाशित करतेवेळी ते लेखन अन्यत्र कुठे प्रकाशित झाले आहे, अथवा होणार आहे याबदलही काही सूचना देण्याचे कुणावरही बंधन नाही..
आमच्या मते हा खुलासा पुरेसा आहे. सबब, ही चर्चा थांबवायला हरकत नाही..
असो..
तात्या.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2