जे न देखे रवी...
पूर्वसंचित
Primary tabs
होत खळाळता प्रवाह
नदीच्या अंगा खांद्यावर
इवलेसे मुलं होऊन खेळावं
होत चमचमता प्रकाश
रात्रीच्या नभ अंगणात
शुभ्र टिपूर चांदणं व्हावं
घेत मखमल अंगावर
घुटमळत मनाच्या पायरी
लाडकी मांजर व्हावं
मांडावं, पुसावे कागदावर
पुढच्या वळण वाटेचे
जुळवत हिशोब राहावं
पूर्वसंचित फुलपाखरे
बसता कमल मनी
गहिवर ऊतू जावा...
-भक्ती
१२/०१/२०२३
हे आवडलं.
धन्यवाद सागर.
लिहिते राहा. फ़क्त मला ते शिर्षक आणि कवितेतला अर्थ
यांचा धागा काही जुळला नै असे वाटले.
उदा. ’असे व्हावे’ असे शिर्षक दिले असते तर चालले असते.
अर्थात, कवीच्या मनात तिसरं काहीच असतं म्हणा इतकेच.
कवितेच्या आशयाला दहा पैकी सात गुण दिले आहेत
तर शिर्षकाला दहा पैकी अडीच गुण दिले आहेत. :)
- दिलीप बिरुटे
वाह सर!
आठ गुण पाहिजे होते,माझा लकी आकडा :)
धन्यवाद.
जे घडतंय ते पूर्वसंचिताने होतं असं मानल्यास ,कवितेत मांडलय ते सर्व चांगल्या पूर्वसंचितामुळे घडावं असं कवियित्रीला वाटतंय :)
मन,बहु चंचल चपळ।
जाता-येता नलगे वेळ।।'
कवीता आवडली.
कर्नलजी धन्यवाद.
संचित पूर्व च असत. मग द्विरक्ती.
+१
धन्यवाद