जे न देखे रवी...

विसरून जाऊ सारे.....

Primary tabs

गुलाबी थंडी
हवेत गारवा
अंगावर रग
शेकोटीची धग

संक्रातीचा सण
सुगडाचं वाण
सवाष्णी सोळा
काळी चंद्रकळा

तीळाचा हलवा
हलव्याचे दागिने
तीळाचं दान
बाळाचं बोरन्हाण

बाजरीची भाकरी
तीळाची पेरणी
लोण्याचा गोळा
खिचडीचा मान

गुळाची पोळी
तीळाची वडी
हलव्याचा काटा
वाढवतो गोडी

तीळगुळ घ्या गोड बोला

सर्वांचे मनापासून आभार.

दोनच शब्द तीन आणी गुळ पण किती मोठा अर्थ. मनापासून मनाचा मनाशी संवाद साधणारा जणू पूलच. मुबंई च्या सी लि॔क किंवा कोलकात्यातील हावडा ब्रिज पेक्षाही सशक्त.

कवीता पण दोन शब्द जोडून बनवली आहे.

चित्रगुप्त

छान. बाळाचं बोरन्हाण सर्वात मर्मस्पर्शी.
दहा वर्षांपूर्वीचा आमच्या नातवाच्या 'बोरन्हाण' चा फोटो हुडकून पाठवेन.

चौथा कोनाडा

व्वा, मस्तच ... क्या बात कर्नल साहेब !

MKS127

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

Bhakti

काळी चंद्रकळा , अजूनही मनाजोगती ही साडी नाही मिळाली.खुप सुंदर असते ही साडी.आज काळ्या वस्त्रांचा विशेष मान :)

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

A