Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा एकदा पहाट झाली

स
सागरसाथी
Tue, 01/17/2023 - 04:12
गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते. गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते. आज सकाळी त्याच्या हाकेला दूरवरुन उत्तर आले, आणि थोड्याच वेळात आसमंत कावळ्यांच्या कर्कश्य गाण्यांनी गजबजून गेले. सगळं काही संपून गेल्यावर कोणी पुन्हा पुन्हा साद घालतो तेव्हा मनात येतं याला काही अर्थ नाही. हे किती खोटं आहे हे आज लक्षात आले. आपल्या गोड बोलण्याने किती उपयोग होतो ते देवालाच माहीत,पण कावळ्याच्या प्रयत्नाने आज त्याच्यासाठी पुन्हा एकदा पहाट झाली.

प्रतिक्रिया द्या
1179 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा