Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

च
चित्रगुप्त
गुरुवार, 01/19/2023 - 09:05
💬 21 प्रतिसाद
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही. त्यावरून आणखी आठवतं की- " ये चोली मेरी तंग होने लगी" हे तर फार म्हणजे फार दिवसातच बघितलेलं नाही. ते हुडकायला जातो तर दुसरंच काहीतरी उघडतं -- हात उंच करून प्राजक्ता माळी किंचाळत असते - "आणि कांजूर मार्ग - ईस्ट चा 'अक्षय कुमार' - बंडू बिल्लोरे... स्वागत करूया ... टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - मोबाईलचा चार्ज संपून तो निष्प्राण होतो... पिच्चरांमधल्या हिरो सारखं "ओ शिट" म्हणावं की आपलं साधं "धत्तेरी" म्हणावं- हे ठरण्याच्या आतच कडकडाट कानावर पडतो - "अहो किती वेळ बसणाराय अजून, मोबाईल घेऊन गेला असणार. निघा लवकर, मला जोरात लागलीय "... मी पटकन आटोपतं घेत - "नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा" असं म्हणत बाहेर पडतो. खरंतर मला यानंतर "तुम ने पुकारा और, हम चले आए " वगैरे पण म्हणायचं असतं, पण तेवढ्यात ती आवेगाने धावत येऊन आत शिरते... मग धीरोदात्त नायकाप्रमाणे मंद मंद पावले टाकत मी परत पलंगाकडे वळतो... तेवढ्यात - "आता परत झोपू नका, चहा ठेवा" असा कडकडाट होतो. - मग मी पुन्हा त्याच धीरोदात्त नायकाप्रमाणे मंद मंद पावले वगैरे टाकत - - किचनात जाऊन चहा ठेवतो. अशी ही आमची एक धुंद गुलाबी सकाळ. - आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेयर करा, कमेंट करा, आणि बेल-बटन दाबायला विसरू नका. (--- च्यामारी हे यूट्यूबचं व्यसन आता सोडायलाच पायजेल. सबस्क्राईब करा म्हणे )

प्रतिक्रिया द्या
7178 वाचन

💬 प्रतिसाद (21)
क
कंजूस गुरुवार, 01/19/2023 - 14:27 नवीन
झकास झटपट . लाईक करत आहे. सबस्क्राईब केले आहे. . . सिल्वर बटण मिळणार लवकरच. गोल्ड. .. प्लाटिनमही.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 01/20/2023 - 17:38 नवीन
@कंजूसः सिल्वर - गोल्ड - प्लाटिनम - ह्यो काय भालगड हाय, मज निरोपावे. लाईक सबस्क्राईब वगैरे केलेत ह्ये ब्येस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सौंदाळा गुरुवार, 01/19/2023 - 15:25 नवीन
जबरदस्त, अगदी असेच होते. आता ऑफीसला जायला लागल्यापासून कमी झाला हा प्रकार आमच्याकडे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 01/20/2023 - 17:43 नवीन
@ सौंदाळा : आपणासरिखे आणिक असती, मग कशाला मनात भीति ? तुमच्या प्रतिसादाने आश्वस्त झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/19/2023 - 17:06 नवीन
घरोघरी मातीच्याच चुली. केव्हातरी पहाटे उलटून रात गेली शारंगधर वटी ने अवचित जाग आली मिटले चुकून डोळे, बसता सुखासनी मी तेवढ्यात हाक कानी आली आटोपले का सर्व तुमचे? व्हा बाहेर झडकरी अन् ठेवा आधण चहाचे ऐकता हुकूम रणरागीणीचा कळले मला न केंव्हा उघडली चिटकणी दाराची उरले पोटात काही, आवाज Xदण्याचे तरी मला ढकलून ती आत गेली
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/19/2023 - 17:49 नवीन
लागू. मिपाच्या पूर्वीच्या 'तांबे' कवींना मागे टाकणार बहुतेक. तांबे कवींनी बऱ्याच काळाने खरडफळ्यावर जळजळ व्यक्त केली गद्यात. असो. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/19/2023 - 18:00 नवीन
काय बी समजलं नाय. उलगडून सांगता का? दैनंदिन कार्यक्रम म्हणून चार ओळी सुचल्या त्या खरडल्या. @राजेंद्र भौ,पहिल्यांदाच विमानात बसलो तेंव्हा टेन्शन आले होते. उंचावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणे..... बाकी अजुन तरी सब ठिक है...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चित्रगुप्त Sat, 01/21/2023 - 09:04 नवीन
@कर्नल साहेबः व्वा. मजा आली. 'सुखसारक' कविता आवडली. कर्नल दीवाने है मैफिल का मजा लेते है ... शारंगधर लेके प्रतिसाद दिया करते है ... सुबा सुबा एक 'वटी' लेते है, बंद ताला भी हो तो खुल जाता है ... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/19/2023 - 17:32 नवीन
लैच भारी!! प्रत्येक वयानुसार बदलते आवेग :) सकाळी सकाळी ज्याचे पोट साफ होते तो माणुस सुखी.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/19/2023 - 17:40 नवीन
रणरागीणीचा ऐवजी रणरागिणीचा वाचावे. शुद्धलेखन शिकण्यासाठी शिकवणी लावली आहे.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 01/20/2023 - 07:12 नवीन
भारी :=)
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 01/20/2023 - 07:41 नवीन
मस्तच :)
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 01/20/2023 - 11:24 नवीन
धुंद , गुलाबी सकाळ तर विनोदी निघाली की :))
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/20/2023 - 14:24 नवीन
खिक् !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 01/20/2023 - 18:56 नवीन
=)) भन्नाट एकदम
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Fri, 01/20/2023 - 19:40 नवीन
हा हा हा सुरेख
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 01/21/2023 - 09:19 नवीन
मस्त! काही वर्षांपूर्वी कॅन्डी क्रश खेळण्याचा प्रचंड नाद लागला होता तेव्हा असा प्रकार माझ्याबाबतीत घडायचा. खरंतर कार्यभाग साधण्यास दोन मिनिटेच पुरेशी असली तरी सर्व लाईफस संपेपर्यंत 'आत'च बसून राहायचो 😀
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 01/22/2023 - 05:44 नवीन
मस्त, खुसखुशीत! सकाळ लागायच्या आधी मोबाईल लागतो हे आजचं वास्तव, पुर्वी पेपर वर भागून जायचं!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 01/22/2023 - 05:45 नवीन
*सकाळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
स
सुखी Sun, 01/22/2023 - 12:40 नवीन
हेहे.. मस्त खुसखुशीत
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 01/23/2023 - 12:48 नवीन
आवडेश काका.... खुसखुशीत आहे रसाळ होता आले असते, जर अजून लिहिलं असते...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा