जे न देखे रवी...
हा उन्हाचा गाव आहे.
Primary tabs
हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे
का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे?
पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा
चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे.
शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो?
का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे?
जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली
पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे.
लाच घेऊनी अता विकती इमान आपुले
जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे.
हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा
का मनाने येथली ही गोठलेली माणसे?
सुरेख
अतिशय समर्थपणे मांडलेली वस्तुस्थिती. अनेक आभार.
सागरसाथी सर, चित्रगुप्त सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
गझल आवडली.
कानडाऊ योगेशु सर मनःपूर्वक धन्यवाद.
आवडली.
कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद
खुप दिवसांनी छंदाला धरुन लिहिलेली कविता वाचायला मिळाली. फक्त एक सुचवु का?
"लाच घेऊनी अता विकती इमान आपुले" ही ओळ "लाच घेऊनी अता विकती इमाने आपुली" अशी पाहीजे, म्हणजे नीट जुळेल.
राजेंद्र मेहेंदळे सर आपले मनःपूर्वक आभार.
मिपावर बहुतेक एडिट चा पर्याय नाही किंवा मला तरी माहीत नाही, परंतु आपण सांगितल्या प्रमाणे इतर ठिकाणी पोस्ट करताना बदल करतो.
धन्यवाद.
छान. आवडली.
वाह! ब-याच दिवसांनंतर इथे आले आणि छान कविता वाचायला मिळाली.
भागो सर, प्राची मॅडम आपले मनःपूर्वक धन्यवाद.
मस्त जमलीये.. रचना खूप भावली!
"उन्हाचा गाव" ही कल्पनाच खास!
रापली ही माणसे, हा उन्हाचा गाव आहे!
आणि मेघांनी नभाचा सोडला की ठाव आहे!
धावती ही माणसे, सावलीच्या वेगे मिषे,
पालवीचा तरुंवर येथल्या अभाव आहे.
नद्याही आटल्या अन आटली सरोवरे,
आवंढाही घशातच, सुकविण्याचा डाव आहे!
उष्माघात म्हणूनि नेले मला इस्पितळी, अन
सलाईनचा बाटलीतल्या थांबलेला स्त्राव आहे.
भारी गझलेला तेव्हढाच सुंदर प्रतिसाद.
मस्तय.
-दिलीप बिरुटे
राघव सर मनःपूर्वक धन्यवाद.
हणमंत सर सुंदर कविता.
धन्यवाद.
सुरेख. आवडली.
स्मिताके मॅडम आपले मनःपूर्वक धन्यवाद.
आवडली गझल.लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर मनःपूर्वक धन्यवाद.