Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शशक- निवडणूक

र
राजेंद्र मेहेंदळे
Sun, 01/22/2023 - 14:46
💬 6 प्रतिसाद
तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे. मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा. तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा. मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले. तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल. मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत? तो-- जास्त नाही. ५० लाख.

प्रतिक्रिया द्या
2436 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
कर्नलतपस्वी Mon, 01/23/2023 - 04:18 नवीन
खरेच आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 01/23/2023 - 06:18 नवीन
खरयं पण अजून थोडा वेळ आहे. महानगपालिका निवडणुका तारखा जाहीर होऊ द्या. नाहीतर २०२४ मधे तर नक्कीच. पण तेव्हा रक्कम जास्त असेल.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 01/23/2023 - 07:11 नवीन
कटू सत्य !
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 01/23/2023 - 07:30 नवीन
छान 👍
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 01/23/2023 - 13:15 नवीन
निवडणुकीची समर्पक नांदी ! स्मार्ट राजकिय लोक ! शशक आवडली. || पुशप्र ||
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/25/2023 - 13:35 नवीन
शशक आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा