जे न देखे रवी...

काहीतरी सलत असतं...

Primary tabs

काहीतरी सलत असतं
आपणास मात्र कळत नसतं
कुणाच्यातरी आठवणीने मन
आतल्याआत जळत असतं

होवून कधी बेभान
झुलत असतो
फुलासारखं आपण सुध्दा
फुलत असतो
कुठल्याश्या भासापाठी मन सारखं पळत असतं.

असं कसं कुणावरही
आपण प्रेम करुन बसतो
पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं
अन् आपण आयुष्यावर रुसतो
ती आपल्याला झिडकारते
किंवा तो आपल्याला झिडकारतो
कळत असून मन आपलं त्याच्याकडेच वळतं.

दीपक पवार.
https://youtu.be/vsStJxhSSDU

चित्रगुप्त

आवडली कविता. एक प्रकारचा निरागस भाव आहे, तो खासच.

"पण त्याचं आपल्याकडे लक्ष नसतं ... अन् आपण आयुष्यावर रुसतो"
हे असं केलं तर कसं वाटेल ? --
-- पण त्याचं आपल्याकडे लक्षच नसतं ... मग आपण आयुष्यावर रुसतो...

अफलातून कविता आहे. राजेंद्र भौ लि॔कबद्दल धन्यवाद.

दिपक भौ तरल लिहीता. पण खरंच का एवढं आयुष्य तरल असतयं.

अन् आपण आयुष्यावर रुसतो
म्हणतात आयुष्य एक प्रवास असतो
जाणारा क्षण पुन्हा येत नसतो
आयुष्यावर रूसून काही उपयोग नसतो
कारण तिच्या लेखी आपण कुणीच नसतो

Deepak Pawar

चित्रगुप्त सर, अत्रुप्त आत्मा सर, राजेंद्र मेहेंदळे सर, कर्नलतपस्वी सर आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
चित्रगुप्त सर आपण सांगीतल्या प्रमाणे बदल करतो.

भागो

छान
हुरहूर लावणारी.
युट्युब पण छान आहे.

चौथा कोनाडा

प्रेम हे असंच असतं,
दुर दुर पळतं
सारखं सारखं खुणावत,
एक दिवस अदृष्य होतं
आपल्याशी काहीतरी जोडत
आणि आपल्यातलं काही खोडत.

मस्त सुरेख कविता, दीपक पवार !