Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सावज-शशक(शत शब्द पेक्षा थोडेच जास्त)

क
कर्नलतपस्वी
Mon, 02/06/2023 - 13:41
💬 9 प्रतिसाद
ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस. दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय.... ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही. तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ...... तो दुर कोपर्‍यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता. अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला, "ए तू पेठेतला रोहनच ना! ऐकोणसत्तर बॅच...नुमवी.... मी "भवानी", तुझ्याच वर्गातली..." अय्या..!!!! किती दिवसांनी भेटतोय आपण!!!!!. पटकन त्याच्या गळ्यात पडली. मीठी मारावी की नाही या द्वीधा मनस्थीतीत तो बावळटा सारखा बायको कडे पाहू लागला.

प्रतिक्रिया द्या
3511 वाचन

💬 प्रतिसाद (9)
च
चित्रगुप्त Mon, 02/06/2023 - 15:46 नवीन
म्या अल्पमतीस काही समजले नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/06/2023 - 15:56 नवीन
कथेचा नीट अर्थ लागत नाहीये , बायको नवर्‍याच्या शाळेतील कोणत्यातरी "भवानी" नामक मुलीशी व्हॉट्सॅप्प वर गुलु गुलु करत होती , ते पाहुन नवर्‍याला वाटले की आपल्या बायकोचे बहेर काही लफडे चालु आहे की काय म्हणुन त्यांने बायको वर डाऊट खाल्ला , अन त्याला भेटायला बोलावले , पण प्रत्यक्षात भेटायला आल्यावर तो तो नसुन ती आहे अर्थात बायकोनेच शाळेतील कोणत्यातरी पोरीला "सेटिंग" करुन बोलावले आहे हे पाहुन नवरा द्विधा स्थितीत गेला . असा काहीस्सा अर्थ लागला. बाकी असं काही होत नसंतय ... हमे मालुम है जन्नत की हकीकत लेकीन , दिल को खुष रखनेके लिये गालिब ये खयाल अच्छा आहे ;)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 02/06/2023 - 16:30 नवीन
कंजूस भौ कथा अशी आहे, नवरा डाऊट खातो. बायको समजावते वर्गमित्र आहे पन्नास वर्षानंतर भेटलाय. नवर्‍याला विश्वास नाही. नवरा बागेत घात लावून बसलाय. त्याच वेळेस नवर्‍याच्याच वर्गातली मुलगी भवानी त्याला भेटते व डायरेक्ट गळ्यात पडते तेंव्हा नवराच सावज बनतो. इश्टोरी समजतो. Then they (husbandandWife)lived happily thereafter. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 02/07/2023 - 04:25 नवीन
फुसका फटाका नाही वाटला, बरी आहे! शिकारी खुद्द यहा शिकार हो गया... 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
प
प्रसाद गोडबोले Tue, 02/07/2023 - 09:35 नवीन
Then they (husband and Wife) lived happily thereafter.
हे कंसात (husband and Wife) टाकल्याने रसभंग झाला ;) तिघेही सुखाने एकत्र नांदले असते तर कथा जास्त 'रोचक' झाली असती ;) =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
प
प्राची अश्विनी Tue, 02/07/2023 - 06:28 नवीन
कळली आणि आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Tue, 02/07/2023 - 07:56 नवीन
आवडली शशक.
  • Log in or register to post comments
अ
अनंतफंदी Tue, 02/07/2023 - 09:37 नवीन
प्रतिक्रिया वाचुन अर्थ लागला
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Tue, 02/07/2023 - 20:55 नवीन
आयला! मला वाटले काही LGBTQ टाईप आहे का म्हणून दोनदा वाचली! स्वगतः बीबीशीवरच्या बातम्या अंमळ कमी वाचल्या पाहिजेत - साध्या शशक सुद्धा वेगळ्या चश्म्यातून दिसायला लागल्यात :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा