जे न देखे रवी...
साद
Primary tabs
कुठून येते हे धुके अन्
वेढते भवताल सारे
फिकटल्या चंद्रासवे मग
हरवती अवघेच तारे
कोन ढळती दशदिशांचे
वाट बिनचुक सांगणारे
अन् तमाच्या खोल डोही
वितळती दिग्बंध सारे
गडद ह्या छायेतळी जरी
उमगती गूढार्थ न्यारे
मर्म कोड्यांचे कळे परी
प्रश्न उरती टोचणारे
या धुक्याच्या पार वाहे
कोणती सरिता बरे?
त्या प्रवाही वाहताना
साद घाली कोण रे?
बेडुक ?
=))
लईच डेंजर प्रतिसाद 🤣
बहरहाल कविता आवडली.
सळसळते पिंपळ-पान,
वाऱ्यात भुताची गाणी ।
भिंतीवर नक्षत्रांचे,
आभाळ खचवीले कोणी ॥
कवितेतले एकंदरीत गूढ भयकारी वातावरण बघता एकादी हडळ, जाखीण, चुडैल वगैरे पिशाच्च योनीतील कुणीतरी साद घालत असावे. किमान ती मेणबत्ती घेऊन फिरणारी बाईतरी असावी, असे 'ह्यांचे' मत.
-- अक्कासाहेब पिशाच्चपुरीकर.
वाह!