Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शशक- निवडणूक २

र
राजेंद्र मेहेंदळे
Mon, 02/27/2023 - 01:38
💬 3 प्रतिसाद
आधीचा भाग शशक- निवडणूक आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो. कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल. आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी? कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो. आबा - काय भाव आहे यावेळी? कार्यकर्ता- ५०० रुपये. आबा खुशीत मिशीवर ताव देत बाईकवर बसतात. त्यांना मतदानकेंद्रावर सोडून कार्यकर्ता दुसरे गिऱ्हाईक पकडायला जातो. मतदानाच्या लाईनीत आबांची नजर चोहीकडे भिरभिरतेय. दूरवर दोन कार्यकर्ते उभे आहेत. त्यातला एक आबांना "किती?" असे खुणावतो. आबा १ बोट दाखवतात. कार्यकर्ता तत्परतेने २ बोटे दाखवतो. आबा खुशीत मिशीवर ताव देत मतदानकेंद्रात शिरतात.

प्रतिक्रिया द्या
2040 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ह
हेमंतकुमार Mon, 02/27/2023 - 04:00 नवीन
आवडलीच !
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 02/27/2023 - 04:09 नवीन
कसब्यात काहीबाही कुजबुज होती. कालचा अनुभव हाय का! मस्त......
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 02/27/2023 - 10:03 नवीन
आधीच लिवली व्हती, आज टाकली पघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा