जे न देखे रवी...
कुणासारखी तू, कुणासारखी...
Primary tabs
कुणासारखी तू, कुणासारखी
कधी वागते ना मनासारखी.
तू जळासारखी
तू पळासारखी
रंगीत गंधीत फुलासारखी.
तू परीसारखी
तू सरीसारखी
धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी.
गोड स्वप्नापरी
कि तू स्वप्नपरी
निघून जाणाऱ्या पळासारखी.
कुणासारखी तू, कुणासारखी
गारव्यात गारव्या सारखी
वणव्यात वडवानळा सारखी
आवडली.
कुणासारखी तू, कुणासारखी
वणव्यात वडवानळा सारखी
कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद.