प्रेरणा...
प्रपोज डे: लघु कथा - विवेकपटाईत
(प्रपोज डे)
आंग्ल भाषेत फतवा आला
पाश्चात्त्य संस्कृतीला खड्ड्यात घाला
वालेनटाईन दिन,हग दिन म्हणून पाळा
सनातन संस्कृतीचे अधःपतन टाळा
बुचकळ्यात पडलो.......मी तर रोजच......
पण मग टिव्हीवर दाखवलं,
इंग्रज लई हुश्शार,
काऊ हग दिन पाळत्यात
आणी होणारे रोग कसे टाळत्यात
आमचे शेजारी बी लई हुश्शार,
मोक्कार रात्र झाली होती,
उद्या विचारू म्हणत घोरू लागलो
मुंगेरीलाल ची स्वप्ने बघू लागलो.....
शेजारचे शर्माजी स्वप्नात आले
हग दिनाला काय करणार
म्हणून विचारू लागले,
"मुबंईत कुठं भेटेल काऊ?
आपण दोघं मिळून जाऊ....",
मी शर्माजीला प्रपोज केलं,
"शर्माजी, तुमची तर गरीब गाय
आमची मारकी म्हसं हाय
काऊ हग डे ला, भाभीजीला
अलिंगन दिलं तर चालल काय.???????".
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
अय्यय्यो! असे (स्वप्नात) विचारल्यावर शर्माजींचा चेहरा कसा झाला
हा हा हा !
मनापासून आभार
वालेनटाईन दिनाला काऊंटर करण्यासाठी काऊ हग डे
भारीच!
लई बेक्कार हसलो..
फुटतो!
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
मस्त
धन्यवाद