शशक- खड्डे
नर्स- डॉक्टर, एव्हढी नारळाची झाडे का लावताय तुम्ही अचानक? नारळाचा बिसनेस वगैरे करायचा विचार आहे का?
डॉक्टर- नाही, वाईच्या फार्म हाऊसवर लावतोय एक एक करून. मागच्या बाजूला मोकळी जागा आहे ना तिथे.
नर्स- तुमचे फार्म हाऊस फारच एका टोकाला आहे. नाही का आपण दोघेच गेलो होतो एका वीकेंडला?आजूबाजूला काहीच वस्ती नाही. कम्पाउंडला लागून एकदम धोम धरणच आहे.मला तर बाई भीतीच वाटली.
डॉक्टर- मी मुद्दामच तशी जागा निवडली आहे. काम उरकायला बरे पडते तिकडे.
नर्स-किती खड्डे खणलेत आतापर्यंत?
डॉक्टर- ६ खणलेत, त्यातले ४ भरलेत. एक या आठवड्यात भरेल आणि त्यात नारळाचे झाड लागेल.
नर्स- बापरे. आणि सहावा खड्डा कधी भरणार?
डॉक्टर- तो खड्डा मुद्दामच रिकामा ठेवलाय अजून. तुझ्यासाठी.
💬 प्रतिसाद
(2)
च
चौथा कोनाडा
Tue, 02/28/2023 - 08:20
नवीन
बाप रे....
वाईची ती भयानक घटना आठवली.
नर्स पण दुर्दैवी बिचारी !
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Tue, 02/28/2023 - 09:43
नवीन
बापरे....
डॉक्टरला जेल झाली की मग पुढची शशक डॉक्टरीण बाईवर का?
- Log in or register to post comments