Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शशक- निवडणूक ३

र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 03/02/2023 - 09:41
💬 2 प्रतिसाद
आधीचे भाग निवडणूक निवडणूक २ साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात? अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार? पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा. अरे तेच तर महत्वाचे आहे, आधीच नोटाचे फलक लागलेत तुझ्या वॉर्डात. मतेच नाही मिळाली तर काय फायदा? एक युक्ती आहे. एकगठ्ठा मते मिळु शकतील आपल्याला. पण त्यांची एक मोठी मागणी पूर्ण करावी लागेल.(काही कानगोष्टी होतात) करु की. तेही करू आपला ऊमेदवार निवडुन येणार असेल तर. --------------------------------------------------- नाना निवडुन आले, आणि आजकाल आजुबाजुच्या लोकांची पहाट जवळच्या नवीन मशिदीतुन बांग ऐकुन व्हायला लागलेय.

प्रतिक्रिया द्या
1684 वाचन

💬 प्रतिसाद (2)
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 03/02/2023 - 12:59 नवीन
खुर्ची साठी काय पन...
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 03/03/2023 - 09:56 नवीन
अगदी वास्तवाच्या जवळ जाणारी. मते किंवा पैशाचा पाठिंबा घेऊन मिंधेपणा पत्करला की पुढे ५ वर्षे त्यांच्याच तालावर नाचायचं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा