Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कलासक्त, संगीतप्रेमी, सौंदर्यासक्त रसिकांना 'बघण्याजोगे' बरेच काही... (भाग १)

च
चित्रगुप्त
Mon, 03/13/2023 - 00:00
💬 13 प्रतिसाद
काही काळापासून चित्रकला, संगीत, प्राचीन वास्तुरचना वगैरेंबद्दल यूट्यूबवर अनेक उत्तमोत्तम विडियो मी बघत आलेलो आहे. रसिकांकांसाठी ते हळूहळू इथे देत रहाण्यासाठी हा धागाप्रपंच करीत आहे. रसिक मिपाकरांनी त्यात आपापली भर टाकत राहून हा धागा समृद्ध करत रहावे, अशी विनंती करतो. सुरुवात पंडित मुकुल शिवपुत्र यांनी गायलेल्या 'जमुना किनारे मेरो गाव' या पारंपारिक रचनेने (ठुमरी ?) करतो. पं. कुमार गंधर्व, प्रभा अत्रे, राहुल/वसंतराव देशपांडे इ. विविध दिग्गज गायक-गायिकांचे, तसेच खेडोपाडीच्या अनेक लोक-कलावंतांचे (या रचनेचे) संगीत-नृत्य विडियो विपुल प्रमाणात उपलब्ध असून त्यातले अनेक बघितल्यावर मला सर्वात जास्त पंडित मुकुल शिवपुत्र यांचे गायन भावले. हिंदी चित्रपट-संगीतापैकी एकः जबरदस्त कोंगो वादन आणि मोठ्या वाद्यवृंदासह 'संपदा गोस्वामी' ने अप्रतिम गायलेले - दिलबर... दिलबर .. ('सिर्फ तुम'- नदीम-श्रवण) हे गीत : चित्रकला: . Greek Girls Picking up Pebbles by the Sea इ.स. १८७१ (चित्रकारः Sir. Frederic Leighton 1830 – 1896) . Toilette der Venus १६१४/१५. चित्रकारः Peter Paul Rubens १५७०-१६४०) वरील चित्रकार रुबेन्स याच्याविषयी एक उत्कृष्ट माहितीपटः Rubens: Why Is He So Misunderstood? (Waldemar Januszczak Documentary) (क्रमशः)

प्रतिक्रिया द्या
5215 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
कंजूस Mon, 03/13/2023 - 13:54 नवीन
कलासक्त,सौंदर्यासाठी वगैरे फार मोठी विशेषणं आहेत माझ्यासाठी.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 03/13/2023 - 14:45 नवीन
@कंजूसः या धाग्यात हळूहळू विविध क्षेत्रातील रसिक, जाणकार मिपाकरांकडून भर पडत जाऊन अनेक प्रेक्षणीय, श्रवणीय गोष्टींचा एक उत्तम संग्रह निर्माण होईल, अशी आशा आहे. प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 03/13/2023 - 14:51 नवीन
मिपाकरांकडून भर पडत जाऊन . . . पुढे विडिओ प्लेअरस वाढत गेले की धागा लवकर 'load' होणार नाही म्हणून त्यांच्या लिंका द्याव्यात.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 03/14/2023 - 07:23 नवीन
भरतनाट्यम या प्रकाराची आवड असल्यास ,हे युट्युब channel सुंदर आहेत. Radhakalpa Dance Academy https://youtu.be/aSorsMy6SxY Dr.Janaki Rangrajan https://youtu.be/xdtPusT-F7Q
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 03/14/2023 - 07:50 नवीन
तबल्याची आवड असल्यास हे काही चॅनल देतो https://www.youtube.com/@tablaofficial7803 गाण्यासाठी https://www.youtube.com/@darbarfestival अजुन एक https://www.youtube.com/@naamvaibhavfestival9322 दिसायली सोपी पण काढायला कठीण पेंटिंग https://www.youtube.com/@jayleepainting
  • Log in or register to post comments
य
योगविवेक गुरुवार, 03/30/2023 - 19:05 नवीन
चित्रे सादर करून रसिकांची वाहवा मिळविली आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/31/2023 - 09:38 नवीन
दिलबर आणि पेंटीग्ज आवडली शेवटच्या व्हीडिओ ला "Age-restricted content" काय असावे बरे ह्यात ?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/01/2023 - 05:25 नवीन
Peter Paul Rubens (१५७७-१६४०) हा तात्कालीन युरोपातील महत्वाचा, प्रभावशाली चित्रकार होता. याच्या बर्‍याच चित्रात नग्नदेहाचे चित्रण उत्तम प्रकारे केलेले आढळते, पाश्चात्त्य देशात वाढणारी मुले अगदी लहानपणापासून विविध संग्रहालयात शाळेकडून जात असतात त्यामुळे त्यांना कलेतील नग्नतेचे वावडे नसले तरी सर्व देशात अशी परिस्थिती नसल्याने यूट्यूबने तसे केलेले असावे. लॉगिन करून हा व्हिडियो बघता येईल. Waldemar Januszczak याचे सर्वच माहितीपट खूपच अभ्यासपूर्ण, रंजक आणि त्या त्या विषयाचे सखोल दर्शन घडवणारे असतात. कलाप्रेमींनी अवश्य बघावेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 04/04/2023 - 14:06 नवीन
कलेतील नग्नतेचे वावडे नसले तरी सर्व देशात अशी परिस्थिती नसल्याने यूट्यूबने तसे केलेले असावे.
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Sat, 04/01/2023 - 05:33 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sat, 04/01/2023 - 08:09 नवीन
वरकरणी सामान्य वाटणार्‍या एखाद्या शिल्पावर एखाद्या नवीनच, अनोख्या, वेगळ्या कोनातून प्रकाश पडावा आणि ते शिल्प अद्भुत, अलौकिक सुंदर दिसू लागावे तसे कोणतीही रचना मुकुलांच्या कंठातून बाहेर पडतांना अलौकिक, अद्भुत होऊन जाते. विलंबित ख्यालात देखील लयीची प्रत्येक मात्रा खणखणीत मोजून बंदीश पेश करणारा हा शापित गंधर्व माझा सर्वात आवडता रागदारी गायक आहे. दिलबर ध्वनीमुद्रण छान आहे. विंड ब्रासमधली अरबी पद्धतीची लकेर मस्त जमली आहे. ग्रीक पेबल्स चित्र जिवंत हे विशेषण अपुरे पडेल एवढे जिवंत भासते. वार्‍यामुळे मुळे फडकणारी वस्त्रे आत्ता कमीजास्त फडकतील असे वाटते. हे चित्रात उतरवणे कसे काय जमू शकते हे एक आश्चर्यच आहे. दुसर्‍या चित्रातील आरशातून दिसणारा चेहरा ही कल्पना आणि आपल्याला एकूण दृश्य इतक्या वेगळ्या कोनातून दिसणे अनोखेच आहे. रामेंनी दिलेले तबल्याचे आणि भक्तीताईंनी दिलेले भरतनाट्यमचे दुवे ऐकेन आणि पाहीनच. अफलातून धग्याबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 04/01/2023 - 09:35 नवीन
संपदा गोस्वामीने यायलेल्या 'दिलबर' गाण्यात कोंगो वाजवणारे श्री. अनुपम घटक यांची मुलाखत आणि सादरीकरण 'स्मृतिगंध' मधील 'साजतरंग' या कार्यक्रमाच्या भाग-२३ मधे बघता येईल. ही संपूर्ण मालिकाच अद्भुत आहे. https://www.youtube.com/watch?v=KI7gpE6aVC4
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 04/03/2023 - 05:03 नवीन
मालिकेचे एकूण एक ४२ ही भाग अद्भुत आहेत. अजूनही कोणी खास रसिक भेटल्यास आम्ही या मालिकेबद्दल बोलतो. या मालिकेत नसलेल्या इनॉक डॅनिअल आणि वॉन शिप्ले यांच्याही आठवणी निघतात. पुन्हा एकदा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा