पाककृती

हळीवचे लाडू

Primary tabs

पहिलाच प्रयत्न आहे,योग आला म्हणून बनवले :).थंडीमध्ये हे मुख्यतः हे लाडू खाल्ले जातात.हळीव हे पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवात तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न असते. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बीटाकॅरोटिन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळिवांत आहेत.

१०० ग्रम हळिव
२वाट्या खोवलेला नारळ
३वाट्या गुळ
३ वाट्या नारळाचे पाणी/शहाळ्याचे पाणी
१/२ वाटी काजू बदाम पुड
१/२ चमचा चमचा जायफळ पावडर
कृती
हळीव स्वच्छ निवडून,नारळाच्या पाण्यात ८ तास भिजवावे.
हळीव , खोवलेला नारळ,गुळ एकत्र करून ४ तास भिजवावे.
हळीव भिजल्यावर हे मिश्रण ३० मिनिटं मंद आचेवर परतावे.
तेव्हा त्यात काजू बदाम पूड,जायफळ पूड टाकावी.
परतल्यानंतर मिश्रण गार करून लाडू वळावे.
रोज एक कोमट दुधाबरोबर खाऊ शकतो.
F

विंजिनेर

जायफळाच्या ऐवजी वेलदोडा घालून खाल्ले आहेत - प्रचंड आवडता प्रकार
(अळीवाच्या लाडवासाठी कायमचा बाळंतीण) विंजिनेर :)

पण खाल्ल्यावर वाढलेले वजन कसे कमी करायचे त्याची पण रेसिपी द्या ना.

फोटो बघून तोपासू.

Bhakti

_/\_
:)दोन किमी अधिक चाला.

सुगरणबाई टाकत जा अशी छान छान कलाकृती तुमची.
नेत्रसुख घेऊच. शिवाय कुणावर तरी प्रयोगसुद्धा करू
भक्ती भावाने.कारण कर्नलसाहेबांनी दिलंच आहे.

Bhakti

ओह! धन्यवाद :)
नक्की प्रयोग करा अन्नपूर्णाजी:)
रच्यकाने
काल मी जरा चवीला घाबरले होते पण आज लाडु जरा फ्रीजमध्ये ठेवल्यावर चांगलेच घट्ट आणि छान वाटत आहेत चवीला.
टीप-ओलं खोबरं असल्यामुळे फ्रीजमध्ये लाडू ठेवावेत,बाहेर नको.

Bhakti

भक्ती भावाने 'भावासाठीच' केले :)

गवि

घरच्यांसाठी तर केलेत, आता (उदा. प्रा डाँ सारख्या) मिपाकरांसाठी कधी करणार असे विचारत आहेत ते, असा अंदाज.

:-))

Bhakti

ओह,गविसरांची दृष्टी मज लाभो :-))
नक्की करेन की योग आल्यावर :)

मदनबाण

आमच्यात याला अळीवाचा लाडू म्हणत्यात ! :) या लाडूवर माझे विशेष प्रेम ! मी याला मऊ गुबगुबीत लाडू असे देखील म्हणतो. :)))

[ रवा लाडू प्रेमी ] :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Ranjithame - Varisu (Tamil) | Thalapathy Vijay | Rashmika | :- Varisu

गवि

बुळबुळीत म्हणायचे असेल मबाशेठना.. ;-)

हे अळीव बुळबुळीत तर होतातच पण त्यांचा आकार (शेप आणि साइझ दोन्ही) निसर्गाने असे बनवले आहेत की ज्यांच्या दाढांत पोकळी आहे त्यात ते फिट्ट घुसून बसलेच पाहिजेत.

Bhakti

धन्यवाद !
एका फिटनेस ट्रेनरचा आणि तैपनच्या कुठल्यातरी खवय्याचा लाईक रेसिपीला मिळाला :) ही रेसिपी पुढच्या पिढीपर्यंत जात राहो ही सदिच्छा!

कंजूस

उगाच वजन, कोलेस्टरॉल वगैरे वाढेल का असले विचार मनात आणायचे नाहीत.
बरणी रिकामी झाली की लगेच कळवायचं.