जे न देखे रवी...

तू जाताना...

Primary tabs

अश्रू जरा ओघळले तू जाताना
ना शब्द ओठी फुटले तू जाताना...

जलप्रलय यावा तैसा पूर नदीला
आभाळ ही कोसळले तू जाताना...

ती रात होती पुनवेची तेव्हा ही
का चांदणे ना पडले तू जाताना...?

हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी
ना फूल कोठे फुलले तू जाताना...

उधळून जीवन गेले तेव्हा माझे
वादळ जरासे उठले तू जाताना...

ही वेस ओलांडूनी गेलीस तसे
आधार सारे तुटले तू जाताना...

दीपक पवार.

Deepak Pawar

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर मनःपूर्वक धन्यवाद.

आलो आलो

दीपक भाऊ

ही वेस ओलांडूनी गेलीस तसे
आधार सारे तुटले तू जाताना...

जबरदस्त !
शेवटी काय ....जाने भी दो यारों ........ जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा....असं बोलून आपापल्या रस्त्याला लागायचं ...हाकानाका.

Deepak Pawar

आलो आलो सर मनःपूर्वक धन्यवाद

गाव दुर राहीले.

"तू नही तो और सही",मुसाफिर हूं, दिल कभी नही लगाता. किंवा "गुंत्यात गुंतूनी" असेच जगलो.

रचना आवडली.

Deepak Pawar

कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद