जे न देखे रवी...
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
Primary tabs
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी
दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी.
वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू
दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी.
दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती
नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी.
पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे
आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी.
हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना
ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
याला म्हणतात कमिटमेंट.
आवडली.
कविता छान आहे. त्यातील भावना छान आहेत. ती वाचून दोन दोन शब्दांत ती पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करावासा वाटला. त्यावरून ती कल्पना सुंदर आहे हेच अधोरेखित होते.
उदा. खालील काहीसे :
आसवांचे थेंब
तुझ्या गालावर
दाटले आभाळ
कोसळली सर
वादळ येता
भीती विसर
दुःखे सारी
लोट वाऱ्यावर
लिहीत रहा.
आवडल्या या ओळी!
छान उपमा! (भाळावरील चंद्र, कुंकू)
कर्नलतपस्वी सर, गवि सर, श्रीगणेशा सर मनःपूर्वक धन्यवाद.
गवि सर कविता छान आहे.
कविता आवडली.
हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना
ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
हे विशेष आवडले.
विवेकपटाईत सर मनःपूर्वक धन्यवाद.
हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना
ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.
आवडली रचना.
-दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर मनःपूर्वक धन्यवाद.
वाह!
खूप छान आहे कविता.
आवडली
प्राची अश्विनी मॅडम, विजुभाऊ सर मनःपूर्वक धन्यवाद