जे न देखे रवी...
जेल भरती
Primary tabs
https://www.lokmat.com/mumbai/during-the-ongoing-written-examination-in…
पोलीस भरती आधी बेड्या?
अरे हे काय केलस रे वेड्या?!
भरती-पेपर मधे केलीस काॅपी
तुला तर घालायची होती खाकी!
पेन मधे ठेवले सिम
कानात उपकरण,
ही कसली रे थीम
हे काय प्रकरण?
अरे खुळ्या ते आहेत पोलीस
तू मात्र अक्कल ठेवली ओलीस
आता सुन्न, पहातोय जेल
काहीतरी शिकाला पाहीजेल.
आवडली.
सरकारी नौकरी आता कधीच मिळणार नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात चांगल्या पगार देणार्या निजी क्षेत्रात ही नाही. बाकी सिनेमे यू ट्यूब आणि वास्तव यात भरपूर फरक असतो, हे मोबाइल पिढीला कळत नाही.