"The Kerala Story" - एक उत्तम कलाकृती!
मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही. बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही. पण एका खास मित्राने आग्रही शिफारस केल्यामुळे 'The Kerala Story' हा चित्रपट परवाच्या रविवारी आम्ही दोघं आणि माझा एक अतिशय जवळचा मुस्लिम मित्र व त्याची बायको अशा चौघांनी बघितला आणि तो बघण्यासाठी खर्चलेला वेळ आणि पैशाचा पुरेपूर मोबदला मिळाला असेच मी म्हणेन.
चित्रपट संपल्यावर "मस्त पिक्चर बनाया हैं यार... ये किसी के भी साथ हो सकता हैं!" असा त्या मित्राने गंभीर स्वरात दिलेला अभिप्राय आणि त्याला "सच्ची" असा एका शब्दात त्याच्या बायकोने तितक्याच गंभीरपणे दिलेला दुजोरा मलाही अंतर्मुख करून गेला. तो अभिप्राय आणि त्याला दुजोरा देणाऱ्या दोन्ही व्यक्ती धर्माने मुस्लिम असल्या तरी त्यातून व्यक्त झालेल्या भावना ह्या लवकरच वयात येऊ घातलेल्या एका मुलीचा पिता आणि मातेच्या होत्या, त्यात डोकावलेली काळजी अगदी स्पष्टपणे जाणवली होती आणि माझ्या मते हेच 'The Kerala Story' ह्या चित्रपटाचे खरेखुरे यश आहे.
तर मंडळी, सध्या अनेक कारणांनी चर्चेत असलेला आणि परवा संध्याकाळी बघितलेला हा चित्रपट मला कसा वाटला, तो का आवडला हे सांगण्यासाठी आणि त्या अनुषंगाने माझी काही मते मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच!
निर्माता: विपुल अमृतलाल शहा.
आंखे, वक्त, नमस्ते लंडन, सिंग इज किंग, फोर्स, कमांडो अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांपैकी काहींचे दिग्दर्शनही समर्थपणे करणारे विपुल शहा हे नाव तसे सुपरिचित. पण आत्तापर्यंत केवळ व्यावसायिक, करमणूकप्रधान अशा मसालापटांची निर्मिती करणाऱ्या विपुल शहांनी लव्ह जिहाद सारख्या धगधगत्या विषयावरील 'द केरला स्टोरी' ह्या त्यांच्या पठडीबाहेरच्या आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस अशा चित्रपटाची यशस्वीरीत्या निर्मिती करून सुखद धक्का दिला आहे त्यासाठी त्यांचे अभिनंदन करणे अगत्याचे वाटते!
दिग्दर्शक: सुदिप्तो सेन.
'सुदिप्तो सेन' ह्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट मी ह्याआधी पाहिला नसल्याने हे नाव माझ्यासाठी अनोळखी असले तरी नाटकीपणाला अजिबात थारा न देता वेगवान, अतिशय वास्तवदर्शी आणि अत्यंत प्रभावी सादरीकरणातुन त्यांनी दिग्दर्शक म्हणुन आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. कित्येक प्रसंग पाहाताना आपण नक्की हिंदी सिनेमा पहातोय कि हॉलीवुडपट पहातोय असा प्रश्न पडावा इतके ते प्रभावी आहेत. अर्थात त्यांचा मी हा पहिलाच चित्रपट पहिला असल्याने असे वास्तवदर्शी चित्रपट देण्यात हातखंडा असलेले आणि दिग्दर्शक म्हणून माझ्या आवडीच्या असलेल्या 'अनुराग कश्यप' ह्यांच्या पंक्तीत त्यांना इतक्यात नेऊन बसवण्याची मला घाई नाही, त्याआधी सातत्य जोखण्यासाठी त्यांचे आणखीन काही सिनेमे बघणे आवश्यक आहे असे वाटते.
संक्षीप्त कथानक:
चित्रपटाची कथा-पटकथा सुर्यपाल सिंग, विपुल शहा आणि सुदिप्तो सेन ह्यांनी लिहिली असुन ती थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
'शालिनी उन्नीकृष्णन' ही पितृछत्र हरपलेली आणि आपल्या आई व आजीबरोबर राहणारी सर्वसामान्य हिंदू घरातली मुलगी, 'गीतांजली मेनन' हि कम्युनिस्ट विचारसरणी असणाऱ्या घरात वाढलेली, आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आणि 'निमाह मॅथ्यूस' हि एका ख्रिश्चन कुटुंबातली मुलगी अशा एकमेकींशी अपरीचीत असलेल्या तिघीजणी कासारगोड ह्या परजिल्ह्यातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तिथे शिकण्यासाठी होस्टेलवर राहायला जातात. तिथे 'असिफा' हि स्थानिक मुलगी त्यांची चौथी रूममेट असते!
तिथल्या वास्तव्यात असिफा त्यांचे ब्रेनवॊशिंग करून त्या तिघींना 'लव्ह-जिहाद'च्या सापळ्यात अडकवण्याचे आणि त्यांचे धर्मांतरण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करते. शालिनी आणि गीतांजलीला त्या सापळ्यात अडकवण्यात ती यशस्वी होते. पैकी शालिनी हे 'सॉफ्ट टार्गेट' असल्याने तीचे पूर्णपणे ब्रेनवॉशिंग होऊन ती जिहाद साठी सीरियाला जायलाही तयार होते (अर्थात त्यासाठी तिची फसवणूक करून तशी परिस्थिती कशी निर्माण केली जाते वगैरेचा तपशील इथे देणे अयोग्य ठरेल). गीतांजली उर्फ 'गीतू' आणि धर्मांतर केल्यानंतरचे नाव अनिशा हि देखील त्या सापळ्यात पूर्णपणे अडकते, पण काही कारणाने शालिनीपेक्षा थोडी सुदैवी ठरल्याने ती जिहादी वगैरे बनण्यास तयार होत नाही, ज्याच्या परिणामी तिला आयुष्यातून पूर्णपणे उठवण्यात येते. आणि निमाह हि बऱ्यापैकी कट्टर कॅथलिक विचारसरणीची असल्याने आसिफा आणि तिच्या सहकाऱ्यांना तिला धर्मांतर आणि लव्ह जिहदच्या सापळ्यात अडकवणे शक्य होत नाही तेव्हा ड्रग्स देऊन, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला मानसिकदृष्ट्या उध्वस्त केले जाते.
जिहाद साठी सीरियाला जायला निघालेल्या शालिनीच्या कोलंबो मार्गे पाकिस्तानातील क्वेट्टा ते अफगाणिस्तान ह्या प्रवासात घडणाऱ्या घटना, इसिस ह्या दहशतवादी संघटनेच्या तळावर तिला येणारे निर्घृण अनुभव अशा घटनांमधून पुढे सरकणाऱ्या कथेचा अंत त्वचारोग झालेली (तो कदाचीत Sexually transmitted diseases - STD असावा) शालिनी उर्फ फातिमा इसिसच्या तावडीतुन केलेल्या यशस्वी पलायनानंतर अफगाणिस्तानच्या एका जेल मध्ये जाउन खितपत पड्ल्यावर होतो.
चित्रपटाची इतपतच कथा सांगणे इष्ट वाटते, बाकीच्या घटना समजण्यासाठी सिनेमा बघणे योग्य ठरेल...
कलाकार
प्रमुख पात्रः शालिनी उन्नीकृष्णन | अभिनेत्री: अदा शर्मा
आधी बघितलेल्या तेलगू सिनेमांमुळे परिचयाची झालेली 'अदा शर्मा' हि एकमेव अभिनेत्री वगळता बाकीचे सर्वच कलाकार माझ्यासाठी अनोळखी होते. पण तेलगू सिनेमांमध्ये बघितलेली ग्लॅमरस अदा शर्मा आणि ह्या चित्रपटात पूर्वाश्रमीची 'शालिनी उन्नीकृष्णन' आणि धर्मांतरित झाल्यावर 'फातिमा' ची प्रमुख भूमिका साकारणारी अदा शर्मा ह्यांत भरपूर फरक जाणवला. भूमिकेची गरज म्हणून वजन वाढवलेली अदा शर्मा 'हिरोईन मटेरियल' वाटली नसली तरी अभिनयात बऱ्यापैकी बाजी मारून गेली आहे.
बाकी चित्रपटातील महत्वाच्या पात्रांपैकी असिफाच्या भुमिकेतली सोनिया बलानी, गीतांजली मेननच्या भुमिकेतली सिद्धि इदनानी, निमाह मॅथ्युसच्या भुमिकेतली योगीता बिहानी, शालिनिच्या आईची भुमिका साकारणारी देवार्शीनी चेतन, गीतांजलीच्या आईची भुमिका साकारणारी उषा सुब्रमणीयम-सक्सेना, तसेच युनोचे आणि जेल अधिकारी, लव्ह जिहादच्या सापळ्यात ह्या तरुणींना अडकवणारे असिफाचे सहकारी, मुल्ला/मौलवी वगैरे सर्वच कलाकारांनी आपापल्या भुमिका अगदी चोख बजावल्या आहेत. त्यामुळे कास्टींग साठीही पुर्ण मार्क्स ह्या चित्रपटाला द्यायला हरकत नाही!
चित्रपटातील सर्वाधीक आवडलेले किंवा मनाला चटका लावणारे प्रसंगः
संपुर्ण चित्रपटच आवडला असला तरी हा चित्रपट केवळ हिंदुविरोधी कारवायांवर प्रकाश टाकत नसुन हिंदुंकडुन होणाऱ्या चुकांवरही अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत असल्याने त्यातील सर्वाधीक आवडलेले किंवा मनाला चटका लावणारे काही प्रसंग नमुद करण्याचा मोह टाळता येत नाहिये!
१) एका प्रसंगात शालिनी, गीतांजली, निमाह आणि असिफा अशा चौघीजणी जेवायला बसलेल्या असतात. टेबलच्या एका बाजूला बसलेल्या निमाह आणि असिफा जेवण्याआधी अनुक्रमे ख्रिस्ती आणि मुस्लिम पद्धतीने प्रार्थना करतात जेव्हा टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या शालिनी आणि गीतांजली त्याविषयी विचारणा करतात तेव्हा असिफा आणि निमाह त्यांच्या धर्मात जेवणाआधी अनुक्रमे गॉड आणि अल्लाचे आभार मानण्यासाठी करण्याच्या प्रार्थनेचे असलेले महत्व विशद करतात आणि त्यावर शालिनी व गीतांजली ह्या हिंदू मुली जी उत्तरे देतात ती ऐकून हसावे कि रडावे हे समजत नाही.
वास्तविक घरचे संस्कार वेगळे, पण जेवणाआधी "वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" अशी प्रार्थना आपल्यापैकी बहुतेक सर्वांना शाळेत डबा खाण्याआधी शिकवली जात असल्याचे आठवत असेल. कुठल्याही मंगल प्रसंगी पंगतीत जेवतानाही "पार्वती पते हर हर महादेव" असा गजर झाल्याशिवाय लोक घास तोंडात घालत नसत/नाहीत. आज आपल्यापैकी कितीजण जेवणाआधी अशी प्रार्थना करतात? शाळेनंतर मी स्वतः जेवणाआधी अशी प्रार्थना करत नसल्याने खरंतर मला हा प्रश्न विचारायचा बिलकुल अधिकार नाही पण आपल्या मिपाकरांपैकी किंवा अन्य सोशल मीडियावर तावातावाने हिंदु धर्मा विषयी मोठमोठ्या बाता मारणारे कितीजण रोजच्या प्रत्येक जेवणाआधी अशी प्रार्थना करतात किंवा स्वतः करत असले तरी कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलांवर असे संस्कार करतात हे मैत्रीखात्यात जाणून घ्यायला नक्की आवडेल!
२) ब्रेनवॊश झालेली शालिनी हिजाब परीधान करून सुट्टीवर घरी येते त्यावेळी दरवाजा उघडल्यावर तिला त्या अवतारात बघितल्यावर आणि घरात आल्यानंतर आईने आणून दिलेला प्रसाद खाण्यास नकार देऊन ती जेव्हा देव-देवतांची निंदा नालस्ती करते आणि प्रसादाची थाळी टीपॉय वर ठेवण्याआधी आईने तिचा त्यावर ठेवलेला पाय खाली केल्यावर पुन्हा आपला पाय मुद्दामहून त्या प्रसादाच्या थाळीजवळ ठेवणाऱ्या आपल्या मुलीला बघून तिच्या आईची झालेली अवस्था मनाला चटका लावून जाते.
३) शरिया नुसार स्त्रियांना मोबाईल फोन वापरायला बंदी आहे असे जेव्हा शालिनी उर्फ फातिमाला इसिसच्या दहशतवाद्याकडून सांगितले जाते तेव्हा ती अतिशय निरागसपणे त्याला उलट प्रश्न विचारते "पण शरिया तयार झाला तेव्हा मोबाईल फोन कुठे अस्तित्वात होता ?" हा एकमेव प्रसंग असा आहे जेव्हा प्रेक्षागृहात हशा पिकतो. हा अपवाद वगळता चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी शांतता असते.
४) धर्मांतरित झालेलया गीतांजली उर्फ अनिशाला तिचे वडील हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याचे सांगणारा तिच्या आईचा फोन येतो. असिफा त्याबद्दल विचारणा करते तेव्हा वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी आणि तिच्यासाठी म्हणून ठेवलेले दाग-दागिने घेऊन जाण्यासाठी आईने फोन केला होता पण हे घरच्यांनी तिला परत बोलावण्यासाठी केलेले ढोंग वाटत असल्याचे ती सांगते.
त्यावर तुझे वडील काफिर असल्याने ते तसेही 'दोज़ख' (नरकात) जाणार आहेत, त्यांचे पाप कमी करण्यासाठी तूला त्यांच्यावर थुकावे लागेल किंवा त्यांना दगड मारावा लागेल असे सांगतानाच तू जाऊन हे कर आणि दागिने घेऊन ये, काफ़िरांची दौलत ताब्यात घेणे शरियाला मान्य आहे.
असिफाने सांगितल्याप्रमाणे गीतांजली हॉस्पिटल मध्ये जाऊन आईच्या डोळ्यांदेखत आपल्या वडिलांच्या डोक्यावर जाऊन थुंकते तो प्रसंग मनाला फार यातनादायी आहे.
५) आपण फसवले गेलोय हे लक्षात आल्यावर अंमली पदर्थांचे व्यसन जडलेली पश्चातापदग्ध गीतांजली आपल्या वडीलांच्या मांडीवर डोके ठेउन जेव्हा "तुम्ही मला परकिय कम्युनिझमचे धडे देत राहीलात त्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा शिकवल्या असत्या तर आज माझ्यावर हा प्रसंग ओढवला नसता" अशा शब्दांत त्यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडते तो प्रसंगही फार प्रभावी वाटला.
संपुर्ण चित्रपटात असे अनेक परिणमकारक प्रसंग आहेत त्यबद्दल आणखीन लिहिले तर चित्रपट बघण्याची इच्छा असलेल्यांचा रसभंग होण्याचा धोका टाळण्यासाठी ते आवरते घेतो!
बाकी चित्रपटात कुठेही अंगप्रदर्शन वगैरे काही नाही. बलात्काराचे दोन-तिन प्रसंग आहेत पण कल्पकतेने चित्रित केले असल्याने त्यातही कुठे बिभत्सपणा नाही, ज्यांनी OTT वरच्या वेबसिरीज बघितल्या असतील त्यांना तर ते बलात्काराचे प्रसंग अगदी बाळबोध वाटतील. केवळ हिंसाचाराचे काही तुरळक रक्तरंजीत प्रसंग कथानकाची गरज म्हणुन चित्रपटात असल्याने ह्या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने 'A' प्रमाणपत्र दिले असावे असे वाटले, अन्यथा हा चित्रपट कोणीही पहाण्यासारखा आहे त्यासाठी खरंतर १८+ वय असण्याची काही गरज नाही, ह्यापेक्षा कितीतरी रक्तरंजीत व्हिडीओ गेम्स लहान मुले खेळतात!
असो... एकंदरित चित्रपट चांगला आहे. गाणी दोन-तिनच असली तरी संगीत सुश्राव्य आहे. 'दिल से' नंतर मल्याळम बोल असलेले गाणे असलेला हा बहुदा त्यानंतरचा पहिलाच चित्रपट असावा. सध्या ह्या चित्रपटावरुन बराच गदारोळ माजवला जातोय. ह्या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी केरळ सरकारने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली असली तरी काल परवाकडे तामिळनाडुतील मल्टीप्लेक्स मालक/चालकांनी हा चित्रपट न दखवण्याचा निर्णय घेतला आहे तर पश्चिम बंगालच्या तथाकथीत "फ्री स्पिच" समर्थक मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट पश्चिम बंगालमध्ये 'बॅन' केला आहे. असे असले तरी ह्या सर्व गदरोळावर मात करुन हा चांगला चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आहे ही नक्कीच समाधनाची गोष्ट आहे!
तर मंडळी वर उल्लेख केलेल्या माझ्या मित्राच्या अभिप्रायातील "ये किसी के भी साथ हो सकता हैं!" ह्या वाक्यातील गर्भीतार्थ लक्षात घेउन केवळ 'लव्ह जिहाद' च्या परिप्रेक्षातुन आणि धार्मीक दृष्टिकोनातून ह्या चित्रपटाकडे न पहाता वास्तवाचे भान देणारी हि 'उत्तम कलाकृती' ज्यांना शक्य असेल त्यांनी चित्रपटगृहात जाऊन तर ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी पुढे OTT किंवा अन्य कुठल्याही माध्यमावर आवर्जून पहावी अशी आग्रही शिफारस करतो आणि "ये किसी के भी साथ हो सकता हैं!" ह्या वाक्याचा पुनरुच्चार करुन आता इथेच थांबतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
'द केरला स्टोरी'
💬 प्रतिसाद
(72)
ट
टर्मीनेटर
Tue, 05/16/2023 - 06:12
नवीन
शाम भागवत | सतिश पाटील
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ सतिश पाटील
आपण जी दोन वाक्ये अधोरेखित करून दोन प्रश्न विचारले आहेत त्या वाक्यांआधीचे त्या परिच्छेदातले सर्वात पहिले वाक्य
आपल्या वाचनातुन निसटले असावे काय 😀
असो.. वरील प्रश्न विचारण्यामागील आपल्या हेतु विषयी शंका घेण्यास वाव असला तरी उत्तरे देतो.
१)
ह्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणच अधोरेखीत केलेल्या माझ्या "बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता" ह्या वाक्यातील 'तिलाही' ह्या शब्दात दडलेले आहे 😀
२)
माझे मत काय असावे हे वरती दिलेल्या पहिल्या वाक्यातील 'ती माझी आवडच नाही.' ह्या शब्दांतुन लक्षात येणे तसे अजिबात अवघड नाही. पण तरीही तुम्हाला अपेक्षित असा तुम्ही काढलेला अर्थही मान्य करण्यासही माझी काहीच हरकत नाही, तसेही म्हणतातच ना "Wife is always right" इथेही तसंच समजा हवंतर 😂
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
गुरुवार, 05/11/2023 - 08:49
नवीन
आम्ही सुद्धा गेल्या रविवारी हा सिनेमा पाहीला असल्याने लेखातील प्रत्येक वाक्याशी सहमती आहे!
सर्व भारतियांनी एकदातरी पहावा असा हा सिनेमा आहे!!
सिनेमा आणि परिक्षण दोन्ही आवडले. धन्यवाद!!!

- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/12/2023 - 13:06
नवीन
घरच्यांसोबत चित्रपट पाहिला आणि आवडला.
त्यावरचे बरेच लेख वाचले बरेच योउत्युबे व्हिडीओ पण पाहिले. त्या सगळ्यात हे परिक्षण सर्वात जास्त संतुलीत आणि परखड वाटले.
चित्रपट यायच्या आधिपासुनच अनेकांची जळजळ सुरु झाली होती. अपेक्षेप्रमाणे या वर राजकारण देखिल सुरु झाले आहे.
पण ते सगळे बाजूला ठेवत कोणताही अभिनिवेश न बाळगता लिहिलेला हा लेख प्रचंड आवडला.
प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे असा सिनेमा.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 05/12/2023 - 23:59
नवीन
"*******पासून कुणी धडा घेत का नाही!"
हे एक सामान्य वाक्य म्हणजे मनातील एक कप्पा तडजोड न करण्याबाबत असतो. दुसरा टप्पा पयशे हवे असतील तर *** तमुक करायला हवे हे सांगतो.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 05/16/2023 - 06:17
नवीन
अथांग आकाश | ज्ञानोबाचे पैजार | कंजूस
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
कंकाका आपला प्रतिसाद माझ्या डोक्यावरून गेला आहे 😀
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Tue, 05/16/2023 - 07:50
नवीन
बहुतेक माझ्या प्रतिसादाला उत्तरले असावेत.
सुबोध खरे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
बाकी मनाचे काय!
मन काळोखाची गुफा
मन गरगरते आवर्त
माणसागणीक मनाची वेगवेगळी रूपे. कोण सापळा लावून बसलायं आणी कोण त्यात आडकतं.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/16/2023 - 09:19
नवीन
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/16/2023 - 09:19
नवीन
आज आमच्या एका कौटुंबीक ग्रुपवर मेसेज आलाय.
एका मुसलमानाने लिहिलेला लेख व्हाट्सअप वर आलेला आहे.
__________
हिंदू स्वतःची संस्कृती का नष्ट करत आहेत ?
एका मुस्लिम लेखकाने या लेखाद्वारे हिंदू समाजाला चपराक मारली आहे….
तुमच्या विवाहित, अविवाहित युवतींनी साडी नेसणे बंद केले आहे. त्यांना कोणी रोखले आहे? आम्ही नाही. याला मुस्लिम जबाबदार नाहीत. खरं नाही का ?
कपाळावरचे कुंकू ही एके काळी तुमची ओळख होती. तुम्ही लोक रिकाम्या कपाळाला पूर्वी अशुभ मानत होता. घरातून बाहेर पडण्याआधी तुम्हीच पुरुषांनी कपाळावर गंध लावणे सोडले आहे. तुमच्या स्त्रियांनीही फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली कपाळावर गंध/तिलक लावण्याची प्रथा बंद केली आहे. याला मुस्लिम कसे जबाबदार आहेत ?
तुम्ही लोकांनी तुमच्या पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे. यात मुस्लिमांची चूक कुठे आहे ?
आमच्या समाजात लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेंव्हा ते आपल्या वडिलांची बोटे धरून मस्जिदमध्ये इबादत/नमाजसाठी जाते आणि इबादत/नमाज हे आपले आयुष्यभराचे कर्तव्य मानते...
तुम्ही लोकांनी मंदिरे पाहणेही सोडून दिले आहे. काही जण फक्त ५-१० मिनिटांसाठी जेंव्हा स्वतःला देवाकडून कांही हवे असते किंवा दुःखात असतील तेंव्हाच देव आठवतो आणि देवळात जातात.
आता जर तुमच्या मुलांना मंदिरात जाण्याचे कारण माहित नसेल, मंदिरात काय करावे माहित नसेल, पूजा हे कर्तव्य आहे. हे ही माहिती नसेल, तर ह्यात मुस्लिमांचा दोष आहे का ?
तुमची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकून कविता करतात, याचा तुम्हाला अभिमान वाटतो. पण तुमच्या मुलांनी गीता श्लोकांचे पठण केल्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. त्याने शुभम् करोती कल्याणनम् अथवा गीतेचे श्लोक म्हटले नाहीत तर तुम्हाला अपराधी वाटत नाही आणि दु:खही वाटत नाही !
घरातील लहान मूल बोलायला लागल्यावर आम्ही त्याला मोठ्यांना "सलाम" म्हणायला शिकवतो.
पण तुमची राम राम, नमस्कार, प्रणाम करण्याची जागा हॅलो, हाय ने घेतली आहे. याला जबाबदार कोण ?
कॉन्व्हेंट मधून परतल्यावर आमची मुलं उर्दू,अरबी सुद्धा शिकतात आणि आमची धार्मिक पुस्तके वाचायला लागतात.
तुमची मुले रामायण किंवा भगवद्गीता वाचत नाहीत. त्याला संस्कृत येत नाही, आणि ब-याचदा मातृभाषाही येत नाही. हा आमचा दोष आहे का ?
तुमच्याकडे आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व कांही आहे, पण तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली आंधळेपणाने त्या सर्वांचा त्याग केला. मात्र आम्ही त्यांना विसरलो नाही. आपल्यात हाच फरक आहे. तुम्ही तुमच्या परंपरेशी असलेले नाते तोडले आहे. पण आम्ही आमची मूळं आजही सोडली नाहीत आणि कधीच सोडणार नाही.
तुम्ही स्वतः तिलक,भस्म,यज्ञोपवित घालणे टाळता, शिखा ठेवणे टाळता. तुमच्या स्त्रियांना कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र घालायला लाज वाटते. तुम्ही लोक याला अनावश्यक समजता. या पद्धतींची ओळख दाखवायलाही तुम्हाला लाज वाटते.
आधुनिकतेच्या नावाखाली तुम्ही लोकांनी पहाटे ४-५ वाजता लवकर उठण्याची प्रथा सोडली आहे आणि तुमचे संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव याला मागासलेपणाचे समजत आहात. याला मुस्लिम जबाबदार कसे ?
तुमच्या समाजाने स्वतःची ओळख जपण्यासाठी सजग असायला हवे पण दुर्दैवाने हे तुम्ही तुमच्या समाजाला पटवून देण्यात असमर्थ ठरला आहात.
तुमची सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय आहेत? याचा विचार करा. आम्ही कारणीभूत आहोत का ?
खरी अडचण ही आहे की तुमचा समाज जागृत व्हावा अशी तुमची पण इच्छा आहे, पण तुम्ही स्वतः त्यासाठी पुढाकार घेत नाही. इतर लोकही तुमच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगताना दिसत नाहीत. त्यामुळे केवळ समाजच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुमचे धार्मिक भाषण ऐकायला तयार नसतात. त्यामुळे तुमच्या समाजात कोणीही कोणाचे ऐकत नाही. यात कुणाचा दोष आहे का ?
आम्ही योगासनासोबतच दिवसातून पाच वेळा नमाजही पडतो.
अनेक दशकांपासून तुमचीच हिंदू अस्मिता नष्ट करण्याची स्पर्धा सुरू आहे. आजही तुम्ही तेच करत आहात. पण जाळीदार टोपी व पेहरावाची आमची ओळख आम्ही आजही कायम ठेवली आहे.
जर तुम्ही तुमच्या परंपरा टिकवण्यात अपयशी ठरला असाल, तर मग तुमच्या अपयशाचा आणि निष्काळजीपणाचा ठपका इतरांवर का ठेवता ?
याऐवजी परंपरेचे संरक्षण कसे करावे हे तुम्ही शिकणे आवश्यक आहे.
आपल्या सभ्यतेच्या अभिमान बाळगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवा.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/16/2023 - 09:20
नवीन
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/16/2023 - 09:21
नवीन
मी यावर आमच्या ग्रुपमधे खालील प्रतिसाद उत्तरादाखल पोस्ट केलाय.
ब्राह्मण ब्राह्मणासारखा वागत नाही. मग बाकीच्यांनी त्याला का महत्व द्यावे?
पण माझा अनुभव मला असं सांगत आला आहे की, ब्राह्मणाने ब्राह्मणासारखे वागले तर वाईटातला वाईट सुध्दा कालांतराने आपल्याशी चांगले वागायला लागतो.
मात्र कलियुगातील "ब्राह्मण" या शब्दाची व्युत्पत्ती मी माझ्यापुरती बदलून घेतली आहे.
ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असतो असे मानण्याऐवजी, ब्रह्म जाणण्यासाठी प्रयत्न करणारा तो ब्राह्मण अशी माझी सुधारित व्याख्या आहे.
माझ्या विचारांशी सुसंगत पोस्ट आल्याने माझे मत मांडण्यासाठी स्वत:ला आवरू शकलो नाही.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 05/16/2023 - 12:37
नवीन
सदर लेखात लेखकाने विचारलेले प्रश्न अजिबात गैरलागू नसले तरी ह्या लेखातला आशय विचारात न घेता तो केवळ एका 'मुसलमान' व्यक्तीने लिहिला आहे म्हणून आपलेच (सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे तथाकथित हिंदू धर्माभिमानी) लोकं एकतर त्याकडे दुर्लक्ष तरी करतील किंवा त्यावर टिका तरी करतील!
ह्या विधानाची सत्यता मी स्वानुभावावरुन मान्य करतो!
सौदी अरेबिया ह्या कट्टर इस्लामी देशाकडून जगभरातील मुस्लिमांनी त्यांच्या कट्टर 'वहाबी' पंथाची धार्मिकमुल्ये अनुसरावी ह्यासाठी अब्जावधी 'पेट्रोडॉलर्सची' खिरापत वाटली जाते हि गोष्ट आता लपून राहिलेली नाही! भारतातही ह्या 'कार्यासाठी' त्त्यांच्याकडून प्रचंड गुंतवणूक केली जात आहे. मदरसे आणि मशिदींना त्यासाठी अर्थपुरवठा केला गेला/जातो आहेच, तसेच अनेक लहानशा खेडेगावांमध्येही टोलेजंग नवीन मशिदिंच्या उभारणीसाठी तुफान खर्च करण्यात आला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत शहरांत/निमशहरी भागांत आणि लहान-सहान खेडेगावांमध्ये कितीतरी अशा नवीन/चकाचक मशिदिंची उभारणी झालेली आपल्यापैकी अनेक डोळस लोकांच्या दृष्टीस पडली असेल. मशिदींच्या घुमटावरील किंवा मिनारांवरील चंद्रकोरीच्या विशिष्ट कोनावरून अशा सौदी 'फंडिंग' मधून उभारलेल्या नविन मशिदी ओळखणे आधी तसे सोपे होते, पण आता हळू हळू अनेक जुन्या मशिदींवरील चंद्रकोरींचा कोनही बदलण्यात येत असल्याने पुढे अशी ओळख पटवणे अवघड होत जाईल.
तर सांगायचा मुद्दा काय तर, जगभरातील सर्व मुस्लिमांची वेशभूषा अरबी पद्धतीची आणि बोली भाषा अरबी असावी ह्यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत. 'उर्दू' ह्या एतद्देशीय भाषेला मूठमाती मिळून भारतीय मुस्लिमांची बोली भाषाही अरबी करण्यासाठी आणि कुराण पठणासाठी मदरसे आणि मशिदींमधून अरबी भाषेचे वर्ग चालवले जातात तसेच भरघोस पारितोषिकांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात.
लेखात मी उल्लेख केलेल्या माझ्या मुस्लिम मित्राची 'कार्मेल कॉन्व्हेंट स्कुल'मध्ये शिकणारी (आता) १२ वर्षाची झालेली मुलगी लॉकडाऊन संपल्यानंतरही शाळा उघडल्या नव्हत्या त्या काळात मशिदीमध्ये चालणाऱ्या अशा 'अरबी' भाषा वर्गासाठी जात होती. अरबी भाषेचा गंधही नसलेल्या पण जात्याच हुशार असलेल्या ह्या मुलीने अवघ्या सहा महिन्यांत त्या भाषेवर नुसते प्रभुत्वच मिळवले नाही, तर त्यातील प्राविण्य जोखण्यासाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिकही पटकावले.
भारतात उर्दू भाषेतील बातम्या/कार्यक्रम दाखवणाऱ्या वाहिन्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत पण येत्या काळात स्थानिक अरबी वाहिन्याही सुरु होणार असल्याने त्यावरील कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी असल्याचे आणि त्यासाठी अस्खलित अरबी अॅक्सेंट मध्ये बोलण्याचा सराव करण्यासाठी 'अल जझीरा' आणि तत्सम अरबी वाहिन्यांवरील कार्यक्रम टीव्ही/इंटरनेटवर बघण्यास त्या भाषावर्गात सांगण्यात आल्याचेही तिच्याकडून समजले. आता हे त्या लहान मुलांनी अरबी भाषा शिकावी म्हणून दाखवलेले प्रलोभन होते/आहे कि खरंच त्यादृष्टीने तयारी सुरु आहे हे येत्या काळात स्पष्ट होईलच.
एकीकडे 'अल जझीरा' वाहिनीवरील वृत्तनिवेदिकांसारखा पोशाख आणि अगदी हुबेहूब त्यांच्याच लकबीत वार्तांकन करण्याच्या तिच्या सरावाचे व्हिडीओ जेव्हा हि मुलगी मला पाठवते तेव्हा तिची प्रगती बघून फार कौतुकही वाटते तर दुसरीकडे ह्या 'वहाबीकरणातून' भारतीय मुस्लिमांमध्ये वाढत जाणाऱ्या धार्मिक कट्टरतेची चिंताही वाटते.
हे प्रकार वेळीच रोखले गेले नाहीत किंवा भारतीय मुस्लिमांनी ह्या मातीतल्या संस्कृतीला तिलांजली देत आपल्या सामाजिक जीवनात किती प्रमाणात अरबी संस्कृतीचा अवलंब करावा ह्याचे भान ठेवले नाही तर हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
Wed, 05/17/2023 - 08:20
नवीन
म्हणजे नियोजनपुर्वक काम चालु आहे तर! अवघड आहे!!
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Wed, 05/17/2023 - 12:36
नवीन
होय!
आधी जास्तीतजास्त भारतीय मुस्लिमांना अरबी भाषा शिकवायची.
मग स्थानिक अरबी वाहिन्या सुरु करायच्या.
शहरांपासून गावखेड्यांपर्यंतच्या सुशिक्षित/अशिक्षित, गरीब/श्रीमंत अशा सर्व स्तरांतल्या सुमारे वीस कोटी मुस्लिमांना प्रभावित करू शकणारे हे माध्यम हाताशी आले कि मग त्यावरील कार्यक्रमांतुन कट्टर वहाबी पंथाची शिकवण/चालीरीती ह्यांचा रतीब घालायचा असे काहीसे नियोजन असावे असा अंदाज लावता येईल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/17/2023 - 18:01
नवीन
मी, CCC, नावाच्या कंपनीत कामाला होतो, सौदी अरेबिया मध्ये... सन, 2008-09....
बहुसंख्य कामगार, बिहारी मुस्लिम..... आणि त्या सर्वांचे एकमत असे की, सौदी हा आमचा मुलभूत देश आणि आमची खरी भाषा अरबीच आहे.... (कारण, मक्का आणि मदिना, सौदी अरेबिया मध्ये आहेत.) .... पाकिस्तान हा आमचाच भाग... एक ना एक दिवस, भारतात शरियत कायदा आम्ही लागू करणारच, असही ते म्हणायचे....
और 25 साल रुको ... IAS, IPS, MLA और MP भी हमारे होंगे, उस के बाद फिर से भारत में मुस्लिमों का राज होगा ... ह्यावर त्या सर्वांचे एकमत होते .....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 05/16/2023 - 19:43
नवीन
हिंदू आणि अन्य धर्मियांतही कट्टरता वाढिस लागून, परिणामी धार्मिक तेढही दिवसेंदिवस वाढत जाऊन, सामाजिक सलोख्याची पार ऐशीतैशी होऊन परिस्थिती चिघळण्याची रास्त भीतीही वाटते!
-----
जैन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?
पारशी आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?
स्वातंत्र्या नंतर आणि विशेषतः 1970 नंतर, बौद्ध आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?
ख्रिश्र्चन आणि हिंदू, यांच्यात किती दंगली झाल्या?
शीख आणि हिंदू यांच्यात किती दंगली झाल्या?
-------
बाय द वे,
तुम्ही कुराण वाचले आहे का?
आणि तुमच्या उदारमतवादी विचारसरणी बद्दल अभिनंदन...
मी तुमच्या इतका उदारमतवादी होऊ शकत नाही....
मी, ना राणा संगा होऊ शकतो, ना राणा प्रताप, ना लचित बडफुकन, ना छत्रपती संभाजी महाराज .... पण, मी सुर्याजी पिसाळ किंवा राजा जयचंद कधीच होणार नाही ....
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 05/16/2023 - 20:09
नवीन
असे ते एकसंध वाक्य आहे, त्यातले अर्धे वाक्य तुम्ही वेगळे काढुन अधोरेखीत केल्याने संपुर्ण वाक्याच्या मुळ अर्थाचा विपर्यास होतोय आणि त्यामुळे पुढचा तुमचा सगळा प्रतिसादच भरकटल्यासारखा वाटतोय 😀
मुळ वाक्यांची मोडतोड करुन त्यांच्या अर्थाचा विपर्यास करुन सादर करण्याची पत्रकार आणि न्युज चॅनल्सच्या अॅंकर्सची सवय आता त्यांच्या वाचक्/प्रेक्षकांमध्येही उतरत चालली आहे असे वाटते.
असो.........
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/17/2023 - 03:55
नवीन
आणि त्याच्याही आधी पासून, जैन आणि बौद्ध संस्कृति भारतात नांदत आहेत...
त्यामुळे, जैन आणि बौद्ध आणि हिंदू, ह्या संस्कृती एकमेकांचा आदर राखूनच होत्या आणि आहेत आणि पुढेही असतील....
तुमच्या वाक्यातील पहिला भाग पटला.
पण, त्याच वाक्यातील, पुढचा भाग पटला नाही.
म्हणून जो भाग पटला नाही, त्यावरच भाष्य केले.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/19/2023 - 17:41
नवीन
ही कथा सत्य आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 05/22/2023 - 19:27
नवीन
बरीच किंमत दिली पण वाचली
एखाद्या उच्चशिक्षित कमावती मुलीला जेमतेम १२ वी पास, कामधंदा नसलेल्या, मारहाण करणाऱ्या मुस्लिमाविषयी काय आकर्षण असावे?
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Mon, 05/22/2023 - 23:18
नवीन
मागणी तसा मथळे आणि बातम्या यांचा पुरवठा तर होत नाहीय ना?
पीडित तरुणी घरातून निघून गेली त्याची ना दाद ना फिर्याद. बरं या “हिडन ट्रुथचे” पाप सेक्युलर सरकारवर मारायचे असेल तर गेली निदान अठरा वर्षे मध्य प्रदेशात जाज्वल्य राष्ट्रप्रेमींचे सरकार आहे. तेव्हा सदरची ”तरुणी" निदान छत्तीस वर्षाची असावी.
भरीला तिचं ब्रेन वॉश पण झाले होते पण ती सर्व विचारधारा सिनेमाच्या तीन तासाच्या प्रबोधनाने बदलली. हा म्हणजे “हादसे के वजह से यादगाश वापस” येण्याचाच प्रकार दिसतोय.
बघा बुवा. बातम्या छापणं हा वर्तमानपत्र चालवणाऱ्यांचा व्यवसाय झाला. पण तुमचं तसं नाहीय ना. “आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ दुवा द्या” अशी मागणी करायची असेल तर आपले स्वतःचे दावे देखील बळकट असायला हवे ना?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 05/23/2023 - 03:05
नवीन
शहामृगी प्रवृत्तीचे ढळढळीत उदाहरण
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 05/26/2023 - 20:48
नवीन
बाय द वे,
श्रीगुरूजी,
काही लोकांच्या बरोबर प्रतिसाद-प्रतिसाद हा खेळ मी तरी खेळत नाही ..... आपलाच वेळ वाया जातो ...
आजची सही ...
उदारमतवादी हिंदू, हा हिंदू धर्माला लागलेला सर्वात मोठा कलंक आहे ......
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2