Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन शशक--मधुसापळा

र
राजेंद्र मेहेंदळे
Wed, 05/10/2023 - 10:13
💬 4 प्रतिसाद
अहो लक्ष कुठेय तुमचे? मी म्हणतेय मुलाकडे सिऍटलला जाऊया. पण तुमचे आपले काम आणि काम .सारखे मोबाईलमध्ये डोके खुपसलेले. जणू सगळ्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावरच. नाही जमणार ग.या महिन्यात दिल्लीला क्वाडची मीटिंग आहे. त्यानंतर युरोपला जायचे आहे. सध्या तर बोलूच नकोस सिऍटलचे. आता हे युरोपचे कुठून काढलेत? तुम्ही तर याआधी कामासाठी कधीच गेला नाहीत युरोपात? आणि आजकाल तुम्ही फारसे बोलतही नाही घरामध्ये. एनी प्रॉब्लेम? आता कसे सांगू हिला? सिमरन मागच्यावेळी बँकॉक मध्ये भेटलेली तेव्हा काय मजा केलेली आम्ही. फोनमधले फोटो पहिले की त्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. आताही ब्रसेल्सला बोलावतेय. तिकीट ,व्हिसा सगळे पाठवले आहे. स्वर्गसुख उपभोगायची अशी संधी पुन्हापुन्हा थोडीच मिळणार? =========================================== सलाम वालेकुम सिमरन! तुम्हे दिया हुवा मिशन कहातक पहुंचा? वालेकुम अस्सलाम! बंदर फस गया है जनाब. इस बार ब्रसेल्स बुलाया है उसे. बस तारीख बताओ. दौडा चला आयेगा. बहुत खूब. लेकिन पिछली बार बँकॉकमे कुछ सामान लेके नहीं आया था. पैसे और टाइम की बरबादी हुई. इस बार पुरी जानकारी मिलनी चाहिये. आप बिलकुल चिंता ना करे जनाब. मेरे जाल मे पुरा फसा है वो. और इस बार हमारी ऑफरभी बहुत बडी है. फिर भी नही मानेगा, तो बँकॉक ट्रिपकी उसकी बहुत सारी न्यूड फोटोज और व्हिडीओज मेरे पास है. ब्लॅकमेल करेंगे. आप बस कमांडरसे बात करके मेरे पती और बेटेको हिफाजतसे रखना.

प्रतिक्रिया द्या
1918 वाचन

💬 प्रतिसाद (4)
व
विवेकपटाईत Wed, 05/10/2023 - 14:28 नवीन
दोन्ही आवडले. हनी ट्रपचे उत्तम वर्णन. बाकी सुरक्षा संबंधित अधिकार्‍यांना अश्या निजी विदेश यात्रा करणे अशक्यच असते.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/11/2023 - 12:49 नवीन
सध्याचं प्रकरण नसतं, तर कदाचित या शब्दाचा अर्थ कथा वाचल्याशिवाय लागला नसता.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 05/11/2023 - 14:28 नवीन
खतरनाकच सापळा. लै भारी ... आवडल्या दोन्ही शशकज ! (हेरगिरीवरून पुण्यात एका संशोधकाला ताब्यात घेतले आहे हे प्रकरण ताजे आहे, त्यामागे असाच सापळा असावा अशी शक्यता व्यक्त होतेय !) अमुक स्टोरी, तमुक स्टोरी सगळीकडे स्टोरीच स्टोरी !
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 05/11/2023 - 16:24 नवीन
संपेल का कधी हा खेळ सापळ्यांचा.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा