जे न देखे रवी...
बस्स! फक्त एवढंच कर...
Primary tabs
दिवस कसाबसा निघून जाईल
कातरवेळ मात्र अंगावर येईल
तू फक्त माझी सय काढू नको
"ती" आली तशी संपून ही जाईल
मग काही अबोल-अनाथ स्वप्ने
वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत
रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील
डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील
त्यांना अजिबात थारा देऊ नकोस
डोळे अगदी घट्ट मिटून घे
हात बाहेर न काढता आतूनच
निग्रहाने "ती" खिडकी बंद कर
मग मऊ केस झटकून जरासे
कुरळ्या बटांना मोकळं कर
सुकलेले ओठ घट्ट करून
पाठीला उशी लावून स्वस्थ बस
पुर दाटून आलाचं पापण्यांमध्ये
तर त्याला तिथेचं थोपवून ठेव
अन् माझा चेहरा आठवलाचं
तर चुकूनसुद्धा झरू नकोस
मी "हरवून" गेलोय कधींचं
मला पुन्हा शोधत बसू नकोस
तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला
नकळत परका करू नकोस
बस्स !!! फक्त एवढंच कर...
रात्री उगाचं जागत बसू नकोस...
#चक्कर_बंडा
आवडली.
मी "हरवून" गेलोय कधींचं
मला पुन्हा शोधत बसू नकोस
तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला
नकळत परका करू नकोस
मी "हरवून" गेलीयं कधीची
मला पुन्हा शोधत बसू नकोस
तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्या
माझ्या वहिनीला नकळत परका करू नकोस
हल्लेच घ्या....
आपलं आसचं आसतयं बघा ,गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा.
पण भावना खुप सुंदर व्यक्त केल्यात.