(गोट्या)
Primary tabs
आमची प्रेरणा
वाट्या
सगळंच कसं मिळमिळीत, उदास आणि बुळबुळीत
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही छाप चाललेले असताना
कधीमधी आठवतात आयुष्याच्या वळणांवर भेटणार्या गोट्या
दोन मिटींगांच्या मध्येच स्मोकिंग झोन् पकडुन निवांत सुट्टा मारताना
लहानपणी शाळा बुडवुन, मैदानात मित्रांना जमवुन
हिरीरीने जिंकुन आणि अधाशीपणे खिशात भरुन घरी नेलेल्या
आईचे धपाटे ,बाबांची नजर आणि भावाची चापलुसी चुकवत
प्लास्टिकच्या डालडाच्या डब्यात, कपाटात दडवुन ठेवलेल्या
मग पुढे कधीतरी शाळा सुटली पाटी फुटली
होती नव्हती ईज्जत लुटली सोडवताना ईंजिनीयरिंगच्या केट्या
लेक्चर्,प्रॅक्टिकल्,सेमिनार्स्,प्रेझेंटेशन्स करताना
कँपस ईंटरव्ह्युच्या तयारीसाठी रात्रभर डोळ्यांच्या केल्या गोट्या
टेस्टोस्टेरॉनने मात्र किमया योग्य वेळी दाखवली
आणि उमगले अचानक, की अशाही असतात गोट्या
काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला
पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या
चटका बसला बोटाला आणि खडबडुन झालो जागा
संपली हातातली सिगरेट ,आता चला कामाला लागा
महिन्याअखेरीस चूल पेटायला पाहिजे घरात पेट्या
जरी मनात खोलवर असतील भूतकाळातील गोट्या
म्हणजे साधारण
सखि मंद झाल्या तारका
गोट्यांच्या झाल्या खारका
असे का?
कविता बरीक छान उतरलीय. मिपाचे जुने दिवस आठवले, त्यापायी काहीसा जाणून बुजून फुलटॉस टाकला होता बोर्डावर. अनेक षटकार आणि कॅचेस उडताहेत. ;-)
सखि मंद झाल्या तारका
गोट्यांच्या झाल्या खारका
महिन्याअखेरीस चूल पेटायला पाहिजे घरात पेट्या .... सर दंडवत __/\__
सही!
सुरु ठेवा.
-दिलीप बिरुटे
चाट्या,लाळघोट्या,ढेरपोट्या
अशा या जीलब्यांचे पडतील सडे
रडतील वाचकांचे धडे...
कुणीतरी आवरा या भाटांना
लावा वाटेला,
देऊन त्यांच्याच वाट्यानां
करा शितकपाट खाली
जरा जागा द्या माझ्या बियरच्या
बाटल्यांना....
अता आत्मुसबुवांच्या लोट्या येणे बाकी राहिलेय.
भारीच....
लै भारी ... एक नंबर जमलीय !
ब्राव्हो ..... राजेंद्र मेहेंदळे ...सलाम-वंदन-प्रणाम-दण्डवत !
अरेरे ..... सो सॅड !
काळजी घ्या सर !
जबराव, (मद-)मस्त कवन.
- कोई गल नही बादशाहो,
... अश्या वेळीच तर येती, कामास मुठ्या - कायकू घालते कपाळको आठ्या ?
मेहेंदळ्यांच्या फुलटॉसवर चित्रगुप्तांचा सणसणीत षटकार!
बाकी, कपाळांत जाणाऱ्या गोट्यांबद्दल शिंचं कुणी अजून कसं बोललं नाही ते! ;-)
नाजूक विषय !
;-)