मदत हवी आहे - दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे राहण्यास जागा
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे.
कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा.
१. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे.
२. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी.
३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी.
४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे.
५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.
६. शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक असल्यास प्राधान्य
जरी सगळ्या अटीत बसणारी ठिकाणे नसतील तरी सुचवा.
मदतीसाठी धन्यवाद.
2)
3)sightseeing by hoho
4) sightseeing by metro
कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही.बरोबर कोण आणि किती जण आहेत?८ ते १० तरुण लोक.अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी