मदत हवी आहे - दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे राहण्यास जागा
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे.
कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा.
१. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे.
२. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी.
३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी.
४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे.
५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.
६. शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक असल्यास प्राधान्य
जरी सगळ्या अटीत बसणारी ठिकाणे नसतील तरी सुचवा.
मदतीसाठी धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(64)
T
Trump
Tue, 06/27/2023 - 16:10
नवीन
वय/अनुभव वाढला की सगळे कसे नियोजीत हवे असते. पण बरेचदा असे जाणवले की जेवढा वेळ आंनद घेण्यात जातो. त्यापेक्षा जास्त वेळ नियोजनाची डोकेदुखी करण्यात जातो त्यामुळे कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 06/27/2023 - 16:35
नवीन
कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.
त्यात गैर काही नाही पण मुळात तुमच्या काही अटी विसंगत वाटतात ..
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Wed, 06/28/2023 - 11:25
नवीन
दिल्ली फिरायला किती दिवस हे तुम्ही काय पाहणार यावर आहे . फक्त अक्षरधाम करायचे झाले तर अर्धा दिवस जाईल. स्थळांची यादी करा,
मथुरा नि वृन्दावन करायचे असेल तर शक्यतो ८ च्या आधी निघा. ११ वाजता भोग लागतो मंदिरे बंद होतात . एक दोन मंदिरेच पहा , मरणाची गर्दी असते . विशेषतः बांकेबिहारी ला . वृन्दावन ला सुद्धा इस्कॉन ला जाणार असाल तर वेळ काढून जाणे. आग्रा नि मथुरा जवळ आहे .
लोक दिल्ली सेन्टर पॉईंट धरून बेत आखतात पण वेगळा विचार करा . मुंबईहून जाणारी एक राजधानी मथुरेला थांबते . मथुरा आग्रा करून शेवटी दिल्ली करणे म्हणजे विमान व ट्रेन दोन्ही बेत आखता येतात . ७-८ माणसे म्हणजे हॉटेल पेक्षा धर्मशाळा च चांगली.
मथुरा नि वृन्दावन ला सोय होईल. हिप्पी टूर करायचीय तर हॉटेल नि सोयींबद्दल "नो कटकट आवर पटापट " धोरण हवे .
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/28/2023 - 14:14
नवीन
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही.
बाकी पुणे/मुंबई निघण्याचे ठिकाण यावर ट्रेन/विमान प्रवासात फरक पडतो.
आम्ही आठ जण (तीन कुटुंबे )असल्याने फुल डे दिल्ली टुअर घेतली होती. मला त्यातली दोनच ठिकाणं खरं तर पाहायची होती. मी बाकी ठिकाणी आत गेलोच नाही. बोरिंग.
(वृंदावन, गोकूळ येथे बेकार घाण होती)
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 06/29/2023 - 08:15
नवीन
समुहाने प्रवास करणे म्हणजे नियोजन, अचानक होणारी तारांबळ अश्या गोष्टी नेहमीच्याच आहेत.
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 06/29/2023 - 08:16
नवीन
धन्यवाद श्री विअर्ड विक्स
- Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स
Wed, 06/28/2023 - 11:26
नवीन
सकाळी ८. ० च्या आधी
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 07/06/2023 - 08:58
नवीन
मदत करणार्या सर्वांचे धन्यवाद.
श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती.
श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.
- Log in or register to post comments
T
Trump
गुरुवार, 07/06/2023 - 08:59
नवीन
मदत करणार्या सर्वांचे धन्यवाद.
श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती.
श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 07/06/2023 - 12:46
नवीन
अशा काही जागा कोणत्या शहरांत कुठे आहेत हे कुणी सांगत नसतं. तरीही शोधायच्या कशा ते सांगतो -
१)लोनली प्लानिट'ची पुस्तके बऱ्यापैकी मार्गदर्शन नकाशे,नावांसहीत करतात. नॉर्थ इंडिया,साऊथ इंडिया. पण २०००पूर्वीच्या आवृत्त्या चांगल्या आहेत. रुम रेट जुने धरू नका पण एकूण शोधाशोध सोपी होते.
२) स्कुटर,टूविलरवरच्या मनुष्यास विचारावे की हॉटेल्स कोणत्या बाजूला/रस्त्यावर आहेत. तो स्थानिक जरा फिरणारा असतो. किंवा दुकानदारही सांगतात.
साधारणपणे आपला पेहराव, कुटुंब असल्यास ते योग्य जागी पाठवतात हा अनुभव आहे.
३)भरपूर फिरण्यासाठी बस स्टँड पासून दूरचे हॉटेल बघू नये. अगदी सकाळी ते रात्री येण्या जाण्यात अडचण येत नाही. बसेसचा पर्याय असल्याने टॅक्सी ,रिक्षावाले नरमच राहतात.
तसेच खाणे,चहा यासाठी भरपूर चांगले पर्याय असतात. वेळेची अडचण येत नाही. सकाळी साडेपाच रात्री बारा पर्यंत खाणे हा प्रश्नच पडत नाही.
४) नवीन ठिकाणी आपला फिरण्याचा प्लान योग्य व्यक्तीस सहज सांगावा. तो आपणहून बरीच चांगली माहिती देतो. याबाबत माझा अनुभव खूप चांगला आहे.
५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटो रिक्षा स्टँडवर, रिक्षावाल्यांस कधीही विचारू नये. दूरवरच चौकशी करावी. त्यांच्या फायद्याच्या रूटवर नेणे गळ्यात मारतात.
६) रुम पाहिल्यावर टॉइलेट, बिछाने पाहावेत. टापटीप स्वच्छता लगेच लक्षात येते. त्यावरून रेटशी तुलना करावी. खिडक्यांना जाळ्या असाव्यात. डास येत नाहीत. दिल्लीत डेंग्यू फार आहे. विशेष लक्ष द्यावे.
चेकाउट टाईमची खात्री करावी. स्वस्त हॉटेलांतले चार्जिंग पॉईंटस चालत नाहीत किंवा एकच चालू असतो तो उंचावर असतो. तीन चार मोबाईल चार्ज कसे करणार? एक्स्टेंशन बोर्ड छोटासा जवळ ठेवावा.
७)प्रवासात जर तीन ठिकाणी हॉटेल बदलणार असाल तर प्रत्येक व्यक्तीचे एकूण पाच पाच आधार फोटोकाप्या जवळ असू द्याव्यात. राहणाऱ्या प्रत्येकाची आधार प्रत मागण्याचा प्रघात पडलेला आहे. ऐनवेळी आजुबाजूस फोटोकापी काढणारे नसतात किंवा पावर गेलेली असते.
८) रिक्षावाले "हॉटेल रुम दाखवतो" चला म्हणतात तेव्हा त्यांचे कमिशन असते तिथेच नेतात. रिक्षातून फिरून रुम शोधू नये.
९)रुमवर कपडे धुता येत नाहीत (नियमाने). पण गुपचूप धुवावे लागतात. कपडे वाळत घालण्यासाठी लांब दोरी जवळ असावी. थोडे कपडे नेऊन प्रवास आटोपता होतो.
-------
जागा सापडली,घेतली. पुढे काय तर फिरणे,पाहाणे.
आजुबाजूस टपऱ्यांतून ,वनडे/हाफ डे टुअरचे बोर्ड दिसतात तिथून त्यांची माहिती पत्रकं गोळा करावीत. त्यातून किती रुपये,कोणती ठिकाणं केव्हा दाखवणार त्या वेळा छापलेल्या असतात. यावरून लगेच समजेल की कोणत्या ठिकाणी केव्हा जायचे नाही.. समजा प्रत्येक टुरमध्ये "भहाई मंदिर - संध्याकाळी सात ते साडेसात" दिसले तर त्या वेळी तिथे जायचे नाही. आपण स्वतंत्र वेगळ्या वेळी जायचे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 07/07/2023 - 16:03
नवीन
रेल्वेने जाणार असलात तर रेल्वे रिटायरिंग रुम हा सर्वात उत्तम पर्याय आहे.
सरकारी असल्यामुळे प्रशस्त खोल्या असतात आणि आता आय आर सी टी सी कडे व्यवस्था गेल्यामुळे कर्मचारी वर्ग नम्र आणि मदत करणारा असतो.
आपल्या खिशाला परवडेल अशा सर्व तर्हेच्या खोल्या डॉर्मिटरी पासून वातानुकूलित आरामदायी खोल्यापर्यंत सर्व उपलब्ध असते.
याशिवाय काही स्थानकांवर अगदी १ तासासाठी सुद्धा खोली डॉर्मिटरी मिळू शकते.
याशिवाय आपल्या पेहरावाकडे बघून भाडे कमी जास्त होत नाही.
रिक्षा, टॅक्सी, बस आणि रेल्वे ची शिवाय खाण्यापिण्याची सर्व दर्जाची व्यवस्था आणि सुविधा २४ तास ती सुद्धा हाकेच्या अंतरावर असते हा सर्वात मोठा फायदा असतो.
ओला उबेर सुद्धा अगदी विचित्र वेळेस सुद्धा हमखास उपलब्ध होतात. या शिवाय ४८ तास अगोदर आपला बेत रद्द झाला तर केवळ २० % कापून सर्व रक्कम परत केली जाते.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 07/08/2023 - 09:43
नवीन
मजेशीर धागा. गरजा आणि अटी पाहून मौज वाटली.
... आणि प्रतिसाद, चर्चा वाचून धमाल आली !
सहल झाल्यावर वृतांत यायलाच पायजेल .. नै तर हा धागा व्यर्थफुकाट !
सहल भटकंती वृतांत (आलाच तर) मी पैले वाचणार ...कमेंट मी आधी पैली करणार !
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 07/08/2023 - 10:47
नवीन
आपण कुठे काय अपेक्षेने गेलो आणि प्रत्यक्ष काय घडलं हे प्रामाणिकपणे लिहून ठेवल्यास पुढच्या पर्यटकांस निश्चितच लाभ होत असतो. फजिती झाल्यास तीही लिहावी. चार लोक हसले तर हसू द्यावं.
लोनली प्लानिटची काही जुनी पुस्तकं तशी आहेत. १९९३ सालात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं नाव - India -a travel survival kit हे आहे.
. एखाद्या ठिकाणी स्वस्तात जाता राहता येत असेल तर महागातही राहू शकतो. पण उलट खरं असेलच असं नसतं. आमच्या इथल्या एका शाळेतल्या सहायकाच्या तरुण मुलाशी(२३) ओळख झाली आणि गप्पा मारताना तो म्हणाला माझा भारत फिरून झालाय. मी सहज काही विचारले तेव्हा समजले की खरोखरच तो स्वस्तात एकटाच फिरलाय.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sat, 07/08/2023 - 11:22
नवीन
खरंय ! नुसती मदत मागवून / प्रश्न विचारून पळ काढला की मजा नाय ... आपले अनुभव , सोयी, गैरसोयी फजीती हे लिहायला पायजले ना राव !
सहायकाच्या मुलाचा अनुभव भारी आहे !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2