Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सार्थक जीवन

अ
अनुस्वार
गुरुवार, 06/29/2023 - 17:12
💬 19 प्रतिसाद
जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात. मात्र सर्व अवयव असूनही मने अपुरी असणारे जीवनाचा मतितार्थ शोधण्यास असमर्थ ठरतात. या महापुरात कधी नात्यांचा ओंडका आधाराला येतो तर कधी अविश्वासाचा भोवरा श्वास गुदमरून टाकतो. हे परीक्षेचे क्षण नसतात. ही केवळ जगण्याची तयारी! पुढे एखादा असा टप्पा येतो, की तिथे चक्क महापुराची मजा वाटू लागते. सगळे भेदाभेद जीवन-प्रवाहाने व्यापून टाकलेले, सगळीकडे फक्त आपल्यासारखे जीवन, भावनांची चौफेर इतकी दाटी, की त्यातून वाट शोधताना वाऱ्याची सुद्धा दमछाक व्हावी. आणि आपण मात्र स्तब्ध, निश्चल, प्रवाहापासूनही विरक्त... कदाचित किंचितसे हवेतच! तो जीवनाच्या परीक्षेचा क्षण - सगळ्या लवाजम्याची निरर्थकता पटूनही त्यात अर्थ शोधण्याची आंतरिक ऊर्मी पेटून ती तेवत ठेवण्याची धडपड! या परीक्षेला केवळ सामोरे जाणे हेच परीक्षा पास करण्यासाठी पुरेसे ठरते. प्रश्नांच्या स्वरूपात जीवन कशाने सार्थकी लागणार याचे उत्तर मिळते. जिवंतपणाचे स्वागत आणि मृत्यूचे आभार मानता आले की जीवन सार्थकी लागते.

प्रतिक्रिया द्या
5042 वाचन

💬 प्रतिसाद (19)
च
चित्रगुप्त गुरुवार, 06/29/2023 - 22:17 नवीन
लेखकाने व्यक्त केलेले विचार मननीय आहेत, परंतु त्यांना प्रत्यक्ष अनुभवाचे अधिष्ठान देता आले तर उत्तमच.
या परीक्षेला केवळ सामोरे जाणे हेच परीक्षा पास करण्यासाठी पुरेसे ठरते. प्रश्नांच्या स्वरूपात जीवन कशाने सार्थकी लागणार याचे उत्तर मिळते.
-- धागाकर्त्यास नेमक्या कोणत्या प्रश्नांच्या स्वरूपात 'कशाने जीवन सार्थकी लागणार' याचे उत्तर मिळालेले आहे, हे स्पष्ट केल्यास वाचकांना या लेखाचा थोडासा उपयोग होऊ शकतो, आणि पुढे चर्चाही होऊ शकते. अन्यथा नुस्तेच शब्दांचे पोकळ बुडबुडे - उत्पद्यन्ते विलीयन्ते असे व्हायचे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 06/30/2023 - 06:38 नवीन
चित्रगुप्त काका. - आपल्याशी या विषयावर एकदा चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा. - सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
च
चित्रगुप्त Fri, 06/30/2023 - 10:50 नवीन
काहीही हं गवि. कसली डोंबलाची प्रतिभासाधना अन काय. बायकोने सांगितले तेच, तसेच आणि तेंव्हाच करणे हीच आमुची मुख्य साधना. तरी 'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक स. त. कुडचेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" हे तत्व चित्ती धरून आम्ही अधून मधून त्यातून जरा वेळ निसटून मिपावर येण्याचा प्रयास करीत असतो. त्यातून अलिकडे आमच्यावर अभद्र प्रतिसाद देण्याचे लांछन आलेले. बाकी चर्चा हाही आमचा प्राणवायु. केंव्हाही करुया. काय वांधा नाय. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
विवेकपटाईत Fri, 06/30/2023 - 07:54 नवीन
सध्या मोबाईलवर बिछान्यावर पडल्या पडल्या प्रतिसाद देत आहे.प्रतिसाद दिल्या शिवाय जीवन सार्थकी लागत नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 07/01/2023 - 08:01 नवीन
जीवनात सध्यातरी कसलेच गहन प्रश्न पडलेले नाहिय्येत. प्रश्नच पडले नसतील तर जीवन सार्थकी कसे लागणार हा प्रश्न मात्र आता पडला आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 07/01/2023 - 15:03 नवीन
तर पहिलाच प्रश्न पडतो तो म्हणजे सार्थक म्हणजे काय? जीवन सार्थकी लागणे म्हणजे नेमके काय होणे? ज्यांचे जीवन सार्थकी लागले आहे असे कुणी आहे का? असेल तर त्याची लक्षणे काय? त्याला कसे ओळखावे? जेव्हापासून समर्थ रामदास माहीत झाले तेव्हांपासून प्रश्न पडणे बंद झाले. स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे याच प्रश्नात मन इतके गुंतले की बाकी प्रश्न उडन छू हो गये. पुढे स्वामींनीच मार्ग दाखवला, मना त्वाची रे पुर्व संचित केले घडे भोगणे प्राप्त झाले त्यामुळेच प्रश्न पत्रीका कोरी व म्हणून उत्तर पत्रीकाही कोरीच. तरीही वरील प्रश्नांची उत्तरे कुणाला माहित असतील तर कृपया प्रतिसादावे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 07/05/2023 - 00:15 नवीन
ज्यांचे जीवन सार्थकी लागले आहे असे कुणी आहे का?
यात थोडा बदल करून -- "ज्याला आपले जीवन सार्थकी लागले आहे असे वाटते, असे कुणी आहे का ?" -- असा प्रश्न कराल तर त्याचे उत्तर "मै हूं ना" असे मला देता येईल. लवकरच यावर स्वतंत्र लेख लिहावा म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 07/04/2023 - 14:39 नवीन
आय्याम द यु इन द यु अँड शी इज इन द ह्यु---थोडक्यात डोक्याचे दही झाले आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 07/04/2023 - 15:49 नवीन
तुमचं आयुष्य सार्थकी लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
ग
गवि Tue, 07/04/2023 - 16:07 नवीन
आय्याम द यु इन द यु अँड शी इज इन द ह्यु
तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 07/05/2023 - 11:14 नवीन
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.260616 नाही बुवा, आपल्याला ईंग्लिश येत नाही फार वाचता. कामापुरते बोलतो/वाचतो. बाकी दासबोध आणि तुकोबांची गाथाच डोक्यावरुन जातेय, आणि अजुन कुठे ट्युन करु म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 07/05/2023 - 12:15 नवीन
हे नाही हो.. सुप्राकाँशसच्या लेव्हलवरुन ऑकल्ट एकस्पिरीयंस घेताना.. नाही तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच.. ;-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
म
मिसळपाव Wed, 07/05/2023 - 14:52 नवीन
अहो, तुम्ही वाचलंय का? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 07/05/2023 - 16:03 नवीन
अहो, तुम्ही वाचलंय का? :-)
वाचलंय?? ह्य ह्य ह्य...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
ट
टर्मीनेटर Wed, 07/05/2023 - 16:08 नवीन
वाचलंय? हॅ हॅ हॅ... काय सांगु साहेब...मीच लिहिलंय... गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिही... लिहुन टाकलं 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 07/05/2023 - 16:25 नवीन
आता अक्षरधारा किंवा बूकगंगा मधे जाउन इन ट्युन विथ द ट्युन शोधणे आले :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ग
गवि Wed, 07/05/2023 - 16:41 नवीन
नका शोधू. ते या विश्वात नाही. भाईंच्या त्या समांतर विश्वात आहे. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
ट
टर्मीनेटर Wed, 07/05/2023 - 16:52 नवीन
नाही पण तुम्ही एकदा 'इन ट्यून विथ द ट्यून' वाचाच.. पाच रुपये किंमत आहे... अक्षरधारा किंवा बूकगंगा वर उपलब्ध नाहिये, पण इथे (1:22:41 ते1:23:05) मोफत ऐकायला मिळेल 😂
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
क
कर्नलतपस्वी Tue, 07/04/2023 - 15:55 नवीन
जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. दोन पाच सेकंदातच आयुष्य सार्थकी लागेल. सुरवात चुकली. आयुष्याची आता झाली उजवण किंवा... नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी अशी अवस्था केव्हा होते आशी काहीतरी सुरवात हवी होती.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा