माझं ठरलं होतं आता थेट पुष्पा २ बघायला थिएटरला जायचं.पण मैत्रिणी म्हणाल्या बाईपण भारी देवा या सिनेमाला जायचं.असे सगळे आनंदासाठी एकत्र येणार असतील तर मला उधाण येतं.मग सोमवारपासून गुरूवार पर्यंत रोज बुक माय शो चेक करत होते.गुरूवारी रविवारीच बुकिंग दिसायला लागलं.लगेच तिकिटे,बर्गर ,पोपकार्न सगळं बुक केलं.फर्मान सोडलं ट्रेंड नुसार गागल आणि नथ कम्पल्सरी घालून यायचं.रविवारी सगळे थिएटरला धडकलो.ले सेल्फी दंगा नी काय सुरू.डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.
पण पहिल्याच सिनला वंदना गुप्तेची तडफडार एन्ट्री दाखवून पुढे मौजच आहे हे समजलंच.
तर वंदना (शशी), रोहिणी हट्टंगडी(माई), सुकन्या (साधना),दीपा(चारू), सुचित्रा (पल्लवी), शिल्पा(केतकी) या सहा काकडे बहिणी.आता मध्यमवयीन स्वावलंबी मध्यमवर्गीय आहेत.बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे.
तडफदार शशी मंगळागौर स्पर्धेसाठी भाग घ्यायला टीम तयार करत असते.मग काय बहिणी एकमेकांपासून जवळ नसल्यातरी वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी सोडविण्यासाठी मंगळागौर स्पर्धा एक संधी म्हणून पाहतात.आणि हो हेच बाईपण भारीच एक महत्त्वाचं रूप आहे.वर्षांवर्षे चालणार्या नवरा बायको दोन चाकांच्या संसारात केव्हा बायको या चाकावर माघार,मन मारणं, मुलांच्या संगोपनाची,पै पाहूण्यांचा ,कधी आर्थिक नियोजन , पुरूषी अहंकाराची मर्जी सांभाळणे या सगळ्यांचा अतिरिक्त भार पडतो समजतच नाही.जरा यातून वेळ काढून बाई निसर्गालाही घट्ट बांधील आहे.वयात येणं,गर्भारपण, रजोनिवृत्ती याही गोष्टी तिला टाळता येत नाही.अशावेळी आपली स्वप्ने,आकांक्षा तिने बाजूला केलेल्या असतात.एका टप्प्यावर तिला त्या जुन्या स्वप्नांची जोड परत मिळाली तर तिच्या पंखात कमालीचे बळ येईल.ती खर्या अर्थाने बाई म्हणून जगेल.
मग काय मंगळागौर निमित्ताने जे एक एकेची समज गैरसमज,गिल्ट , वैयक्तिक अडचणी ढवळून निघतात.एकमेकींच्या मानसिक आधाराने त्या मार्ग काढतात आणि जिंकतात.
या सिनेमातील काही आवडलेल्या गोष्टी -
१.सिनेमात प्रत्येक पात्र समाजातील आढळणाऱ्या सगळ्या बायकांना समाविष्ट केलं आहे.एक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर,एक मातृत्वापासून वंचित,सिंगल प्यरेंट,एक पुरूषी वर्चस्व असलेल्या घरातली, नवर्याच्या चुकांना पाठीशी घालत संसाराचा बोजा एकटी घेणारी,पैशावाल्या घरात किंमत नसणारी अगतिक,
ज्यामुळे सिनेमा बघणारी प्रत्येक बाई कोणत्या तरी एका किंवा एकापेक्षा जास्त पात्रात स्वतः ला रिलेट करते.आणि यामुळेच बायकांची प्रचंड साथ सिनेमाला मिळत आहे.
२.रजोनिवृत्तीवर भाष्य -अजूनही हा विषयावर अवेरनेस खुप कमी आहे.या बदलासाठी कसं सामोरं जायचं हे बायकांना ठाऊकच नाहीये.
३.गर्भपिशवी काढून टाकणे-ही आरोग्याची समस्या लहान वयापासून मोठ्या स्त्रियांपर्यत कोणालाही जाणवू शकते.बाईपणाच सर्वात मोठं वरदान गर्भ पिशवी आहे.ते शरीरातून बाहेर काढल्यावर स्वतः तिला आणि आजूबाजूच्या व्यक्तींना कमीपणा वाटू नये.
३.यातला एक संवाद "एक दिवस स्वतः चा तो बर्थडे आणि ३६४ दिवस कशाचे तर स्ट्रेस चे" खरोखर बायकांसारखा स्ट्रेस जगात कोणी घेत नाही.ते बायकांनी व्यायामाची जोड लावून दूर केलं पाहिजे.
४.ती जेव्हा स्वतः च्या पैशाने आय फोन घेते.स्वावलंबी असणं अधोरेखित करते.
५.नवरा अथवा कोणत्याच बळावर घट्ट बांधता येत नाही . अशावेळी अशा नात्यातून 'मोकळं ' होऊनच स्वतः साठी जगावं.
६.आपण बांध स्वतः हून बांधत राहिलो तर पुढच्या मुलींनाही/पिढीला ते बांध तोडायला अजून वेळ लागेल.विनाकारण छंदांना बांध नकोच.
७.रोहिणी हट्टंगडी आणि तिच्या सपोर्टिव्ह नवर्याचं बोडिंग खुपच छान दाखवलं आहे.
८.आणी ते शेवटचं गाणं "जय देवी मंगळागौर"जबरदस्त!काय सुंदर दिसल्या आहेत सगळ्या.खुपच गोड!शेवटी बाई ईश्वराची सौंदर्यवती,नाजूक देणगी या पृथ्वीवर आहे पण भारी बाईपण निभवायला देवाने तिला अद्भूत मानसिक ताकदही बहाल केली आहे.
टीप-पुर्ण लेखात स्त्री, स्त्रिया असा शब्द पुस्तकी न वापरता थेट सतत बायका शब्द वापरून भारी वाटलं!
-भक्ती
आम्ही भारी बायका :)
सोशल मिडियावर तसेच टीव्हीवर याचे जोरदार प्रमोशन दिसतच होते. तुमच्या लेखाला पाहून आता खात्री झालीये. या विकांताला घरच्या सर्वांना घेऊन जाईन.
सं - दी - प
कालच घरातल्या सर्वांना घेऊन गेलो होतो. तुफान गर्दी होती. आमच्या भागात एमआयडीसी ला गुरूवारी सुट्टी असते त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण थिएटरमधल्या स्टाफसोबत बोलणे झाले तर त्यांनी सांगितले की आजच्याइतकी नसली तरी रोजच गर्दी होत आहे.
चित्रपटाबद्द्ल काय बोलायचे. इथे लेखात आणि काही प्रतिसादातून गोष्टी आलेल्याच आहेत. चित्रपटाला माझ्यातर्फे वरचा "सा"! :)
(उद्या 'मिशन'ला जायचे बाब्बा)
सं - दी - प
सगळ्या बायका, त्यातही म्हातार्या (त्यातल्या त्यात दीपा परब वगळता ) !! कोणता पुरुष आवडीने बघेल असा चित्रपट
एकवेळ ऋता दुर्गुळे, , शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, तेजश्री प्रधान, पूजा सावंत, मयूरी देशमुख (ही अलका कुबलची नवीन आवृत्ती वाटते, पण तरी आवडते) अशी स्टारकास्ट असती तर बघितला असता :)
कालच पाहिला. आणि खरेच आवडला.
मंगळागौर स्पर्धेचे अप्रूप नाही. चित्रपटातही ती काही मेन थीम वगैरे नाही.
सगळ्यात जास्त कौतुक मला केदार शिंदेचे करावेसे वाटते.
अगदी चढत्या भाजणीने केदार शिंदेने चांगले सिनेमे दिले आहेत. महाराष्ट्र शाहीर नंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. हा चित्रपट त्याचा सर्वोत्कृष्ट वाटला.
चित्रपट गल्ला जमवू लागले की असं म्हणायची प्रथा आहे. टीकाकार बसतात हात चोळत आणि निर्माते जातात बँकेत हसत. . . (हल्ली जावे लागत नाही पेन घेऊन ते सोडा. पण वाक्प्रचार उरलाय.)
मस्त रिव्ह्यू आणि पोस्ट व फोटो जब्र्या !!
कालच आमच्या संस्थानाच्या तमाम महिला मंडळाला (एकूण ९ त्यात सर्वात तरुण म्हणजे मातोश्री व त्यांच्या सूना लेकी नाती अशा साधारण वय वर्ष ६१ ते १७) कोहिनूरच्या कॉनप्लेक्सला रात्री शो ला सोडणे व परत आणणे ही जिम्मेदारी अस्मादिकांनी अत्यंत मनस्वी पणे पार पाडली आहे .... ते सुद्धा रात्री मित्रांकडून आषाढ मास समारंभाचे अत्यंत आग्रहाचे निमंत्रण मन घट्ट करून अत्यंत कठोरपणे नाकारूण व त्याचे किती गंभीर (आर्थिक ) परिणाम आता सोसावे लागतील याची पूर्ण कल्पना असतांनाही... त्याग त्याग म्हणतात तो आणखी कशाला ... पण केवळ महिलांच्या आनंदासाठी....... छे छे आता आणखी काही सांगवत नाहीये सुज्ञांनी जाणून घ्यावे.
ता. क. बाकी ते नुस्त फिल्म बघायला जाण वेगळं नी या पिक्चर ला जाणं वेगळंच हो....नाही म्हंजे यांना सोडल्यावर जरा वेळ उगाच अळंम टळंम केल्यावर जीन्स वर नथीचा रुबाब बराच बघायला भेटला असो ...
चित्रपटाचे परीक्षण उत्तम जमले आहे.
मी देखील स्वभार्या, भगिनी आणि बंधूभार्या यांना तिकीटे काढून देण्याचे पुण्यकर्म केले. मला तेवढेच चार तास (बायको नसतानाचा एकांत) मिळाला आणि मस्त ताणून देता आली. संपूर्ण चित्रपटगृहात मोजकेच लांबोडे होते असे कळाले.
आमच्या इकडे तर मराठी बायकांच्या नादी लागून इतर भाषिक बायका देखील हा चित्रपट पाहून आल्या.
अवांतर : चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपट पाहणार्या बायकांच्या नाकातील नथ वेगळ्या (डाव्या विरुद्ध उजव्या) नाकपुडीत आहे की सेल्फी मुळे मिरर इफेक्ट आला ते काही कळाले नाही.
स्त्री प्रधान सिनेमा, खुप भावनिक असेल असं वाटलं.पण या सिनेमात रडायला लागणार तोच एखादा सिन लगेच हसवतो :) त्यामुळे थिएटरमध्ये आपोआप जास्त रडू नाही आलं -))
मागच्या वाढदिवसापासून घरी डम्बेल वापरायला सुरुवात केली.बरीच स्ट्रेन्थ वाढली.हार्मोनमध्ये चांगले बदल होतात ! स्ट्रेन्थ ट्रेनिंगने त्याचा संदर्भ...
बायकांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग जरूर करावे,आनंदी हार्मोन वाढतात
जेवढी चर्चा झाली त्या मानाने चित्रपट पाहून निराशा झाली..
कथेत फारसा दम नसतानाही एवढा प्रतिसाद मिळतोय हे आश्चर्य आहे. मेनोपॉज, गर्भारपण इ. गोष्टी सतत चघळत बसणे म्हणजे स्त्रीत्वाचे over ग्लोरिफिकेशन वाटते मला तरी.
बाकी दुसरा फोटो जबरदस्त !!
आम्ही काही जणींनी ग्रुपने जाऊन पनवेलच्या थेटरात सिनेमा पहिला. आवडला. आम्हीही सहा बहिणी असल्याने असेल कदाचित. त्यातच पुतण्या येथील कर्मचारी असल्याने तिकिटे, पिझ्झा, बर्गर सर्व फुकट सोय झाली. तुमचा फोटो भारी. नथ आणि गॉगल नसल्याने आमचा फोटो बाद.
दोन दिवस उशिरा गेलो असतो तर पुतण्यासोबत मी सुद्धा तारकांबरोबर फोटो काढला असता ना!
त्याग त्याग म्हणतात तो आणखी कशाला... पण केवळ महिलांच्या आनंदासाठी....... छे छे आता आणखी काही सांगवत नाहीये सुज्ञांनी जाणून घ्यावे. ता. क. बाकी ते नुस्त फिल्म बघायला जाण वेगळं नी या पिक्चर ला जाणं वेगळंच हो....नाही म्हंजे यांना सोडल्यावर जरा वेळ उगाच अळंम टळंम केल्यावर जीन्स वर नथीचा रुबाब बराच बघायला भेटला असो ...माहेरच्या साडी नंतर गृपा गृपाणे व कुटुंबाच्या कुटुंबाने (महिला सदस्य) एकत्र जाऊन पाहिलेला हाच एक चित्रपट असेल ...