जे न देखे रवी...
हे सुरांनो चंद्र व्हा
Primary tabs
https://www.esakal.com/desh/woman-climbs-tower-in-madhya-pradeshs-shivp…
या बातमीवर कविता
(कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
हे सर्वांनो, तारयंत्र व्हा!
हे सर्वांनो, तारयंत्र व्हा!
नांदण्याचे निरोप माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी प्रेमाची,
हरवलेल्या बाईमाणसाची,
बरसुनी आकाश सारे,
अमृताने नाहवा ॥
मस्त, झकास !
या कवितेच्या निमित्ताने तार आणि तारयंत्र प्रकाशात आणलेत !
हे मित्रांनो शब्द व्हा
कुंठल्या गीतास माझ्या
प्रतिभेचे पंख द्या.
हे मित्रांनो शब्द व्हा......
अलौकिकेची साधना जी
शब्दांत मांडली तुम्ही
प्रतिभेचे दोन थेंब
आज मला प्राशू द्या.
हे मित्रांनो शब्द व्हा....
छंद,वृत्त आणि मात्रा
सदा वसती इथे,
कोंदणात त्यांच्या आज
भावनांना उमटलू द्या.
हे मित्रांनो शब्द व्हा.....
हे शब्दांनो मित्र व्हा
कुंठल्या गीतास माझ्या
प्रतिभेचे पंख द्या...
हे मित्रांनो शब्द व्हा.
-----अभय बापट.
२४/०४/२०२२
छा गये.
जबरदस्त...मझा आ गया.
क्या बात!