Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नैवेद्य

आ
आकाश खोत
Mon, 08/14/2023 - 05:09
💬 13 प्रतिसाद
n सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या. कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे. त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.
कॉलेजात असताना मी आणि माझा मित्र कोणालातरी भेटायला गेलो होतो, त्यांच्या घरातच छोटं मंदिर होतं. ते आजोबा स्वतः तिथे पद्धतशीर पूजा करायचे. आम्ही दर्शन घेतलं. घरातलं खाजगी मंदिर असल्यामुळे तिथे काही मोठी दानपेटी नव्हती पण तरीही आमच्या आधी येऊन गेलेल्या लोकांनी काही पैसे, पेढे असं काही तरी वाहिलेले दिसत होतं. एरवी मी मंदिरात दान टाकत नाही, आणि त्यादिवशी सोबत काही पैसेही नेलेले नव्हते. पण आम्ही त्यांच्या घरात त्यांच्यासमोरच असल्यामुळे जरा अवघडल्यासारखं झालं. मी म्हणालो आजोबा आम्ही काही आणलेलं नाही वाहायला. त्यांनी त्यांचं फुलपात्र पुढे केलं, म्हणाले हे पाणी वाहा जरा देवाला, हे फुल पण घे. देव काही म्हणतो का मला पैसेच दे किंवा अमुकच वहा? अरे हे सगळं ज्याने बनवलं त्याला त्यानेच बनवलेल्या गोष्टी आपण वाहतो ते कशा साठी? ती आपली भावना असते. आपल्याला या जगात आणलं, इथल्या सगळ्या गोष्टी उपभोगायला मिळाल्या, तेव्हा त्याची कृतज्ञता म्हणून आपण ते देवासाठी वाहतो, एक प्रतीक म्हणुन. पण सगळं त्याने बनवलं म्हणुन काही कचरा वाहणार का? तर आपणच देताना आपल्याला चांगलं वाटेल अशा गोष्टी ठरवल्या. पत्र पुष्प फलं तोयं असा काहीसा श्लोक म्हटला त्यांनी आणि म्हणे फुल, पान, फळ, पाणी असं सगळं चालतं. आणि ते पण ऋतूकालोद्भव. हिवाळ्यात पण मला आंबाच हवा असा काही हट्ट करत नसतो देव. त्यावेळी जे उपलब्ध असेल ते द्यायचं.
त्या आजोबांचा मुड छान होता, त्यामुळे इतकं छान समजावून सांगितलं होतं त्यांनी, ते मला अजुनही लक्षात आहे. हा जो कोणी ट्रेकर होता, त्याने सहज भावनेनं तेच केलं. इथे ठेवलेली मूर्ती पाहुन त्याला काही तरी वाहण्याची इच्छा झाली आणि जवळच्या दोन गोळ्या काढून ठेवून दिल्या. या छोट्याश्या कृतीत जेवढं सौंदर्य आहे ते देवासाठी १०० किलो पेढे, १००० किलो बर्फी, अमुक किलो चांदी, तमुक किलो सोन्याचं सिंहासन असा दिखावा करण्यात आहे का... विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या
4294 वाचन

💬 प्रतिसाद (13)
B
Bhakti Mon, 08/14/2023 - 06:58 नवीन
वाह वाह ! प्रसन्न वाटले :) श्लोक २६
पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ ९-२६ ॥ जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या व निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. ॥ ९-२६ ॥
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Wed, 08/16/2023 - 18:32 नवीन
गीतेतला अगदी हाच श्लोक मलाही आठवला. मूळ लेख भक्तीभावानं लिहिलाय. खूपच आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti
स
सौंदाळा Mon, 08/14/2023 - 16:00 नवीन
छानच. भाव तेथे देव. खुलभर दुधाची कहाणी आठवली. त्यावरुन आठवले आजीने कालच चातुर्मास शोधायला सांगितला होता. सापडला नाही तर दोन दिवसात आणायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
न
निमी Tue, 08/15/2023 - 12:39 नवीन
फारच छान भावना, लेखन आणि फोटो!! छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्यादिवशी कदाचित गोळ्याच हव्या असतील.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 08/15/2023 - 13:20 नवीन
व्हिएतनाममध्ये फिरताना एक निरीक्षण घडले होते. तिथे विविध प्रार्थना स्थळांमध्ये नेवैद्य या बाबतीत फारच वेगळे चित्र दिसले. कोणत्याही गोड तिखट गोष्टी, स्नॅक्स , कोल्ड ड्रिंक्स असे काहीही नेवैद्य म्हणून ठेवलेले दिसत असे. कोका कोला कॅन्स, प्रिंगल चिप्सचे डबे, चॉकलेट्स हे अगदी कॉमन. तेही मोठ्या चळती लावून.
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Sun, 08/20/2023 - 14:51 नवीन
व्यक्ती तितक्या प्रकृती सभ्यता तितक्या मान्यता :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ध
धनावडे Fri, 08/25/2023 - 19:33 नवीन
तिबेटीयन लोक पण दलाई लामाच्या फोटो समोर अशाच गोष्टी ठेवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बाबुराव गुरुवार, 08/17/2023 - 05:09 नवीन
नैवद्याच्या लाख त-हा.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास गुरुवार, 08/17/2023 - 08:07 नवीन
नेवैद्य आणि त्यामागचा भाव आवडला!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 08/17/2023 - 14:50 नवीन
अगदी दिलखुलास :) आवडला नैवेद्य.... देवाला आणि मलापण !
  • Log in or register to post comments
आ
आकाश खोत Sun, 08/20/2023 - 14:50 नवीन
सर्वांचे आभार :-)
  • Log in or register to post comments
प
पर्णिका गुरुवार, 08/24/2023 - 00:55 नवीन
किती गोड ! असं मनापासून अर्पण केलेलं देव आवर्जून स्वीकारतोच ! फोटोज फार मस्त आहेत. :ड
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/24/2023 - 13:53 नवीन
देव भावाचा भुकेला ....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा