काथ्याकूट

श्री गणेश लेखमाला २०२३

Primary tabs

१९ सप्टेंबर २०२३.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४५.
अर्थात गणेश चतुर्थी.
आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील!
2

दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे. आणि अर्थात, ती शक्य होणार आहे आपल्या सर्वांच्या सहभागाने.

नियम वा अटी अशा काही विशेष नाहीत, गणेशोत्सव हा आनंद आणि चैतन्याचा सोहळा असल्याने लेख सुखद असावेत, त्यात हिंसा, क्रौर्य, वातावरण अन् मन कलुषित करणारे लेखन नसावे, एवढीच अपेक्षा.

आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- ११ सप्टेंबर २०२३!

कविता, पाककृती, बाप्पासाठी नैवेद्य, कथा, भटकंती, फोटोग्राफी, चित्रकला .... जरूर पाठवा. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा.

टीप : श्रीगणेश लेखमालेत लेखांच्या संख्येवर आपोआप थोडी मर्यादा येते, त्यामुळे काही उत्तम लेखन या उत्सवात प्रकाशित नाही करता आले तरी आपण ते मिपा दिवाळी अंक - २०२३ साठी राखून ठेवणार आहोत. ते लेखन दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात येईल.

टर्मीनेटर

वा! श्री गणेश लेखमालेतील उत्तमोत्तम लेखन वाचण्यास उत्सुक आहे 👍
(काही कारणास्तव ११ सप्टेंबरची मुदत पाळणे शक्य होइल असे वाटत नाही, पण गलेमासाठी लेखन पाठवण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे.)
सर्व लेखक मंडळी आणि संयोजकांना हार्दिक शुभेच्छा!

अथांग आकाश

सगळे लेख आवडले! छान झाली श्री गणेश लेखमाला!!
सर्व लेखकांचे आणि आयोजकांचे आभार!!!

निमी

अरे वा वा!! फारच छान होणार यावर्षी आमचा गणेशोत्सव मिपा वरील गलेमा वाचनामुळे...

शानबा५१२

मला ही लिहायचे आहे, पण त्याहुन जास्त वाचायची उत्सुकता आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक.

मिपाचा वर्धापनदिन आणि श्रीगणेश लेखमाला ...
लेखकांना शुभेच्छा!!

दरवर्षी गणरायाच्या आगमनाची चाहूल गलेमाच्या घोषणेने लागते,
गलेमा उत्तमच होईल यात काही शंका नाही
पैजारबुवा,

संगणक बिघडला असल्यामुळे गलेमा, दिवाळी अंक यासाठी लेखन पाठवूं शकलो नव्हतो. आता गलेमासाठी लेख लिहून जवळजवळ तयार आहे. सद्यस्थितीतील बहुचर्चित परंतु नवीनच तांत्रिक विषयावरील लेख आहे. शब्दसंख्या सुमारे ५०० शब्द आहे. विषय चालत असेल तर पाठवतो. ठीक वाटला तर स्थान द्यालच. कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाठवू - वर्ड फाईल की पीडीएफ?

धन्यवाद.

चौथा कोनाडा

मिपाचा वर्धापनदिन ... या निमित्त आगाऊ शुभेच्छा !

Ganesh000945466

... आता श्रीगणेश लेखमालेची मेजवानी मिळणार ...
गलेमा आणि मोदकांच्या प्रतिक्षेत !

सर्व मिपाकर , रसिक वाचक , लेखक आणि संपादक मंडळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा !

गलेमा उपक्रमाला आणि उत्तम साहित्यासाठीही शुभेच्छा !

प्रतीक्षेत .

भागो

गलेमा सुरु झाली!
आज पर्यंतचे सगळे लेख अत्यंत वाचनीय आहेत.
साहित्य संपादक, अनेक आभार आणि धन्यवाद.

चौथा कोनाडा

व्वा ... मस्तच !

आ ता पर्यंत ५-७ लेख वाचून (आणी अर्थातच प्रतिसाद देऊन देखिल) झालेत, येत्या दिवसांत बाकीचे वाचेन !

... खुप छान लेख आहेत ! झकास मेजवानी !

भागो

खुप छान लेख आहेत ! झकास मेजवानी ! +++111