शेत केवळ कसायला घेतलं तर ? हवी तेवढी पेरणी णांगरणी करता येउ शकते ! मालकांस वार्षीक वाटा ..
पण हल्ली "राहील त्याचं घर ! कसेल त्याची जमीण" असा कायदा आलाय म्हणे ...
कसाराम शेतकी
गांधीवादाचा किंवा संघवादाचा वैचारिक प्रभाव
गाण्याकडे थोडे तटस्थ दृष्टीने पाहिले तर दादांनी घातलेली गांधीटोपी आणि हाफपँट पाहता दादांचा वैचारिक गोंधळ झाला आहे असे वाटू शकते. मात्र काळजीपूर्वक निरीक्षण केले असता हाफपँट कमरेला घट्ट राहावी म्हणून दादा नाडी वापरत असत. चामड्याचे पट्टे वापरत नसत.
दादांच्या अनेक प्रेक्षकांना चामडी पट्टे परवडत नसताना आपण चामडी पट्टे घालण्याची हौस करणे योग्य नाही हे दादांचे मत असावे.
मात्र दादाही सांघिक हाफपँट घालत असले तरी दादांच्या रामराम गंगाराम या चित्रपटाचा संदर्भ जर घेतला तर असे लक्षात येईल की संघाला अभिप्रेत असलेला राम आणि दादांना अभिप्रेत असलेला राम यात फरक आहे.
डोक्याला मुंडाशे, मळलेले धोतर, पायात तुटक्या वहाणा असे घालूनही समाधानी असणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या तोंडातून अभिवादनपर प्रेमळ रामराम निघावे आणि कडक टोपी, खाडखाड बूट (आणि हाफपँट) घालणाऱ्याच्या तोंडातून आक्रस्ताळे जय श्रीराम निघावे तितका फरक या दोन रामांमध्ये आहे असे वाटते.
आपला
(रामभक्त) आजानुकर्ण हनुमान
गाण्याकडे थोडे तटस्थ दृष्टीने पाहिले तर दादांनी घातलेली गांधीटोपी आणि हाफपँट पाहता दादांचा वैचारिक गोंधळ झाला आहे असे वाटू शकते.
काय मौलिक बोललात राव! वैचारिक गोंधळ आणि कोतेपणा (दादांच्या प्यांटीचा) यांत अनेकदा अनेकांची गल्लत होते.
अशी गल्लत करण्याचा कोतेपणा मी करणार नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दादांच्या हाफप्यांटीला कोते म्हणून तुम्ही गल्लत केली आहे असे वाटते.
फुल्लप्यांटींशी तुलना केली तर दादांची हाफप्यांट ही कोती वाटेल. मात्र इतर हाफप्यांटींशी तुलना केल्यास दादांच्या प्यांटीत अवघे विश्व सामावू शकेल एवढा तिचा विस्तार आहे असे वाटेल. किंबहुना आधुनिक काळातील तीन चतुर्थांश उर्फ केप्री यांचा उगम दादांच्याच हाफप्यांटीतून झाला असे म्हणता येईल.
आपला
(केप्री व 3/4 प्रेमी) आजानुकर्ण
सूक्ष्म विचार केल्यास दादांचा, कमरेचे वस्त्र (किंवा फॉर द्याट म्याटर कोणतेही) हे लज्जारक्षणासाठी हवे हा फंडा क्लीअर होता. त्यामुळे तत्कालीन फ्याशनचा विचार न करता दादांनी नेमके वस्त्रपरिधान केले.
तीच पद्धत आता सर्वत्र फ्याशन म्हणून रुढ होते आहे. (व हाफ प्यांटींचा आकारही छोटाछोटा होत आहे.) हे पाहून दादांच्या दूरदृष्टीबाबत आदर वाटल्यावाचून राहवत नाही.
आपला,
(सादर) आजानुकर्ण
दादांच्या हाफपँटीत अवघे विश्व सामावू शकेल काय, सूक्ष विचार काय, कमरेचे वस्त्र काय... कुठेकुठे वाहावत चालले आहात तुम्ही, कर्णराव...
सूक्ष्मातील विचार एक ते विनोबाच करू जाणे. येर्या कर्णाचे ते काम नोहे...
खुपच रोचक ,अभ्यासपुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
तसच अजुन एक निरिक्षण.......दादांचे डॉयलॉग व गाणी हे ठराविक वर्गातील लोकानाच समजत त्यामुळे इतर लोक निर्लज्जपणे दादा व्दीअर्थी संवाद/गाणी म्हणतात असा आक्षेप घेत असत.संघाच्या कार्याबद्दल देखिल खुप कमी लोकाना माहिती आहे ,पण बाकीचे कोडगे त्याला नावे ठेवत बसतात.हे दोन्ही बाबतीत मला साम्य आढळते.
वेताळ
पण बाकीचे कोडगे त्याला नावे ठेवत बसतात.हे दोन्ही बाबतीत मला साम्य आढळते.
वेताळराव, तुमच्याशी सहमत.
काही नाटकं, चित्रपट, नट, नट्या, आयटम, इ. यांच्यावर इतकी श्रद्धा जडते, की केव्हाही त्याबद्दल अधिक उणे ऐकायला येणे अस्वस्थ करते. आणि हे अगदी व्यक्तिगत आहेच. ईश्वरावरही ज्यांची श्रद्धा डळमळीत होऊ शकते, त्या मर्त्य माणसांकडून दादांसारख्या अद्वितीय, अतुलनीय आणि दैवी अशा संस्थेबद्दल, आणि उषाताईँबद्दल अपशब्द येणे सर्वथा शक्य आहे. खरेतर ते नित्य परिचित आहे.
'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना'.
ढगाला लागली कळ.... वाचून मात्र पुन्हा एकदा मन प्रसन्न झाले ना पण? आं आं???
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ऐशीच्या दशकात मला हिंदी चित्रपट-धंद्याचे 'ट्रेड गाईड' नामक पाक्षिक नियमितपणे बघावयास मिळायचे. त्यात कुठल्या चित्रपटाचा मुहूर्त झाला आहे, त्यात कोणकोण आहेत, तसेच कुठला पिक्चर कुठल्या टेरिटरीत कितीला विकला गेला, दर आठवड्याच्या मिळकतीचे टेरिटरीनुसार आकडे इ. त्या धंद्याविषयीची माहिती असायची. मला चांगले आठवते की दादांचा पहिला हिंदी चित्रपट तयार होऊन रिलीज होत असण्याच्या सुमारास त्या पाक्षिकाच्या एका कॉलममधून दादांची प्रच्छन्न टिंगल व्हायची. त्यांचा अवतार, व त्याहून हा मराठी निर्माता आता हिंदीत काय करणार, इसके बस की बात नही अशा आशयाचे काहीतरी ते असायचे. पण मग त्यांचा पहिला हिंदी चित्रपट रिलीज झाला, सर्व टेरिटरीतून चांगली कमाई करू लागला, तशी ती टिंगल आपसूकच बंद झाली. त्यांचा दुसरा हिंदी चित्रपट येत असतांना ही सर्व टर बंद झालेली होती. एका मर्हाठी माणसाने त्या हिंदीवाल्यांना छान हात दाखवला, ह्याचा मला तेव्हाही आनंद झाला होता.
दादांबद्दल तुम्ही अगदी भारून लिहीताय, तेव्हा हे सांगणे उचित वाटले.
टग्या (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 12/18/2008 - 23:34नवीन
(या 'गळत्या'त या वरातीमागून येणार्या 'घोड्या'चे थोडे उशिराने का होईना, पण 'योगदान'...)
दादांचे डॉयलॉग व गाणी हे ठराविक वर्गातील लोकानाच समजत त्यामुळे इतर लोक निर्लज्जपणे दादा व्दीअर्थी संवाद/गाणी म्हणतात असा आक्षेप घेत असत.
अगदी! आणि याच कारणासाठी याच गाण्यातल्या काही चांगल्याचांगल्या पंक्ती सेन्सॉर झाल्या असे ऐकिवात आहे.
दोन जिवलगांमधील प्रेमाचे अतूट बंध, जवळीक आणि एकात्मता दाखवणार्या पंक्तींमध्ये सेन्सॉरवाल्यांना द्व्यर्थी काय दिसले तेच जाणोत! 'प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की तू आकाश, तर मी तारे. तू बगीचा, तर मी फुले. तू चंद्र, तर मी चांदणे (अर्रर्रर्रर्रर्र... उलटे झाले वाटते!)...' याच मालिकेत तेवढे सौंदर्य आहे काय? शेतकरी मंडळी म्हणजे कशी, जमिनीवरची, 'डाउन टू अर्थ' माणसे. त्यांच्यासाठी गाणे रचायचे तर त्यांना समजणार्या, रुचणार्या, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी नाते राखणार्या उपमा वापरायला नकोत काय? आकाश-तारे, बगीचा-फुले, चंद्र-चांदणे वगैरे उपमा शहरी, सुखवस्तू समाजासाठी ठीक आहेत, शेतकर्यासाठी त्या नकोत.
आणि म्हणूनच जर दादांनी त्या उपमांत फेरफार करून '(प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की) तू वाटी असशील, तर वाटीत खाण्यासाठी ठेवलेले केळे मी आहे' असे म्हटले, तर त्यात त्यांचे काय चुकले? किंबहुना ही उपमा तर केवळ शेतकर्यांनाच नव्हे, तर सर्वांनाच 'अपील' होण्यासारखी आहे. केळी तर सगळेच खातात! (आपले थोर पूर्वजही खायचे - डार्विनबाबा झिंदाबाद!) तसेच 'मोरी' या जागेशी संबंध सगळ्यांचाच येतो. (फॅक्ट ऑफ लाइफ! ज्यांचा येत नाही असा दावा आहे, ते तद्दन खोटे बोलतात. घाणेरडे कुठले! कधी आंघोळ करत नाहीत म्हणजे काय!) त्यामुळे '(प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की) तू मोरी असशील, तर मी त्या मोरीतला (नेहमीप्रमाणे वायसर उडाल्यामुळे) नित्य गळणारा नळ आहे' ही कल्पनाही अशीच सगळ्यांच्या हृदयातील कोठलीतरी तार छेडणारी! (वायसर उडण्याचा प्रकार हा केवळ खेड्यांपुरता मर्यादित नसावा. किंबहुना शहरांतदेखील पावलोपावली, नित्यनेमाने हा अनुभव येत असावा. त्यामुळे शहरी, सुखवस्तू समाजालादेखील खरे तर त्याचे वावडे नसायला हवे, उलट आत्मीयता हवी!)
तर अशा रीतीने दादांनी कविता ही आकाश-तारे-बगीचा-फुले-चंद्र-चांदणे वगैरे शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू-इ.इ. बंधनांतून मुक्त करून सर्वांसाठी सर्वांना रुचेल अशा पातळीवर आणली. परंतु कविता, उपमा वगैरे आपलेच राखीव कुरण मानणार्या (आणि इतर कोठल्याही 'राखीव' प्रकारांच्या नावाने शंख करणार्या) शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू युतीच्या त्यामुळे पोटात दुखू लागले. कविता सर्वांसाठी खुली करणारे दादा त्यांना साम्यवादी न वाटले तरच नवल! आणि याच मत्सरापोटी दादांच्या याच गाण्यातल्या 'तुझ्या वाटीत माझं केळं' आणि 'तुझ्या मोरीत माझा नळ' या वास्तविक अतिशय साध्या, स्वच्छ आणि सुंदर अर्थवाही पंक्ती त्यांना द्व्यर्थी, अश्लील दिसू लागल्या. शेवटी सौंदर्याप्रमाणेच अश्लीलता हीसुद्धा बघणार्याच्या दृष्टीत ('आय ऑफ द बिहोल्डर'मध्ये) असते, हेच खरे. ('अश्लील, अश्लीलच म्हणायचे झाले तर मग मराठीत "आहे" आणि "नाही" हे दोन वगळल्यास बाकी सर्वच शब्द अश्लील आहेत' अशा अर्थाचे विधान आचार्य अत्र्यांनी केले होते असे सदानंद जोशींच्या 'मी अत्रे बोलतोय'वरून समजते.) आणि मग याच मुद्द्याला पुढे करून सेन्सॉर बोर्डातल्या याच शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू युतीच्या सभासदांनी त्या पंक्तींची काटछाट केली.
वास्तविक महात्मा गांधींनी दिलेल्या 'खेड्याकडे चला' या हाकेला ओ देऊन दादांनी कविता केवळ खेड्यातल्याच नव्हे, तर खेड्याबरोबरच शहरातल्याही जनतेच्या परसाकडे वळवली, याबद्दल दादांचा गौरव होण्याऐवजी गांधींचेच नाव लावणार्या या थोर देशात त्यांच्या काव्यपंक्तींची काटछाट होऊन त्या थोर कवितेची अशी विटंबना व्हावी; केवढा हा दैवदुर्विलास!!!
अवांतर: मर्ढेकरांनी कवितेत ओल्या पिपात मेलेले उंदीर आणले, दादांनी मोरीत गळणारे नळ आणले. फरक तो काय? बोंबाबोंब दोघांच्याही नावाने झाली, पण मोरीतल्या नळाला मात्र काट मिळाली, तर ओल्या पिपात मरून पडलेले उंदीर आजही जस्सेच्या तस्से (सडत पडलेले?) आहेत. शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू कंपूचा हा दुटप्पीपणा नाही तर आणखी काय?
किती सुंदर चर्चा आलु आहे आपली. त्या डान्याकडुन काही प्रतिसादाच्या टिप्स मिळत्यात का बघायला गेलो होतो.पण आता तिथच काय डकवायचे ह्याचाच विचार करत आहे. पण अ प्र मि त झ क्का स
आनि हो विप्र ना एक लघुशंका विचारायची आहे
शिवार फुलतय, तोर्यात डुलतय
झोक्यात नाचतोय धोतरा
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा
लपलाय भूईमूग भित्रा
मधे वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब थेंब गळं
सदर गाण्यात शेतात धोतरयाचा उल्लेख केला आहे. पण धोतर्याचे पिक शेतात घेतात काहो?तसा गाण्यात धोतर्याचा वापर का केला आहे. तीबार पिकपध्दतीबद्दल अजुन सविस्तर माहिती मिळाली तर खुपच छान
वेताळ
अरे बाबांनो दादा तुम्हाला समजले नाहीत अरे दादाना समजुन घ्यायचे असेल तर दादाचे एकटा जिव सदाशिव वाचा काय आनि किति भोगले आहे त्या माणसाने
आयुष्यात सख्या पुतण्याने जन्मभराची कमाई हडप केलि तरी त्या माणसाने तोंडातुन शब्द काढला नाहि
दादाचा - चित्रपट वेडा कोतवाल
धम्मकलाडू - आपली ही सदर चर्चा ही दादांच्या खांद्यावर बंदूक उडविण्याचा प्रकार आहे. चालू द्या ... तुमच्या हेटाळणींच्या यादीत आता दादांची लेटेस्ट भर! गुड लक!!
अवांतर - दादांच्या याच गाण्यावर परदेशी लोकांचे नृत्य बसविल्याची आठवण मात्र या निमित्त्याने जागी झाली. ह्हपुवा!!!
तुमच्या हेटाळणींच्या यादीत आता दादांची लेटेस्ट भर! गुड लक!!
हा तुमचा गैरसमज आहे. दादा हे आमचे दैवत. सोंगाड्यापासून त्यांचे जवळजवळ सर्व चित्रपट आम्ही आवडीने बघितले आहेत. अगदी हिंदी चित्रपटदेखील. ( धीर छोड तेरी पाइप का पानी.. हे गाणे कुणाला आठवत असल्यास द्यावे. )
अवांतर - दादांच्या याच गाण्यावर परदेशी लोकांचे नृत्य बसविल्याची आठवण मात्र या निमित्त्याने जागी झाली. ह्हपुवा!!!
हेही नसे थोडके! त्या दादांच्या पुण्यात्माला आमचे पुन्हा एकदा अभिवादन!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आम्ही दादांची हेटाळणी करणे शक्यच नाही. आणि सांगा बरे गोळ्या कोणाला मारतो आहोत? काहीतरीच काय राव! निषेध, निषेध! तुमचे आता बौद्धिकच घ्यायला हवे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दादांना चिकटू पाहणारी बांडगुळे
खो खो खो... अजून एक जबरा हेटाळणी! कशाला दैवत वगैरे गमजा मारता राव?
'महापुरुषांची विटंबना' ह्यामध्ये वरील वाक्ये येत नाहीत का? उद्या संत तात्याबा महाराजांविषयी कुणी असली ओंगळवाणी चेष्टा केली आणि हसून लोळले तर ते खपवून घेतले जाईल का? दादा कोंडके हे महापुरुष होते हे मिपाला मान्य नाही का? कारण नसताना दादांची विचारसरणी प्रसृत करणार्यांची टर उडवण्याची मुभा सगळ्यांना आहे का? मराठी मनांची स्पंदने म्हणून कार्यरत असणार्या संकेतस्थळावर असा चुकीचा मेसेज दिला जाऊ नये. मस्करीची कुस्करी होत आहे इथे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उपहास आणि भाबडेपणा अश्या दोन चाकांवर चर्चेची गाडी चालू आहे हे पाहून अंमळ करमणुक झाली.
-- लिखाळ.
गोळीबाराचे लक्ष्य चर्चेचा विषय न ठरता बंदूकच चर्चेचा विषय ठरली.
अपरंपार फसलेल्या चर्चेचा हा एक उत्तम विनोदी नमुना ठरावा! L) ~X( #:S
(खुद के साथ बातां - असंच काही नाही हं रंगा, कदाचित जाणूनबुजून पांघरलेल्या भाबडेपणाचा विजयही असेल का? B) )
चतुरंग
मी तरी या चर्चेत जाणूनबुजून असे काहीही केलेले नाही. माझे दैवत दादा कोंडके यांच्याबाबत भाबडेपणे बोलण्याऐवजी मी जॉन रॉब्लिंग सस्पेन्शन ब्रिजवरुन ओहायो नदीत उडी घेणे पसंत करीन
आपला
(कट्टर) आजानुकर्ण पुणेकर
अपरंपार फसलेल्या चर्चेचा हा एक उत्तम विनोदी नमुना ठरावा!
का बरे? चर्चा उत्तम आहे याबद्दल शंकाच नाही. पण विनोदी नमुना कसा दिसला तुम्हाला. या चर्चेत मला तरी कुठलाच विनोद अपेक्षित नव्हता. ही चर्चा माझ्यादृष्टीने तरी तुफान यशस्वी झाली आहे. तुम्हाला फसलेली वाटावी याचे आश्चर्य वाटते. जमून आलेल्या चर्चेला उत्तम विनोद नमुन्याचे लेबल लावण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाचा मी धिक्कार करतो. दादांचा विजय असो!
चर्चेतून जे काही निष्पन्न झाले आहे ते मी थोडक्यात काही दिवसांत मांडीनच. या तुफान यशस्वी चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. काही जणांचे प्रतिसाद लाभले असते तर आवडले असते.
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
थट्टा, टिंगल, टवाळी ह्या सर्व दुतर्फा असतात. तुम्ही दुसर्यांच्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगलेत तर, तुमची दैवतेही त्यापासून मुक्त राहू शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा धडा ह्या चर्चेने दिला आहे.
सबब, आता ही चर्चा थांबवावी असे सुचवावेसे वाटते.
(तटस्थ) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
थट्टा, टिंगल, टवाळी ह्या सर्व दुतर्फा असतात. तुम्ही दुसर्यांच्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगलेत तर, तुमची दैवतेही त्यापासून मुक्त राहू शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा धडा ह्या चर्चेने दिला आहे.
कुणी कुणाच्या कुठल्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगले व कुणाची कुठली दैवते मुक्त राहू शकत नाहीत? कळेल का?
सबब, आता ही चर्चा थांबवावी असे सुचवावेसे वाटते.
दादांचा यथोचित आदर होतो असला, त्यांच्या राष्ट्रकार्याची लोकांना ओळख होत असली तर ते उत्तमच नाही काय? पण तुम्ही म्हणत असाल तर ही एव्हढी चांगली उद्बोधक चर्चा सुरू आहे ती थांबवायला माझी तरी हरकत नाही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आद्यमराठी नाडीकार म्हणुन दादाचे नाव घ्यावे लागेल.त्यानी नाडी/नाडा ह्या शब्दाला मराठीत प्रथमच व्यापक अर्थ दिला(काय दिला ते माहित नाही आणि कोणी विचारण्याचा प्रयत्न करु नये)
तसेच दादा आमचे दैवत आहे. आम्ही आमच्या लहानपणापासुन दादाचे सिनेमे बघत आहे.काय राव तुम्ही चेश्टा करताय आमची. हे बर काय बर नाही.आमच्या वर दादाच्या विचाराचे लहानपणा पासुन संस्कार आहेत.म्हणुन आम्ही आता जादा बोलत नाही. वेताळ
आद्यमराठी नाडीकार म्हणुन दादाचे नाव घ्यावे लागेल.त्यानी नाडी/नाडा ह्या शब्दाला मराठीत प्रथमच व्यापक अर्थ दिला(काय दिला ते माहित नाही आणि कोणी विचारण्याचा प्रयत्न करु नये)
खरेच की. दादांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातले कार्य माहीत आहे. एकंदर नाडीशास्त्रातले त्यांचे योगदान दुर्लक्षित झालेले आहे हे खरे. या कार्यावर प्रकाश पाडल्याबद्दल धन्यवाद.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दादांची स्टाईल -- अगदी द्वर्थी स्टाईलही -- डायरेक्ट. उगाच दुधाला जाऊन दांडू लपविणारं खुसपट नाही.
दादांची साततोटी चौकातील शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेतील भाषणे पुसटशी आठवतात ती अशी (चुभूद्याघ्या भर घाला)...
दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला?
दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?
* दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला?
* दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?
माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद. असेच आणखी प्रतिसाद वाचायला आवडतील.
(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दादांना कायद्याची नाडी पक्की महिती होती
सवकार पद्ध्ती विरोधात केलेली ग्राम जग्रुती कोण विसरेल ???
राहिल त्याचे घर, कसेल त्याची जमीन - कयदे-तज्ञ गंगाराम
जर प.बंगाल मध्ये दादांना समकालीन सज्ञान समर्थक भेटले अस्ते तर आज करात ... बसू. .. ममता .. ई. कोण ??? असेच म्हणावे लागले असते. (नक्की काय म्हणायचे आहे ?? च्या.. ईथे नाड्यांचा गूंता झाला आहे)
असो.. प्रासंगिक विनोद, समयसुचकता, अतिहजरजवाबीपणा, नाड्या अवळने हि दादांची किमया ... मी तर म्हणेन मराठी सिनेस्रुष्टीला लाभलेल भाग्यच
प्रातःस्मरणीय दादा कोंडकेंच्या वादातीत, कालातीत अशा कार्याची (आणि अर्थातच त्यांच्या अर्ध्या चड्डीचा मोठेपणा) ओळख चर्चेमुळे अधिकच गहिरी झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, समरसतावादी, समतावादी विचारसरणीचे अनेक पैलू वाचकांपुढे आले, असे मला वाटते.
या ऐतिहासिक अशा चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्यांचा मी फार आभारी आहे. परम पूजनीय व प्रातःस्मरणीय दादा कोंडकेंच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझ्यातर्फे ही चर्चा संपल्याचे जाहीर करतो. जय हिंद.
() धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
- दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला?
- दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?
एकलव्य (मुक्काम मंगळवार पेठ)