जे न देखे रवी...

(कावळ्यांची फिर्याद-३)

Primary tabs

https://www.misalpav.com/node/48814 कावळ्यांची फिर्याद

https://www.misalpav.com/node/51617- कावळ्यांची फिर्याद-२

मास भादव्याचा आला, झाला पितृपक्ष सुरू
वायसांची, एक्स्ट्रा-ऑर्डिनरी सभा होती सुरू

त्रासलेले काही,काही माखलेले, काही कुरकूरत होते
पिपंळाच्या पानां परी, कावळे अधिक होते

उडत,काही,पडत काही,तर काही,
"नशीब खोटे आपले", म्हणून बडबडत होते

तीच ती भाजी,वडी अन्,तेच भोक पडलेले वडे
अमसूलाच्या चटणीमुळे पडले जिभेला तडे

नाही पिझ्झा,नाही पनीर,तीच ती तांदळाची खीरं
आम्हांला पण मन आहे,आम्हींतरी कुठवरं धरावा धीर

तीच ती रव्याची पोळी,आताशा,पितरं सुद्धा त्रास देतात,
पनीर टिक्का,देसी चायनीज,असे काहीतरी
आणा म्हणतात

सत्य गेले,त्रेता,द्वापार गेले, माणूसही कलियुगी बदलला
बदलली सृष्टी,बदला आम्हांसही, साकडे परमेश्वरी घाला, .....

पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा.....

प्रचेतस

मस्त एकदम.
हल्ली नाशिकच्या गंगाघाटावरील दहाव्याचे कावळे दिसेनासे झाले आहेत. घाटाचे काँक्रीटीकरण, तसेच स्थानिकांनी हुसकावून दिल्यामुळे विधी घाटावर करून पिंड लांब अमरधामला न्यायला लागतो कावळ्यांसाठी.

हल्ली कचरा डेपोमधे जास्त दिसतात. के एफ सी,मॅकडोनाल्ड, डाॅमिनोजच्या पाकिटावरून भांडणं करतात असे दिसून आले आहे.

ओकांरेश्वर सुद्धा संख्येत घट झालीय.

Bhakti

देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान,
कितना बदल गया कौआ..
सूरज ना बदला,चाँद ना बदला,ना बदला रे आसमान,
कितना बदल गया कौआ..कितना बदल गया कावळा..
मस्तच!

पुण्यात माझ्या घराकडे बरेच कावळे दिसतात. सोसायटीच्या पाण्याच्या टाकीवर काय धन लपलंय काय माहीत वर शिडीने चढायला गेलो की प्रचंड काव काव कलकलाट करतात कावळे. हल्ला करतील की काय अशी भिती वाटते. कावळा पिंडदानाची सर्वास सुरू करावी म्हणतो. सोसायटी मेंटेनन्स ला हातभार लागेल.

सोसायटी मेंटेनन्स साठी मोबाईल टॉवर लावण्यापेक्षा कितीतरी छान!!

बादवे--आमच्याकडे पोपट खुप येतात हल्ली, बहुतेक कदंबाची फळे खायला. फार कलकलाट करतात, पर्याय म्हणुन ते चालतील का? देतो पाठवुन :)

खीक्क. त्यासाठी शंकराचार्यांना गाठून धर्मसुधारणा करून घ्यावी लागेल. कावळा नसेल तर पोपटही चालेल अशी.