जे न देखे रवी...

सृष्टी माया

Primary tabs

वाजे लडिवाळ घुंगूरवाळा
चरितसे गोजिरी कपिला |

धरती गळा फुलांच्या माळा
फुलपाखरांनी श्वास रंगला |

वाहे धीरगंभीर निर्झर निळा
नाद ,सृष्टी मंदिरा घुमला |

स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा
पाकळ्यांची बरसात रान सजला|

अवचित पावा वाजला सावळा
समाधी मनीची ,हरी हसला |

-भक्ती

Bhakti

एक मुलगी सृष्टीची किमया- गोजिरी गाय,झरे,फुलपाखरे,वारा त्याचा कोमल स्पर्श,फुलं, त्या फुलांच्या रंगीत पाकळ्या या साऱ्याने मोहून गेली,एक समाधीचं तेव्हा चित्तात 'हरी'म्हणजे कृष्णाचा भास होतो आणि या सखीच्या अवस्थेला तो मोहक स्मित देतो :)
टीप-खुप दिवसांनी मुक्त कविता सुचली होती! प्रतिसादासाठी धन्यवाद!