Welcome to misalpav.com
लेखक: हेमंतकुमार | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

या दोन हॉर्मोन्सची माहिती नव्हती.इन्सुलिन आणि ग्लुकागोन सारखीच जोडी आहे.जागतिक अन्नदिनाच्या शुभेच्छा!

होय, काही प्रमाणात त्या दोन हार्मोन-जोड्यांमध्ये साम्य आहे.

खूप छान लेख. पण vagus वर अजून थोडी माहिती हवी होती - का महत्त्वाची आहे या विषयी.

vagus वर अजून थोडी माहिती
आपल्या मनात जेव्हा अन्न खावे हा विचार येतो तिथंपासून मेंदूमध्ये चलनवलन सुरू होते. अन्नाचे दर्शन, वास किंवा चव या सर्वांमुळे मेंदूमध्ये काही घडामोडी होतात. परिणामी तिथून संदेश निघून ते vagus nerve मार्फत जठराला पोहोचवले जातात. आता पुढे दोन घडामोडी होतात : १. जठरातील आम्लनिर्मिती पेशी थेट चेतवल्या जातात. २. जठरातून gastrin हे हार्मोन स्त्रवते. वरील दोन्ही क्रियांमुळे जठरातून पाचकस्त्राव वाढू लागतो, ज्यात मुख्यत्वे HCl हे आम्ल आणि pepsin या पाचक एंझाइमचा समावेश असतो.

भारतात रात्रीचे जेवण असो किंवा दिवसाचे अर्धा पाऊण तासात उरकले जाते. (माझ्या समजेप्रमाणे). परदेशांत डिनर / डिनर पार्टी बराच वेळ चालते. मग ते घ्रेलीन/इन्सुलिन कधी व कसे बदलत असतील? तसेच करणारा जेवून ढेकर दिली की झाले हे इकडे. तिकडे ढेकरच बाद. घ्रेलीन संपल्यावर ढेकर येत असेल. "आता पान/कॉफी येऊ द्या ." (प्राण्यांचे काही वेगळे असावे. चरतात काही. थांबतच नाहीत. अवांतर)

डिनर पार्टी बराच वेळ चालते. मग ते घ्रेलीन/इन्सुलिन कधी व कसे बदलत असतील?
हा तसा गुंतागुंतीचा मामला आहे ! सर्वसाधारणपणे काय होतं ते पाहू. जेवणानंतर ग्लुकोजची रक्तपातळी वाढू लागते. त्याच प्रमाणात इन्सुलिनची पातळी देखील वाढते आणि त्याचबरोबर ghrelinची पातळी कमी होते. म्हणजेच, इन्सुलिन व ghrelin ही दोन्ही हार्मोन्स परस्परविरोधी आहेत. जेवणाचा वेग आणि वरील गोष्टींवर होणारा परिणाम या संदर्भात मर्यादित लोकांवर केलेला एक अभ्यास सापडला : https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/20004655/ तिथे म्हटल्यानुसार, संथपणे जेवले असता ग्लुकोज आणि ghrelin हे दोन्ही बरेच वाढलेले राहिले. एकंदरीत वरील तीन घटकांच्या बाबतीत उलटसुलट निष्कर्ष काढलेले अभ्यास झालेत.

GLP-१ दोन नवीन औषधांवर
मुळात ही औषधे मधुमेहाशी संबंधित आहेत. या लेखाचा उद्देश Ghrelin व Leptin यांची मूलभूत माहिती हा असल्यामुळे इथे त्यांचा विचार केलेला नाही. भविष्यात मधुमेहावरील औषधे यावर वेगळे लिहायचे ठरल्यास तिथे ते योग्य होईल.

उपवासामुळे Ghrelin चे प्रमाण वाढते का? या वाढलेल्या Ghrelin मुळे काही इतर फायदे होतात का? उदा: हृदय व रक्तवाहिन्यांची तंदुरुस्ती, चेतातंतू व स्नायूपेशींची निर्मिती वगैरे

मर्यादित उपासामुळे Ghrelin ची रक्तपातळी वाढते हे बरोबर. अशा वाढलेल्या पातळीमुळे मेदसाठे कमी होऊ शकतात आणि वजनही कमी होते. त्याचबरोबर शरीरातील पेशीचा इन्सुलिनला मिळणारा प्रतिसाद वाढतो. मात्र दीर्घकाळ उपास केल्यास Ghrelin ची पातळी कमी होते. या संदर्भात संशोधनांचे निष्कर्ष काहीसे उलट सुलट देखील आहेत. ठाम निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.