Welcome to misalpav.com
लेखक: मार्गी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आवडलं. मलाही अशी प्रखर स्वप्नं बऱ्याचदा पडतात, देजावू पण होते, पण स्वप्नात पाहिलेलं प्रत्यक्षात घडतंय असं अजून नाही वाटलं कधी.

बर्‍याच लोकांना असे होते तर!! मला झोपेमध्ये सूचक स्वप्ने पडत नाहीत, पण दे जावु(हा शब्दही नव्याने समजला) टाईप भास होतात कधीकधी. म्हणजे ती स्वप्ने असतात की नाही माहित नाही, पण कधीतरी एकाद्या ठिकाणी गेल्यावर किवा सहज कुणाशी तरी बोलताना "अरे, हे घडुन गेलेय" असे वाटत राहते. त्या माणसाशी बोलताना "आता हा असे बोलणार, किवा अशी मान हलवणार" असे काहीतरी वाटते तोच तसेच घडते. हे मी आधी कुठे पाहीले असेल? असा विचार भुंगा घालत राहतो. हे का होत असावे? कॉलिंग कुमार सर>>

देजा वू (उच्चार काहीसा "व्ह्य" सारखा) हा फ्रेंच शब्दप्रयोग म्हणजे साधारणपणे आत्ता घडणारी घटना पूर्वीही अशीच घडून गेली आहे ("यापूर्वी बघितले") असे भासणे. याच्या अगदी उलट देखील एक प्रकार आहे जो अनेकांना माहीत नसतो. Jamais vu (उच्चारी "जमे व्ह्य") म्हणजे परिचित, पूर्वी घडलेली किंवा रूटीन घटना, प्रसंग हा आत्ता अगदी नव्याने प्रथम घडतो आहे असे भासणे.

मला बरेचदा स्वप्नात मी ज्या लोकांषी बोलतो ते लोक अगोदर परलोकवासी झालेले असतात. कधी कधी स्वप्नातही ही जाणीव होते किंवा जागे झाल्यावर स्वप्न अटह्वते त्या वेळेस जाणीव होते की ज्यांच्याशी बोललो ते लोक या पूर्वीच मेलेले आहेत. हे लोक माझी नातेवाईकच असतील असेही नाही. आसपासच्या समाजातील कोणी अगदी लांबचे किरकोळ परिचितही असतात.( वडीलांचे मित्र , कोणाची आत्या , शाळेच्या वर्गातला सहपाठी ,कोणाचा ड्रायव्हर वगैरे) मात्र ही अशी स्वप्ने पहाताना मला कधीही भीती किंवा चिंता वाटत नाही.. ते लोक माझ्या शी सहज बोलतात . मी या स्वप्नाचा काही अर्थ लावून पाहिला. तर तो तसा काहीच लागत नाही. स्वप्नात येणार्‍या "त्यांच्यांशी" माझा कधीच काही व्यवहारदेखील नसतो. पण गम्मत वाटते की बहुतेकवेळा स्वप्नात येणारे लोक मृत झालेले असतात. हे अगदी लहानपणापासून होत आलेले आहे. मला कोणीतरी सांगितले की माझ्या कुंडलीत कसलातरी योग असल्यामुळे असे होते. पण माझा यावर विश्वास नाही

+१ सेम हियर. नात्यातले, दूरचे अश्या अनेक मृत व्यक्ती स्वप्नात बिनधास्त वावरतात. उपस्थित असतात. कधी कधी तेव्हाही जाणवते की अरे हे असं कसं शक्य आहे? पण तरीही स्वप्नात त्याचा फारसा तार्किक विचार करणे किंवा भीती वाटणे असे होत नाही. मात्र जाग आल्यावर फार वाईट वाटू शकते. विशेषतः नजीकची पण हयात नसलेली अशी व्यक्ती स्वप्नात आलेली असेल आणि स्वप्न मोडले तर.

वाचनाबद्दल व प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद! @ गवि जी, नवीन माहितीबद्दल धन्यवाद! @ विजूभाऊ जी, ओहहह. अशा स्वप्नांबद्दल ऐकलंय काही जणांकडून.

खरेतर मानवी भावभावना आणि मेंदूचे कार्य अजूनही पूर्णपणे उलगडलेले नाही, त्यात स्वप्नांचा विचार म्हणजे मनाच्या अथांग डोहात उतरून तळ गाठणे होईल. मानवी अंतर्मन आणि भावभावना यामुळे स्वप्ननिर्मीती होत असावी. एकंदरीत पडलेले स्वप्न आपल्या अंतर्मनाचा वर येऊ घातलेला बुडबुडा म्हणता येईल. स्वप्नातील कालावधी हा जलद गतीने पुढे जातो त्यामुळे केवळ ५ मिनिटांच्या स्वप्नातही आपण १ ते २ तास सहजपणे रमतो. काहीजणांची हा कालावधी कमी जास्तही असू शकतो किंवा प्रत्येकवेळी स्वप्नांचा वेळ वेगवेगळा असू शकतो. मलाही अनेकदा भीतीदायक स्वप्ने पडलेली आहेत. स्वप्नात जवळच्या व्यक्तीचे आपल्यासमोर अंत किंवा वाईट परिस्थिती, दंगल किंवा दंगल सदृश परिस्थितीत अडकलो आहे, उजाड ओसाड माळरानातून कोणीतरी मागावर आहे, निर्जन रस्त्यावरून जात आहे आणि त्यातून मार्ग सापडत नाही. The Grudge आणि राज चित्रपट बघितल्यावर रात्रभर भुतांची स्वप्ने येत होती. मला पडणारी स्वप्ने १) परत शाळेत/कॉलेजात जात आहे. २) परीक्षेला बसलेलो आहे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हातात आहे आणि काहीच अभ्यास झालेला नाही. ३) परत जुन्या कंपनी/ऑफिसमध्ये काम करत आहे. ४) उंचावरुन उडी मारली आहे पण जमिनीवर पाय टेकायच्या आधी हवेत हळूहळू तरंगत जात आहे. ५) हयात नसलेल्या व्यक्ती स्वप्नात येणे. ६) बसने/रेल्वेने दुसऱ्या गावी जात आहे किंवा दुसऱ्या गावाहून येत आहे, परंतु कधीही ईप्सित स्थळी पोहचलो नाही. समुद्रप्रवास आणि विमानप्रवासचा अनुभव नसल्याने त्याची स्वप्ने पडली नाहीत. फक्त विमानात बसेपर्यंत स्वप्न पडले आहे, पण विमानाने अजूनपर्यंत उड्डाण केले नाही. ७) हातातील काम अपुरे राहिल्यास स्वप्नात काम पूर्ण केले आहे. (ऑगस्ट केकुले या शाश्त्रज्ञाला स्वप्नात बेंझिनचा फॉर्मुला सापडला होता)