Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ? बाकी अमुकांनी अमुक करावे, तमुकांनी तमुक करावे ह्यामगे काय करणीमिमांसा आहे का ? ह्याचा काही उपयोग आहे का उगीच ?

ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ?
होय, त्यावर एक छोटेखानी लेख लिहायचा आहे पण मला सौरोन सारुमान ची प्रचंड भीती वाटते. आपल्या इथे गोब्लिंस नाहीत पण ऑर्कस आणि ऑर्काहायस आहेत, त्यांचे काही सांगता येत नाही.

Sorry, I am unable to type in Marathi. But can’t resist to comment. These Sanskrit shlokas does not mean that it’s Sanatan Dharm. Insisting on such rituals has actually made masses to go away from religion. In fact, Dharm is very different than religion. Do we really care about Manushya Dharm, Raj Dharm ….. ? Incidentally, there were some interesting thoughts expressed in Nastik Parishad a few days back. Many clips on lectures and discussions are on YouTube. Worth hearing for a different way of thinking.

धुरळा पेटणार... वैयक्तीक सांगायचे तर, हिंदू धर्माला एका साच्यात बांधता येत नाही. सध्याच्या परिस्थितीत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे, पूजा करत आहे ना? मग झालं...

लहानपणी दस-याला देवदर्शनाला जाऊन येऊन आजुबाजुच्या घरात वडीलधा-यांना सोने (आपट्याची पाने) देऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची पद्धत इमाने इतबारे पार पडली जायची. प्रत्येक घरी गेल्यावर कुठे साखरफुटाणे, साधे फुटाणे, शिरा, लाडू, साखर, गुलाबजाम, किंवा आणि जे काही असेल ते हातावर ठेवले जायचे आणि लगेच तोंडात टाकून खाऊन टाकायची लाडीक तंबी त्या घरातील वत्सल मायाळू काकू, मावशी, आत्याकडून मिळायची. इलाज नसायचा. तोंड गोड होत होत इतके गोड व्हायचे की चवच कळायची नाही. कधी कधी कडू पण पडायचे. नक्की चव न कळल्यामुळे काहीच कळायचे नाही. त्या त्या काकू आत्या मावश्या यांची जिव्हाळ्याबद्दल तक्रार नव्हती आणि नाही पण जरा आमचा विचार करा हो असे मन आक्रंदून सांगायचे. पण ऐकतो कोण? त्यांना हटकण्याची हिंंमत तेव्हाही नव्हती, आजही नाही. त्यांच्यातल्या काही आज तंबी द्यायला पण नाहीत. असो. काही नाही, हा लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!

लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!
हे आवडले. :) The more you become personal, the more you become universal.

वर्षभर शक्तीची उपासना करणे, वापर करणे, आणि काही प्रसंगी / निमित्ताने त्या शक्तीला व्यक्ती स्वरूपात आपल्या आयुष्यात आणणे ही संकल्पना उत्तम आहे. हे सर्व कर्मकांड केवळ प्रतिकात्मक झालं , आणि त्यात परत उच्चनीचतेचि तुलनात्मक भानगड उपजली की सगळं मुसळ केरात गेलंच म्हणून समजा.