Welcome to misalpav.com
लेखक: संतोष तादंळे | प्रसिद्ध:
1

एक अनाकलनीय कळ मनात उठते आहे स्वतःशी बोलायचीही भीती वाटते आहे

कोणते चांदणे हरवले या आकाशाचे निळ्या डोळ्यातले आकाश फाटते आहे माझ्या तुझ्यात नवीन काहीच नव्हते हे कोणते अंतर नव्याने भेटते आहे कालपर्यंत धो धो कोसळले होते सर्वत्र आज हे पाणी डोळ्यात का साठते आहे धनदांडग्यांनी लुटले म्हणून निराश नाही गरीबीला गरिबी का लुटते आहे दिवसभर ज्याने सर्वाना आधार दिला या कातरवेळी काळीज तुटते आहे मी साऱ्याच शब्दाना श्रद्धांजली वाहिली गोठ्यात ती माय वासराला चाटते आहे